' काश्मीर फाईल्समध्ये पल्लवी जोशीने साकारलेली वादग्रस्त प्रोफेसर आहे तरी कोण? – InMarathi

काश्मीर फाईल्समध्ये पल्लवी जोशीने साकारलेली वादग्रस्त प्रोफेसर आहे तरी कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

या वर्षाची सुरवात गाजली ती युक्रेन-रशिया यांच्यामधील युद्धाने, त्याचबरोबर ती गाजली सिनेमा गृहात प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या आशय आणि विषयांवरील चित्रपटांनी. यात आघाडीवर नाव घ्यावे लागेल ते काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे.

अंगावर शहरे आणणारा नरसंहार आणि तत्कालीन व्यवस्थेने ते बघतानाही डोळ्यांवर ओढलेली जाड कातडी यांची रक्तरंजित कहाणी काश्मीर फाईल्स आपल्यासमोर उभी करतो.

 

the kashmir files 2 IM

 

जशी या सिनेमाची कहाणी आपल्याला रडवते तशीच आपल्याला सुन्न करतात या सिनेमातील पात्रे, जी आपल्याच आजूबाजूला कुठेतरी वावरत असतात.

यातीलच एक पात्र म्हणजे JNU मधील प्राध्यापिका राधिका मेनन हिचे पात्र. प्रा. निवेदिता मेनन यांच्यावर आधारित हे पात्र चित्रपटात साकारले आहे अभिनेत्री पल्लवी जोशीने.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तुम्ही जर काश्मीर फाईल हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की राधिका मेनन हीचे पात्र ज्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे त्या प्रत्यक्षातल्या प्रा. निवेदिता मेनन या नक्की आहेत तरी कोण? चला तर मग जाणून घेवू निवेदिता मेनन यांच्याविषयी.

 

nivedita menon IM

 

तुम्ही ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिला असेल तर तुम्हाला अनेक पात्रांबद्दल उत्सुकता असेल. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याने त्यातील पात्रही वास्तविक जीवनापासून प्रेरित आहेत. पल्लवी जोशी ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) प्रोफेसर राधिका मेननची भूमिका साकारत आहे.

हे पात्र JNU मधील विद्यार्थ्यांना ‘काश्मीरच्या आझादी’ साठी भडकवताना दिसत आहे. राधिकाने चित्रपटातील मुख्य पात्र ‘कृष्णा पंडित’चे ब्रेनवॉश करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

ती त्याला दहशतवादी बिट्टा कराटे यांच्याशी संपर्क करते जे जेकेएलएफ प्रमुख फारुख अहमद दार यांच्यावर आधारित आहे.

पल्लवी जोशीचे पात्र JNU च्या प्राध्यापिका निवेदिता मेननशी मिळतं जुळतं आहे तसंच काही ठिकाणी या पात्रात अरुंधती रॉय यांचीसुद्धा झाक दिसते. २०१६ मध्ये जेएनयूच्या विद्यार्थ्यांमध्ये निवेदिता यांनी दिलेल्या भाषणावरून बराच वाद झाला होता. ते भाषण चित्रपटात ठळकपणे दाखवले आहे.

 

nivedita menon 3 IM

निवेदिता या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. त्यांना राजकीय सिद्धांत, स्त्रीवादी सिद्धांत आणि भारतीय राजकारणात विशेष रस आहे. युनिव्हर्सिटीच्या ‘सेंटर फॉर कम्पेरेटिव्ह पॉझिटिव्ह अँड पॉलिटिकल थिअरी’ मध्ये शिकवणाऱ्या निवेदिता यांची शिक्षण क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख आहे.

JNU मध्ये येण्यापूर्वी त्यांनी लेडी श्रीराम कॉलेजमध्ये १५ वर्षे अध्यापन केले. प्राध्यापक निवेदिता यांचे विचार वादग्रस्त आहेत. त्यांच्यावर भारत आणि हिंदू विरोधी विचार असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला आहे.

चित्रपटातील राधिका मेनन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ‘काश्मीरच्या आझादी’ साठी भडकवताना दाखवली आहे. चित्रपटातील ‘कृष्णा पंडित’ याचा ब्रेन वॉश करण्यासाठी ती हर एक प्रयत्न करते!

 

darshan kumar IM

 

मार्च २०१६ मध्ये JNU मध्ये खूप मोठे विद्यार्थी आंदोलन झाले होते. त्यावेळी निवेदिता मेनन यांनी राष्ट्रवादी तत्त्वे आणि काश्मीरचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यावर भाषण केले.

निवेदिता यांनी आपल्या भाषणात ‘भारताने काश्मीरवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे’ असे म्हटले होते. निवेदिता यांच्या भाषणाविरोधात ABVP नेत्याने पोलिसात तक्रार दाखल केली होती.

मित्रांनो व्यक्ति तितक्या प्रवृत्ती असे म्हंटले तरी सिनेमा मध्ये दाखवली जाणारी पात्रे ही आपल्याच समाज मनाचे आरसे असतात आणि ते कुठेनाकुठे तरी आपल्या आजूबाजूला वावरतांना दिसतात.

 

nivedita menon 4 IM

 

काश्मीर फाईल्स मधील राधिका मेनन हे पात्र जेएनयू मधील प्रा. निवेदिता मेनन यांच्या जवळपास जाणारं असेल तर त्यात नक्कीच नवल नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?