' मार्केटमध्ये होणाऱ्या लॉसला द्या फुलस्टॉप; ‘स्टॉप लॉस’ म्हणजे काय? जाणून घ्या – InMarathi

मार्केटमध्ये होणाऱ्या लॉसला द्या फुलस्टॉप; ‘स्टॉप लॉस’ म्हणजे काय? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सहज आजूबाजूला चौकशी केली तर अशी अनेक उदाहरणं सापडतील जेव्हा सर्वसामान्य लोक डायट प्लॅन किंवा फिटनेस प्लॅन नियमित पाळू शकत नाहीत! यामध्ये अपयश येण्यामागे ते आपल्याला शेकडो कारणे आहेत.

जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांची आपण खोलात जाऊन चौकशी केली तर आपल्या लक्षात येईल यामागे केवळ यशाचा मंत्र हा एकच आहे ते म्हणजे सातत्य.

 

success mantra IM

 

इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर सामान्य गुंतवणूकदारासमोर असलेले प्रश्न काही याहून वेगळे नाहीत. पण इन्वेस्टर समोर काही वेगळी कठीण  कारणं आणि चॅलेंजेस देखील असतात.

गुंतवणुकीचे निर्णय घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण जातं कारण त्यांना असलेलं मर्यादित नॉलेज, मनातील भीती आणि एकांगी विचार करण्याची पद्धत (Bias). सामान्य गुंतवणूकदार इन्वेस्टमेंट पासून दूर राहण्याचं कारण म्हणजे मार्केटचे स्वरूप; मार्केट सतत वर-खाली, दोलायमान परिस्थितीत असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गोल्ड, बॉन्ड, म्युच्युअल फंड आणि शेअर्स यामधील व्यवहार आता खुप सोपे आणि सोयीचे झाले आहेत, आड येते ती निर्णय-क्षमता.

योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये नेमकं काय करायचं हे समजून सांगणारी विश्वासाची, जबाबदार व्यक्ती हवी, अशीच एक व्यक्ती म्हणजे नीरज बोरगांवकर!

 

neeraj borgaonkar IM

 

गेल्या अनेक वर्षांपासून ते सामान्य इन्वेस्टरला या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर नीट उलगडून सांगत आहेत.

===

शेअर मार्केटमध्ये पोझिशनल ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग करताना “स्टॉप लॉस” लावणे अतिशय आवश्यक आहे असे आपण नेहमी ऐकतो. आजच्या लेखामध्ये आपण “स्टॉप लॉस” म्हणजे काय हे सविस्तर जाणून घेणार आहोत. समजा तुम्हाला असे वाटत असेल, की एखादा शेअर वर जाण्याची शक्यता आहे, तेव्हा तुम्ही तो शेअर खरेदी करता.

समजा तुम्ही हा शेअर खरेदी केला, पण या शेअरची किंमत तुमच्या अंदाजानुसार जर वर न जाता खाली येऊ लागली तर तुम्हाला लॉस होऊ लागतो. हा लॉस थांबवण्यासाठी “स्टॉप लॉस” चा वापर केला जातो.

एक उदाहरण घेऊन समजुन घेउयात.

समजा XYZ Ltd. या शेअरची सध्याची किंमत 100/- रुपये आहे. तुमचा असा अंदाज आहे की ही किंमत वर जाऊ शकते. म्हणुन तुम्ही 100/- रुपयांना हा शेअर खरेदी करता. तुमची अपेक्षा अशी आहे की या शेअरची किंमत 110/- रुपये होईल. परंतु तुम्ही खरेदी केल्यानंतर शेअरची किंमत वर न जाता खाली उतरु लागली तर तुमच्या अकाऊंटमध्ये लॉस दिसु लागेल. ही किंमत किती खाली जाऊ शकेल याला काही लिमिट नसते.

त्यामुळे तुम्ही 95/- रुपये हे तुमची स्टॉप लॉस लिमिट निश्चित करता. म्हणजेच 95/- रुपये किंमत आल्यावर तुमचे शेअर्स लॉसमध्ये विकुन टाकता आणि तुमचा लॉस “स्टॉप” करता. यालाच “स्टॉप लॉस” असे म्हणले जाते.

 

stop loss IM 2

 

इंट्राडे ट्रेडिंग करताना आपण बरेचदा “शॉर्ट सेलिंग”सुद्धा करतो. शॉर्ट सेलिंग म्हणजेच आधी शेअर विकणे आणि मार्केट बंद होण्या अगोदर ते शेअर्स पुन्हा खरेदी करणे. यामध्ये देखील स्टॉप लॉसचा वापर केला पाहिजे. समजा एखादा शेअर सध्या 100/- रुपयांवर ट्रेड करीत आहे.

