' स्वातंत्र्यापूर्वीपासून राजकारणात सक्रिय असलेल्या MIM चा इतिहाससुद्धा वादग्रस्तच आहे! – InMarathi

स्वातंत्र्यापूर्वीपासून राजकारणात सक्रिय असलेल्या MIM चा इतिहाससुद्धा वादग्रस्तच आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाविकास आघाडीकडे नुकताच MIM ने युतीचा प्रस्ताव ठेवल्याने सध्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा होताना दिसत आहे. यामुळे सध्या पुन्हा शिवसेनेवर सर्व स्तरातून टीका होत आहे.

शिवसेनेला किंवा महाविकास आघाडीला जरी लोकं आत्ता नावं ठेवत असले तरी MIM सुद्धा कमी वादग्रस्त नाहीये हे आपण जाणतोच.

 

MIM and shivsena IM

 

असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचा पक्ष AIMIM हे नेहमीच कुठले ना कुठले वाद निर्माण करतात. MIM च्या नेत्यांच्या वक्तव्यावरून देशात अनेकदा राजकारण तापले आहे. खुद्द असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्यावरुन पण अनेकदा गदारोळ निर्माण झाला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जसे की एकदा वारिस पठाण हे कर्नाटकातील गुलबर्गा येथील सभेत भाषण करत होते. या सभेमध्ये तेव्हा सुरु असलेल्या सीएए आणि एनआरसी निदर्शनांबद्दल वारिस पठाण म्हणाले होते की, “१०० कोटी हिंदूंवर आम्ही फक्त १५ कोटी मुसलमान भारी आहोत, तसेच १५ मिनीट साठी पुलिस हटवून बघा, मग दाखवू आम्ही आमची ताकद.”

अशी अनेक वादग्रस्त विधान या पक्षाच्या नेत्यांनी दिली आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्येच हा पक्ष वादात अडकला आहे असे नसून, MIM चा इतिहासचं वादग्रस्त राहिला आहे.

 

AIMIM IM

 

भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळीदेखील या पक्षामुळे बरेच वाद निर्माण झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया MIM चा राजकीय इतिहास.

एआयएमआयएम (AIMIM)चा इतिहास :-

MIM ची स्थापना १९२७ मध्ये हैदराबादचे नवाब उस्मान अली खान यांच्या सल्ल्यानुसार झाली होती आणि हा पक्ष निजाम समर्थक पक्ष होता. तेव्हा त्याचे नाव मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन होते.

१९३८ मध्ये बहादूर यार जंग यांना पक्षाचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यानंतर हैदराबाद आणि आसपासच्या भागात पक्षाला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळू लागली. १९४४ मध्ये बहादूर यार जंग यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर, कासिम रिझवी या पक्षाचे नवीन अध्यक्ष झाले.

 

kasmi rizvi IM

कासिम रिझवी कोण होते :-

रझाकारांची फौज तयार करण्यामागे कासिम रिझवी यांनी खुप मेहनत घेतली होती. ही फौज ऑपरेशन पोलो दरम्यान हैदराबादच्या निजामाच्या वतीने भारत सरकारसमोर उभी होती.

रिझवी आणि एमआयएमची मागणी होती की निजाम हैदराबादचा भाग दक्षिण पाकिस्तान म्हणून ओळखला जावा. म्हणजेच हे लोक भारतात सामिल होण्याच्या विरोधात होते. रझाकारांच्या या फौजेने त्यावेळी हैद्राबादमध्ये हिंदूंमध्ये भयंकर दहशत निर्माण केली होती.

हैद्राबाद ताब्यात आल्यानंतर :-

हैद्राबादच्या निजामाने भारतात भेटण्याचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर भारत सरकारला कठोर पावले उचलावी लागली. हैद्राबादला भारतात विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो अंतर्गत लष्करी कारवाई करण्यात आली.

 

operation polo IM

 

यानंतर हैद्राबादच्या निजामाला भारतासमोर नतमस्तक व्हावे लागले पण यादरम्यान या भागात खुप मोठ्या आणि भयंकर दंगली झाल्या होत्या.

त्यावेळी झालेल्या हिंसाचारात तीस ते चाळीस हजार लोकांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते. या सगळ्यामागे MIM म्हणजेच रझाकारांचा मोठा हात असल्याचे म्हंटले जाते.

पक्षावर बंदी आणि कासिम रिजवी :-

१९४८ मध्ये भारत सरकारने MIM वर बंदी घातली आणि कासिम रिझवीला तुरुंगात टाकले. कासिम रिझवी यांना ९ वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले होते. यानंतर १९५७ मध्ये जवाहरलाल नेहरू सरकारने कासिम रिझवी यांना पाकिस्तानात जाण्याच्या अटीवर सोडले. कासिम रिझवीने आपल्या पाकिस्तानी सूत्रांमार्फत तेथे आश्रय मिळवला.

कासिम रिझवी यांनी सुटकेनंतर पहिली गोष्ट केली की त्यांनी पक्षाची सर्व सत्ता अब्दुल वाहिद ओवैसी(असदुद्दीन यांचे आजोबा) यांच्याकडे सोपवली.

 

abdul wahed owaisi IM

 

अब्दुल वाहिद ओवैसी हे हैदराबादमधील एक नामी वकील होते आणि त्यांनी एमआयएमचे नामांतरण ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन असे केले.

यानंतर हैदराबाद मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये यांनी सहभाग घ्यायला सुरुवात केली. १९५९ मध्ये या पक्षाने पहिल्यांदाच दोन नगरपालिका पोटनिवडणुका जिंकल्या.

यानंतर १९७५ मध्ये अब्दुल वाहिद यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सुलतान सलाहुद्दीन ओवैसीसी (असदुद्दीन यांचे वडील) यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले. सलाहुद्दीन यांनी १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून नामांकन भरले आणि त्यांनी तेव्हा विजय पण मिळवला.

यानंतर त्यांनी खासदार म्हणून एकूण ६ टर्म पूर्ण केल्या आणि यानंतर त्यांनी २००४ मध्ये आपली परंपरागत सीट असदुद्दीनसाठी सोडली.

 

asaduddin father IM

 

२००४ च्या निवडणुकीत विजायाची घोडदौड सुरु ठेवत, असदुद्दीन ओवेसी यांनी ही जागा जिंकली आणि यानंतर अजुनही तेच खासदार आहेत.

पाच दशकांत हैदराबादमध्ये या पक्षाचा प्रभाव कमालीचा वाढला आहे. तेलंगणा विधानसभेत या पक्षाचे सात आमदार आणि विधान परिषदेत दोन सदस्य आहेत. मजलिसकडे मुस्लिम राजकीय संघटना म्हणून पाहिले जाते आणि हैदराबादचे तसेच देशामधील मुस्लिम या पक्षाला जोरदार पाठिंबा देत आहेत.

आज MIM एक वाढता पक्ष आहे आणि याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ओवैसी कुटुंब अनेकदा वादातही राहिले आहे. अनेकदा ओवैसी बंधूंना त्यांच्या घरामधूनच विरोध असल्याच्या वावड्या उठतात, परंतु अजुनही पक्षाची पूर्ण सत्ता त्यांनी स्वतःच्याच हातात ठेवली आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?