' 'द काश्मीर फाईल्स'ने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात घडवलेले ५ मोठे बदल!

‘द काश्मीर फाईल्स’ने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात घडवलेले ५ मोठे बदल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी नुकताच एका व्हिडिओच्या माध्यमातून ‘द कश्मीर फाईल्स’ या सिनेमाला तिसरी राजकीय त्सुनामी असं म्हंटलं आहे. खरंतर अगदी योग्य विश्लेषण भाऊ तोरसेकर यांनी केलं आहे.

पहिली त्सुनामी म्हणजे जनलोकपाल बिल आंदोलन, दुसरी त्सुनामी म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून निवडून येणं आणि त्यांनंतर आलेली तिसरी त्सुनामी म्हणजे ‘द कश्मिर फाईल्स’ हा सिनेमा!

 

the kashmir files 1

 

बघायला गेलं तर नक्कीच यात तथ्य आहे, कारण गेला आठवडाभर एकंदरच सोशल मिडियावर ज्याप्रकारच्या चर्चा होत आहेत, ते पाहता हा सिनेमा उर्वरित सगळे रेकॉर्ड मोडत वेगळा इतिहास रचणार हे नक्कीच आहे.

गेले काही दिवस या सिनेमावरुन प्रचंड चर्चा, वाद घडतायत. सोशल मीडियावर प्रत्येकजण या सिनेमाविषयी व्यक्त होतोय. काही लोकं प्रशंसा करतायत तर काही लोकं समाजात द्वेष पसरवला जातोय म्हणून गळे काढतायत, तर काही लोकं झुंड, पावनखिंड की काश्मिर फाईल्स? अशी मूर्खासारखी तुलना करतायत!

 

jhund kashmir files IM

 

या तीनही सिनेमांना चांगलंच यश मिळालं असून लोकं तिन्ही सिनेमांसाठी गर्दी करतायत. कश्मिर फाईल्सची चर्चा जास्त होत आहे कारण कोणत्याही प्रमोशनशिवाय या सिनेमाने केवळ माउथ पब्लिसिटीवर एवढी मजल मारली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खुद्द राम गोपाल वर्मा यांनीसुद्धा “यापुढे बॉलीवूड २ भागात विभागलं जाईल pre-kashmir files आणि post-kashmir files” असं म्हणत ट्विट केलं.

खरंच या सिनेमाने असा बदल घडवला आहे का याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत. ‘द कश्मिर फाईल्स’ने राजकीय, मनोरंजन तसेच सामाजिक वर्तुळात नेमके काय बदल घडवून आणलेत त्यावर आपण एक नजर टाकुया!

१. सोशल मीडियावर हलकल्लोळ :

 

the kashmir files 4 IM

 

याआधीसुद्धा काश्मिर फाईल्ससारखे सिनेमे आले. परजानीयासारखा गुजरात हत्याकांडावर बेतलेला सिनेमासुद्धा आला, रोज बॉम्बे अशी कित्येक उदाहरणं देता येतील, पण त्यावेळेस सोशल मिडीया हा एवढा अॅक्टिव नव्हता किंबहुना सोशल मीडिया नव्हताच!

कश्मिर फाईल्सच्या बाबतीत मात्र सोशल मीडियाने खूप मोठा हातभार लावला. कोणत्याही प्रतिथयश माध्यमांनी प्रमोशन केलं नसलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाचं चांगलंच प्रमोशन झालं, आणि ९ दिवसांत तब्बल सिनेमाने १०० करोडहून अधिक कमाई केली!

२. राजकीय वर्तुळात खळबळ :

 

kashmir files team IM

 

हा सिनेमा राजकीय घडामोडींवरच बेतला असल्याने या सिनेमातून ठराविक एका पक्षाची बाजू घेणं हे हमखास होणारच. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ माजली आहे.

विरोधकांनी हा सिनेमा भाजपाने स्पॉन्सर केलेला प्रॉपगंडा सिनेमा आहे म्हणून टाहो फोडला तर एकीकडे खुद्द भाजपने या सिनेमाला चांगलाच उचलून धरला आहे.

संसदेतल्या सदस्यांपासून मोदी अमित शहापर्यंतच्या मोठमोठ्या नेत्यांनी सिनेमा बघून त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे, इतकंच नाही भाजप शासित काही राज्यांमध्ये हा सिनेमा टॅक्स फ्रीदेखील करण्यात आला आहे!

