' हेमामालिनी-धर्मेंद्रच्या लग्नानंतर त्यांच्या पहिल्या बायकोची काय होती प्रतिक्रिया – InMarathi

हेमामालिनी-धर्मेंद्रच्या लग्नानंतर त्यांच्या पहिल्या बायकोची काय होती प्रतिक्रिया

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

धर्मेंद्र- हेमामालिनी ही सगळ्यांची लाडकी जोडी. धर्मेंद्र त्यांच्या फिटनेस आणि पडद्यावर चांगल्या अभिनयासाठी ओळखले जातात. धर्मेंद्र यांनी आतापर्यंत दोन लग्न केली आहेत, पहिले प्रकाश कौरसोबत, तर दुसरे लग्न बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनीसोबत केले आहे.

हेमासोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी चक्क आपला धर्म ही बदलला होता असं म्हटलं जातं. धर्मेंद्र यांनी केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे त्यांचे चाहतेही त्यांच्यावर बराच काळ नाराज होते. या सगळ्यात कॅमेरापासून नेहमी दूर राहणाऱ्या धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनीही आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल आपले दुःख व्यक्त केले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

धर्मेंद्र यांनी १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्याशी पहिले लग्न केले होते. लग्नाच्या वेळी धर्मेंद्र यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवातही केली नव्हती.

त्यांनी १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. आज ८६ वर्षांचे धर्मेंद्र- हेमा मालिनी यांच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठे आहेत.

 

dharmendra hema im

 

धर्मेंद्र- हेमा यांची प्रेमकहाणी ही खूप रंजक आहे. जेव्हा धर्मेंद्र हेमाला पहिल्यांदा भेटले होते तेव्हा ते आधीच विवाहित होते. तसेच धर्मेंद्र विवाहित असल्यामुळे हेमाच्या घरच्यांचाही या नात्याला विरोध होता.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी जवळपास २५ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. हेमा त्या काळात ‘ड्रीम गर्ल’ म्हणून प्रसिद्ध होती.

हेमा मालिनी दिसायला एवढ्या सुंदर होत्या, की विवाहित असूनही धर्मेंद्र तिच्या प्रेमात पडला. १९७० मध्ये ‘तुम हसीन मैं जवान’ चित्रपटाचे शूटिंग सूरु असतांना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, परंतु धर्मेंद्र विवाहित होते आणि हिंदू धर्माप्रमाणे दूसरे लग्न करणे हे पाप समजले जायचे. तसेच त्यांना पहिली पत्नी प्रकाश कौरपासूनही वेगळे व्हायचे नव्हते. त्यामुळे मग धर्मेंद्रने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि यानंतर त्यांनी आपले नाव बदलून दिलावर खान असे ठेवले होते.

जरी धमेंद्रने हेमा मालिनी सोबत दुसरे लग्न केले असले तरी त्यांनी त्यांच्या पहिली पत्नी प्रकाशसाठी, पती-पत्नीमध्ये असणारे सर्व कर्तव्ये पार पाडली आहेत. लग्नापूर्वी त्यांनी हेमासमोर एक अट ठेवली होती की लग्नानंतर ते कधीही पहिली पत्नी म्हणजेच प्रकाश आणि त्यांच्या मुलांना आणि कुटुंबाला सोडणार नाही.

 

dharmendra prakash im

 

हेमाने देखील धर्मेंद्रची ही अट विनाशर्त मान्य केली. त्यानंतर १९७५ मध्ये शोले रिलीज झाल्यानंतर १९७८ मध्ये दोघेही लग्नाच्या रेशीमगाठेत बांधले गेले. मात्र सनी आणि बॉबी हेमाचा कधीही स्विकार करु शकले नाहीत.

प्रकाश कौर या कधीही मीडियासमोर आल्या नाहीत, पण आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नाचे दु:ख त्या मीडियापासून जास्त दिवस लपवू शकल्या नाहीत. एका मुलाखतीत त्यांनी धर्मेंद्रच्या दूसऱ्या लग्नाविषयी आणि बॉबी आणि हेमा मालिनी यांच्यात झालेल्या वादाविषयी मीडियाला माहिती दिली होती.

त्या म्हणाल्या- जर कोणताही पुरूष असता आणि त्याला आम्हांदोघांमधून कोणाला ही निवडण्याची वेळ आली असती, तर कोणत्याही पुरुषाने हेमालाच निवडले असते. त्यामुळे धर्मेंद्र आणि इतर पुरुषांमध्ये विशेष असा कोणतेही फरक नाही. तसेच बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये ही अनेक पुरुषांचे अफेयर सुरु असतात.

धर्मेंद्रबद्दल प्रकाश कौर पुढे म्हणाल्या की – धर्मेंद्र हा माझ्या आयुष्यातील पहिला आणि शेवटचा पुरुष आहे. तो माझ्या मुलांचा बाप आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि त्याचा आदर ही करते. जे व्हायचं होतं ते झालं. यासाठी मी धर्मेंद्रला दोष द्यायचा, की माझ्या नशिबाला दोष द्यायचा हेच कळत नाही. ते माझ्यापासून कितीही दूर असले तरी मला माहित आहे, की जेव्हा जेव्हा मला त्यांची गरज असेल तेव्हा ते माझ्यासोबत असतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?