' ‘मुस्लिमांच्या हत्येवरही चित्रपट बनवायला हवा’, IAS अधिकाऱ्याची दिग्दर्शकाला मागणी – InMarathi

‘मुस्लिमांच्या हत्येवरही चित्रपट बनवायला हवा’, IAS अधिकाऱ्याची दिग्दर्शकाला मागणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासूनच चर्चेत आहे. ११ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारावर आणि त्यांच्या पलायनावर आधारित आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून कालपर्यंत या चित्रपटाने २०० कोटी कमाई केली आहे. परंतु चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच सोशल मीडियावर याच्याशी संबंधित नवनवीन वाद निर्माण होत आहेत. कॉमेडियन कपिल शर्मापासून सुरू झालेला या वादामध्ये आता नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पण उडी घेतली आहे.

 

the kashmir files featured IM

 

द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर मध्यप्रदेश राज्याचे आयएएस अधिकारी नियाज खान यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केले आहे. सोशल मीडियावर चित्रपटाच्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे नाव न घेता त्यांनी ट्वीट केले की, ‘ द कश्मीर फाईल्स हे चित्रपट हिंदूंवर झालेले अन्याय आणि त्यांच्या वेदना दाखवते. परंतु आता यांना काश्मीरमध्ये सुरक्षित राहू देण्यासाठी प्रयत्न केले जावे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तसेच पुढे ते म्हणाले की, निर्मात्याने अनेक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिमांच्या होणाऱ्या हत्या दर्शविणारा चित्रपटही बनवला पाहिजे. मुस्लीम हे कीटक नसून मानव आणि या देशाचे नागरिक आहेत, असे त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये लिहीले आहे. या ट्विटनंतर एक वेगळेच वाद निर्माण झाले आहे.

 

muslims inmarathi
aaj tak

 

● कोण आहेत आयएएस अधिकारी नियाज खान

नियाज खान हे २०१५ बॅचचे मध्य प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते राज्य प्रशासकीय सेवेत अधिकारी होते, बढती मिळाल्यानंतर ते आयएएस अधिकारी झाले आहेत. ते सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. लेखनाचा छंद असल्याने त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यात सात कादंबऱ्यांचा समावेश आहे. सोबतच आपल्या धर्मावर ‘हिंसक’ असल्याचे डाग पुसून टाकण्यासाठी नियाझ संशोधनही करत आहेत.

 

niyaz im

 

इस्लामला बदनाम करण्यामागे अनेक संघटनांचा वाईट हेतू असल्याचेही त्यांनी एकदा म्हटले आहे. नियाज हे सतत कुठले ना कुठले वाद निर्माण करत असतात, यामुळे त्यांची सतत बदली होत राहते. याआधी पण नियाज खान हे बऱ्याच प्रकरणामध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे, जसे की :-

● आश्रम वेबसिरीज क्रेडिट प्रकरण

नियाज खान यांनी आतापर्यंत सहाहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. यापैकीच एका कादंबरीच्या आधारावर आश्रम वेबसिरीज बनवण्यात आली आहे आणि वेबसीरीज निर्मात्याने याचे त्यांना श्रेय न दिल्यामुळे, नियाज खान यांनी आश्रमचे निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. सध्या हा खटला न्यायालयात सुरूच आहे.

 

bobby aashram inmarathi

 

● स्वतःचे अडनाव

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटापूर्वी खान आडनावावर केलेल्या ट्विटमुळेही ते वादात सापडले आहे. जुलै २०१९ मध्ये, त्यांनी ट्विट केले होते की, मला माझी ओळख लपवायची आहे कारण मला वाटते की खान अडनावमुळे माझीही लिंचिंग होऊ शकते, त्यामुळे जर मी कुठले नवीन नाव वापरले तर ते नवीन नाव मला मॉब लिंचिंगसारख्या घटनांपासून वाचवू शकेल. तसेच मी कुर्ता-टोपी पण घालत नाही आणि दाढीही ठेवत नाही, यामुळे मी माझी ओळख मॉब-लिंचिंग करणाऱ्या संघटनेपासून वाचवू शकतो. खान आडनाव भुतासारखे माझ्या मागे लागले आहे, असेही नियाजने म्हटले होते.

 

 

● अबू सलेम आणि नियाज खान.

आईएएस अधिकारी नियाज खान यांनी अबू सालेमच्या प्रेमकथेवर एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी अनेक रंजक कथा मांडल्या आहेत. लव्ह डिमांड्स ब्लड असे या कादंबरीचे नाव असून ही एक अॅक्शन पॅक्ड थ्रिलर कादंबरी आहे. या कादंबरीसाठी २०१७ मध्ये नियाज खान म्हणाले की, अबू सालेम हे माझ्या पुस्तकातील मुख्य पात्र आहे.

 

abu salem inmarathi

 

सालेमसोबत एक महिना तुरुंगात काढण्यासाठी त्याने सरकारकडे अर्ज केला होता. यामागे त्यांनी अबू सालेमला समजून घ्यायचे आहे, असा युक्तिवाद केला होता. मात्र सरकारने त्यांना परवानगी दिली नाही. त्यावेळी नियाज खान गुना जिल्ह्यात एडीएम होते.

● नियाज यांना अग्निहोत्री यांचे उत्तर :-

नियाज खान यांनी रविवारी ट्विट केले की, ‘द काश्मीर फाइल्स’चे उत्पन्न १५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. काश्मिरी पंडितांच्या भावनांचा लोकांनी खूप आदर केला आहे. आता चित्रपट निर्मात्याने चित्रपटद्वारे झालेली सर्व कमाई काश्मिरी पंडितांच्या शिक्षणासाठी आणि काश्मीरमध्ये त्यांच्यासाठी घरे बांधण्यासाठी हस्तांतरित करावी, तसेच ही एक खुप मोठी देणगी असेल.’

 

vivek agnihotri inmarathi

यावर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी उत्तर दिले की, ‘सर, नियाज खान साहेब, मी २५ मार्चला भोपाळला येत आहे. मला तुम्हाला भेटण्यासाठी वेळ द्या जेणेकरून आम्ही कशी मदत करू शकतो याबद्दल विचारांची देवाणघेवाण करू शकू. तसेच तुम्ही तुमच्या पुस्तकांची रॉयल्टी आणि आयएएस अधिकारी म्हणून तुम्ही आमची कशी मदत करू शकाल, यांवर ही चर्चा करु.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?