सिनेमा आणि राजकारण ही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही, पण काश्मिर फाईल्सच्या बाबतीत ज्यापद्धतीने या घटना घडतायत त्यावरून कोणताही सामान्य माणूस त्याच्या परीने अनुमान नक्कीच लावू शकतो!

३. डाव्यांवर उजवे भारी :

 

right vs left IM

आजवर कला आणि साहित्य क्षेत्रावर डाव्या विचारसणीचा पगडा होता हे सत्य मान्य करावंच लागेल. पण काश्मिर फाईल्सने याच डाव्या विचारसरणीचा मुखवटा फाडून त्यामागचं विद्रूप सत्य बाहेर आणलं आहे.

कशाप्रकारे डाव्या विचारसरणीच्या लोकांनी आपला इतिहास आपली संस्कृति त्यांना हवी तशीच दाखवली आणि त्याचं कशाप्रकारे विद्रूपीकरण केलं हे आता लोकांसमोर यायला सुरुवात झाली आणि ही सुरुवात केलीये ती म्हणजे विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मिर फाईल्सने!

४. बॉलिवूडचा बुरखा फाडला :

 

bollywood hypocrisy IM

 

द काश्मिर फाईल्सची जेव्हा घोषणा झाली तेव्हापासूनच बॉलीवुडने आणि भारतीय मीडियाने शक्य होईल तेवढं या सिनेमाकडे दुर्लक्ष केलं. अमेरिका लंडनमध्ये शोजकरूनसुद्धा इथल्या मीडियाने त्यांची दखलदेखील घेतली नाही.

रिलीजच्या आधीपर्यंत कोणत्याही नामवंत चॅनलवर या सिनेमाचं प्रमोशन नाकारण्यात आलं. बॉलिवूडमधील काही मोजके लोकं सोडली तर प्रत्येकाने यावर मौन बाळगलं!

अखेर सिनेमा रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी तो उचलून धरला, त्यांनी स्वीकारला आणि तो आपलासा केला इथेच बॉलिवूडची हार झाली. जे मोठमोठ्या सुपरस्टारना जमलं नाही ते या सिनेमाने करून दाखवलं!

५. लोकांच्या विचारात स्पष्टपणा आला :

 

the kashmir files 5 IM

 

खरंतर सिनेमाला सुरुवातीला ५०० स्क्रीन मिळाल्या होत्या, बऱ्याच थिएटरमालकांनी तर या सिनेमाला प्रदर्शित करण्याससुद्धा नकार दिला होता. पण न भूतो न भविष्यती लोकांनी सिनेमाला अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला की आज तब्बल भारतभरात या सिनेमाला ४००० स्क्रीन्स मिळाल्या आहेत!

हे सगळं झालं ते फक्त आणि फक्त लोकांमुळे. लोकांनी सिनेमा पाहिला, सिनेमाविषयी चर्चा घडवून आणली आणि त्यामागच्या विचाराविषयी अधिक स्पष्ट पद्धतीने व्यक्त झाले.

सिनेमातून राजकीय भाष्य जरी केलं असलं, तरी लोकांनी त्यांना जे हवंय तेच त्यातून घेतलं आणि त्याविषयी स्पष्ट विचार मांडून त्याची आणखीन चर्चा केली.

या सिनेमाने हे चांगले बदल घडवले जरी असले तरी त्यातून चुकीच्या गोष्टीसुद्धा लोकांनी घेतल्या आणि यामुळेच धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण झाली. काही लोकांनी सिनेमाची pirated print सोशल मीडियावर व्हायरल केली. तर काही भाजप नेत्यांनी मोफत सिनेमा दाखवण्याचा विडा उचलला.

 

the kashmir files 6 IM

 

काही लोकांनी तर थिएटरमध्ये सिनेमा बंद पाडायचा प्रयत्न केला, पण तरी या सिनेमाने दाखवून दिलं की लोकांना चांगला कंटेंट दिला तर लोकं आवडीने पैसे खर्च करून तो बघतात आणि त्याविषयी भरभरून बोलतातदेखील.

सिनेमातून राजकीय भाष्य जरी केलं असलं किंवा एखादी बाजू घेऊन जरी कथा मांडली असली तरी जे सत्य आहे ते लोकांच्या मनाला भिडतं आणि लोकं ते डोक्यावर घेतात!

सिनेमा वाईट का चांगला हे ज्याचं त्याने ठरवावं पण जेव्हा एखादा सिनेमा जनतेचा होतो तिथेच तो सिनेमा जिंकतो आणि तो चित्रपट निर्माण करणारा फिल्ममेकरसुद्धा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?