तुम्हाला असे वाटत आहे, की आज मार्केट बंद होण्यापूर्वी हा शेअर खाली पडु शकतो आण्नि 90/- रुपयांवर येऊ शकतो, तर तुम्ही तो शेअर आधी विकुन टाकता.

अश्या परिस्थितीमध्ये समजा तुमचा अंदाज चुकला आणि शेअर खाली न येता वर वर जाऊ लागला तर तुम्ही 105/- रुपयांवर स्टॉप लॉस लावुन त्या शेअरमध्ये बाहेर पडता.

स्टॉप लॉस कसा लावावा?

समजा तुम्ही इंट्राडे साठी स्टॉक खरेदी करीत असाल तर-

1- पहिले आपली खरेदीची ऑर्डर टाकावी. (उदा- 100/- रुपये खरेदी किंमत)

2- यानंतर आपली स्टॉप लॉसची ऑर्डर टाकावी. ही सेलिंग ऑर्डर असते (उदा- 95/- रुपये.) स्टॉप लॉस ऑर्डर टाकताना ट्रिगर प्राईज विचारली
जाईल. ट्रिगर प्राईज 95/- पेक्षा थोडीशी जास्त ठेवावी (उदा- 95.10/- रुपये) असे केल्यामुळे आपली स्टॉप लॉस ऑर्डर प्लेस होईल आणि समजा शेअर खाली पडु लागला तर 95.10/- ला आपली सेलिंग ऑर्डर ट्रिगर होऊन आपले शेअर्स 95/- रुपयांना विकले जातील.

3- टारगेट ऑर्डर लावुन ठेवली असल्यास स्टॉप लॉस झाल्यानंतर ती कॅन्सल करावी.

 

stop loss 3 IM

समजा तुम्ही इंट्राडे साठी स्टॉक शॉर्ट सेल करीत असाल तर –

1- पहिले आपली विक्रीची ऑर्डर टाकावी. (उदा- 100/- रुपये विक्री किंमत)

2- यानंतर आपली स्टॉप लॉसची ऑर्डर टाकावी. ही बायिंग ऑर्डर असते (उदा- 105/- रुपये.) स्टॉप लॉस ऑर्डर टाकताना ट्रिगर प्राईज विचारली जाईल. ट्रिगर प्राईज 105/- पेक्षा थोडीशी कमी ठेवावी (उदा- 104.90/- रुपये) असे केल्यामुळे आपली स्टॉप लॉस ऑर्डर प्लेस होईल आणि समजा शेअर वर जाऊ लागला तर 104.90/- ला आपली बायिंग ऑर्डर ट्रिगर होऊन आपले शेअर्स 105/- रुपयांना खरेदी होतील.

3- टारगेट ऑर्डर लावुन ठेवली असल्यास स्टॉप लॉस झाल्यानंतर ती कॅन्सल करावी.

समजा तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग (डिलिव्हरी) साठी स्टॉक खरेदी करीत असाल तर-

1- पहिले आपली खरेदीची ऑर्डर टाकावी. (उदा- 100/- रुपये खरेदी किंमत
2- पोझिशनल ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस ऑर्डर लावुन ठेवता येत नाही. कारण रोजच्या ऑर्डर्स दररोज कॅन्सल होतात (अपवाद- काही ब्रोकर्स GTT सारखी फॅसिलिटी देतात, GTT ऑर्डर्स कॅन्सल न होता तश्याच राहतात.)
3- पोझिशनल ट्रेडिंग करताना शेअर्स घेतल्यानंतर दररोज संध्याकाळी शेअरचा भाव बघत राहणे आवश्यक आहे. ज्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपला स्टॉप लॉस क्रॉस झालेला दिसेल त्याच्या दुसर्‍या दिवशी मार्केट ओपन होताच मार्केट रेटला आपले शेअर्स विकुन टाकणे योग्य ठरते.

इक्विटी मार्केटमध्ये डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग करताना शॉर्ट सेलिंग करता येत नाही त्यामुळे इथे स्टॉप लॉसचा प्रश्न उद्भवत नाही. शेअर ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्याकरिता “स्टॉप लॉस”चा वापर करणे हे अनिवार्य आहे.

स्टॉप लॉस कसा लावावा याविषयीचा माझा व्हिडिओ तुम्हाला पुढील लिंकवर बघता येईल – https://youtu.be/T-SHLFmUXtA

 

neeraj borgaonkar 2 IM

 

शेअर मार्केट आणि गुंतवणूक या विषयाबद्दल सोप्या भाषेमध्ये माहिती देणारे अनेक व्हिडिओज्‌ माझ्या Neeraj Borgaonkar युट्यूब चॅनलवर मी अपलोड करीत असतो.

पुढील लिंकवर क्लिक केल्यास माझा युट्यूब चॅनल बघता येईल – https://marathimarket.in/youtube शेअर मार्केटबद्दल नवनविन माहिती जाणून घेण्याकरिता Neeraj Borgaonkar या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.

===

टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?