' भाजपच्या या नेत्याची हत्या झाली आणि सुरु झालं काश्मिरी पंडितांच्या मृत्यूचं थैमान – InMarathi

भाजपच्या या नेत्याची हत्या झाली आणि सुरु झालं काश्मिरी पंडितांच्या मृत्यूचं थैमान

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रकाशित झाल्यापासून १९९० साली काश्मीर खोऱ्यात हिंदूंच्या निर्दयी हत्या आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या गोष्टी आपल्याला ऐकायला आणि वाचायला मिळत असतीलचं. दरम्यान, तुम्ही काश्मिरी पंडित टिकालाल टपलू यांचे नावही ऐकले असेल. पंडित टिकलाल टपलू यांची १९८९ मध्ये हत्या झाली होती आणि येथूनच हिंदूंवर अत्याचार सुरु झाले.

 

kashmiri pandits 2 IM

 

● टिकालाल टपलू यांचे जीवन :-

टिकालाल टपलू यांचा जन्म १९३० मध्ये झाला होता. त्यांनी १९४५ मध्ये पंजाब विद्यापीठातून मॅट्रिक केले आणि त्यानंतर १९५८ मध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून एमए एलएलबी पूर्ण केले. सुरुवातीला ज्याप्रकारे इतर काश्मीरी हिंदूंना विद्यापीठात प्रवेश नाकारले गेले त्याचप्रकारे त्यांना देखील विद्यापीठात प्रवेश नाकारण्यात आले. यानंतर प्रवेश मिळवण्यासाठी ते आंदोलनाला बसले.

कायद्यातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते काश्मीर बार असोसिएशनमध्ये सामिल झाले. १९७१ मध्ये त्यांनी जम्मू-काश्मीरच्या उच्च न्यायालयात वकील म्हणून काम सुरु केले.

 

tiku im

 

वकीलीसोबतच टिकालाल टपलू हे त्यावेळी भाजपचे उपाध्यक्ष ही होते. सोबतच त्यांनी अनेक वर्ष आरएसएस मध्ये ही काम केले होते. काश्मिरी पंडितांमध्ये ते एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून लोकप्रिय होते. लोक त्यांना लालाजी म्हणून बोलवायचे, लालाजी म्हणजे मोठा भाऊ. त्यांच्या हत्येचा कट दहशतवादी बऱ्याच दिवसांपासून रचत होते आणि याविषयी टपलू यांना ही कल्पना होती.

त्यामुळेच कट्टरपंथीयांपासून कुटुंबला वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाला काश्मिर पासून दूर दिल्ली येथे आणून सोडले आणि काश्मीरमधील आपल्या लोकांकडे परत आले. याच्या काहीच दिवसांनंतर १४ सप्टेंबर १९८९ रोजी वकील आणि भाजपचे उपाध्यक्ष असलेल्या टिकलाल टपलू यांची हत्या करण्यात आली होती.

आपल्या कुटुंबाला दिल्लीला सोडून टिकालाल टपलू ८ सप्टेंबर १९८९ रोजी चिंक्राल मोहल्ला येथील त्यांच्या घरी परतले, याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांना जीवे मारण्याचा घाट रचला. यानंतर ठरलेल्या योजनेनुसार त्यांना भिती घालण्यासाठी त्यांच्या घरावर १२ सप्टेंबर रोजी हल्ला करण्यात आला. हा हल्ला करण्यामागे दहशतवाद्यांचा असा कयास होता की, टिकालाल यांनी काश्मिर सोडून जावे. परंतु या घटनेमुळे टिकालाल जरा ही डगमगले नाहीत.

 

tiku im1

 

या घटनेनंतर दोनच दिवसांनी त्यांच्यासोबत अजुन एक घटना घडली. ती सकाळ दररोज प्रमाणे टिकालाल यांच्यासाठी एक सामान्य सकाळ होती. त्यांना कल्पना होती की दहशतवादी त्यांच्यावर कधीही हल्ला करू शकतात. मात्र असे असतानाही ते त्यादिवशी घराबाहेर पडले आणि यामागचे कारण म्हणजे त्यांच्या घराबाहेर एक पोरगी खुप जोरजोराने रडत होती. टपलू तिच्याकडे गेल्यावर त्यांनी तिच्या आईला, ही का रडत आहे असे विचारले. आईने सांगितले की, ‘मुलीच्या शाळेत पैसे मागवले आहे आणि तिच्याकडे पैसे नाहीत म्हणून ती रडत आहे.’

त्या मुलीच्या आईचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यावर, टिकालाल यांनी आपल्या खिशातून पाच रुपये काढले आणि मुलीला दिले. तेवढ्यातच समोरून दहशतवादी बंदूक घेऊन आले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हत्येने दहशतवाद्यांचे दोन टास्क पूर्ण झाले होते. एक म्हणजे टिकालाल हे आता कायमचे त्यांच्या मार्गातून निघून गेले आणि दुसरे म्हणजे, निजाम-ए-मुस्तफाचा संदेश जो त्यांना काश्मिरी पंडितांपर्यंत पोहोचवायचा होता तो प्रत्येक पंडितांच्या घरी पोहोचला होता.

 

gun point inmarathi
bingedaily.in

 

या एका हत्येमुळे परिस्थिती इतकी भयानक झाली की लोकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला आणि अनेक दिवस घरांमध्ये कोंडून ठेवले. टिकालाल टपलू यांच्यावर गोळी झाडत असतांना दहशतवाद्यांनी पुढील नारे दिले होते :-

यहाँ क्या चलेगा, निजाम ए मुस्तफा ला शरकिया ला गरबिया, इस्लामिया इस्लामिया; जलजला आया है कुफ्र के मैदान मेंलो मुजाहिद आ गए हैं मैदान में…

टिकालाल टपलू हे समाजसेवक ही होते, त्यांनी अनेक विधवा महिला आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःचे पैसे खर्च केले होते. सोबतच त्यांनी अनेक गरीब मुस्लिम मुलींची लग्नेही करून दिली होती. त्यांचे व्यक्तिमत्व असे होते की लोक जात, धर्म, धर्म यांच्या वरती उठून त्यांना मान-सन्मान देत होते. याच कारणामुळे दहशतवाद्यांना ते खटकत असत.

 

kashmiri pandit inmarathi 6

त्यांच्या अंतिम यात्रेवेळी, केदार नाथ साहनी आणि लालकृष्ण अडवाणी सारखे अनेक दिग्गज चेहरे आणि त्यांच्यासोबतच हजारो काश्मिरी हिंदू श्रीनगरमध्ये पोहोचले होते आणि या घटनेच्या निषेधार्थ काश्मिरी हिंदू संघटनांनी बंदचे आयोजन केले होते, तेव्हा JKLF ने या अंतिम यात्रेवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, यावेळी ते आपल्या हेतूंमध्ये यशस्वी होऊ शकले नाही. पण, काश्मिरी पंडितांना या सर्वांत फुटीरतावादी हेतूंची कल्पना नक्कीच आली होती. त्यामुळे या घटनेपासूनच काश्मिरी हिंदूंनी काश्मिर मधून पलायन करने सुरु केले होते.

काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराची जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा पंडित टिकलाल यांची हत्या ही या ऐतिहासिक घटनेतील पहिली घटना ठरते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?