' वधू जोमात नातेवाईक कोमात; स्वतःच्याच लग्नात काढले कपडे आणि केला लॅप डान्स – InMarathi

वधू जोमात नातेवाईक कोमात; स्वतःच्याच लग्नात काढले कपडे आणि केला लॅप डान्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येकजण आपल्या लग्नात काहीतरी वेगळे आणि भन्नाट करण्याची इच्छा ठेवत असतो जेणे करून आपले लग्न अविस्मरणीय होईल आणि जेव्हा जेव्हा लग्नाची आठवण येईल तेव्हा तेव्हा त्या सुंदर आठवणींमध्ये रममाण होण्याची इच्छा बाळगतो. आणि, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी, लोक विविध व्यवस्था विविध प्रकार आणि प्रयत्न करत असतात.

मात्र, कधी कधी रंगाचा बेरंग होतो आणि लग्नाच्या आनंदाची सगळी मजा निघून जाऊन ती शिक्षेत रूपांतरित होते अशीच काहीशी विचित्र घटना आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

फ्लॉरिडा मधील एका नववधूने तिच्या लग्नात असा डान्स केला की तिचा डान्स पाहून पाहुणे ही आश्चर्यचकीत झाले. या नववधूने स्वत: च्याच लग्नात सर्व पाहुण्यांसमोर बॅकलेस ड्रेस घालून चक्क लॅप डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहे.

 

florida case IM

 

नेमके घडले काय चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण.

हाती आलेल्या वार्तेनुसार घडलेले हे प्रकरण फ्लॉरिडा शहरातील आहे. जिथे एका जोडप्याने स्वतःच्या लग्नाचे रिसेप्शन दिले व आठवणी संस्मरणीय बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या उत्तम व्यवस्था करून रीसेप्शनला भावनिक रित्या सजवले.

यात एक मुख्य आकर्षण होते ते म्हणजे स्वागत समारंभातील नृत्याचा कार्यक्रम. पण, डान्स पार्टी सुरू होताच स्टेज वर घडत असलेल्या घटनेने पाहुण्यांची आश्चर्याने तारांबळ उडाली.

घडले असे की नृत्याच्या कार्यक्रमादरम्यान आपल्या पती देवाना आश्चर्यचकित व मंत्रमुग्ध करण्यासाठी, वधूने बॅकलेस ड्रेस घालून प्रवेश केला, आणि सर्वांसमोर लॅप डान्स केला. तिचा अशा अवतारातील डान्स पाहून स्वतः नवर देवालाही लाही आश्चर्य वाटल्यशिवाय राहिले नाही.

रोशेल असे या नववधूचे नाव आहे. आप्त स्वकीयांनी खचाखच भरलेल्या स्वागत समारंभामध्ये वधूने तिच्या भावी वराला जो आश्चर्याचा धक्का दिला ते दूसरा कोणीही करू शकणार नाही.

lap dance 2 IM

 

लॅप डान्स करत अंग प्रदर्शन व चित्र विचित्र शारीरिक हालचाली करणार्‍या या नववधूचे नृत्य एका पाहुण्याने संपूर्ण चित्रीकरण केले आणि एक व्हिडीओ बनवून सोशलवर मीडिया वर टाकला, त्यामुळे या अतरंगी नववधूला चांगलेच ट्रोल केले जात आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही लोक नववधूला ट्रोल करत आहेत, तर काही युजर्सकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

social media reacts IM

 

व्हिडिओवर टिप्पणी करताना, डिटेक्टिव ड्रिप नावाच्या युजरने काहीही न समजलेल्या स्वरात, ‘ही खरोखर वधू आहे का???’.असे विचारले तर त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, ‘या लग्नात सर्व काही आनकलनीय आहे… बॅकलेस ड्रेस, अनवाणी वधू… तिच्या संपूर्ण कुटुंबासमोर विचित्र पद्धतीने आपली कला सादर करताना… जिथे लहान मुले, आई-वडील आणि आजी आजोबा सर्वांची उपस्थिती आहे

व्हिडिओवर टिप्पणी करताना, आणखी एका युजरने लिहिले की, ‘तुमचे खास मित्र, सगे सोयरे आणि कुटुंबासमोर असा लॅप डान्स तो ही फक्त तुमच्या नवऱ्याला खुश आणि आश्चर्यचकित करण्यासाठी, कठीण आहे.

दुसरीकडे, ‘एखाद्याला स्वतःच्या लग्नात असा डान्स करायचा असेल तर काय अडचण आहे, तुम्हाला आवडत नसेल तर लग्नात करू नका.’असे एका यूजरने रोशेलच्या समर्थनार्थ ट्विट करत लिहिले.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?