' मनुष्याला हसू का येते? जाणून घ्या यामागची वैज्ञानिक कारणे...

मनुष्याला हसू का येते? जाणून घ्या यामागची वैज्ञानिक कारणे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हास्य हा मनुष्य जीवनाचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे. चेहऱ्यावरील स्मित, आनंदाच्या वेळी हसून हर्ष साजरा करण्याची पद्धत प्रत्येकच माणसाच्या जगण्याचा सहजसाध्य भाग असतो. आनंद झाला की चेहऱ्यावर स्मित येणं, खळखळून हसत आनंद साजरा करणं, या गोष्टी नैसर्गिकपणे घडतात. त्यामुळेच हसण्याला माणसाच्या जगण्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हसल्याने आयुष्य वाढतं, असाही शोध विज्ञानाने लावलेला आहे. त्यामुळेच नेहमी हसत राहावं, असं अनेकजण म्हणत असतात. मात्र ‘माणूस हसतो म्हणजे नेमकं काय होतं?’, ‘त्याला हसू का येतं?’ याचं वैज्ञानिक कारण तुम्हाला ठाऊक आहे का? नाही ना? चला तर मग, आज तेच जाणून घेऊया.

 

happy smile inmarathi
bestmediainfo.com

सगळ्यांना कळणारी भाषा…

हसणं ही नैसर्गिकरित्या येणारी आणि सगळ्यांना अगदी सहज कळणारी भाषा आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जन्माला येणार माणूस असो, ही भाषा त्याला येत नाही असं होणं अशक्य आहे. श्रीलंकेची सिंहली भाषा असो, फ्रान्समधली फ्रेंच, रशियामधली रशियन, भारतातल्या हिंदी, मराठी, गुजराथी, तामिळ, मारवाडी, गुजराथी अशा विविध भाषा असोत, जगातील सगळ्यात कठीण चिनी भाषा असो, किंवा जगभरात वापरली जाणारी इंग्रजी, त्या शिकायला कठीण आहेत.

 

languages inmarathi
kevin moseri

हास्याची भाषा मात्र वेगळी शिकावी लागत नाही. ती उपजतच असते. अगदी प्रत्येकाकडे असते. इंग्रजी भाषेला उगाचच जागतिक भाषा म्हणावं इतक्या सहजपणे ही हसण्याची भाषा जगभरातील सगळीच मंडळी वापरत असतात.

अंतर्मनाची करामत…

एखाद्या गोष्टीवर ठरवून हसायचं म्हटलं, तर ते तुम्हाला जमतं का? बहुदा तरी ही गोष्ट आपल्याला जमत नाही. एखाद्या छानशा फोटोसाठी स्मितहास्य आपण ठरवून चेहऱ्यावर आणू शकतो. मात्र गडगडाटी आणि मनापासून हसण्याचा, मोठ्याने हसण्याचा अनुभव हा अत्यंत नैसर्गिक असतो. असं ठरवून कधीही हसता येत नाही. हास्याचा खळखळाट व्हायचा असेल, गडगडाटी हास्य हवं असेल, तर ते नैसर्गिकपणे अंतर्मनातून यावं लागतं. आपल्याला हसू येणं, ही अंतर्मनाची करामत असते.

 

brain inmarathi

 

आपण ज्यावेळी हसतो त्यावेळी चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. एक विशिष्ट प्रकारचा आवाज यावेळी आपोआपच केला जातो. कधी कधी अगदी मनसोक्त हसताना, खांदे, हात, पाय, मान अशा अनेक अवयवांचा यात नकळतपणे समावेश होतो. या सगळ्या सूचना अवयवांना मेंदूकडून दिल्या जातात. मेंदूच्या या नेमक्या रचनेविषयी अजूनही फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र गुदगुल्या, विनोदनिर्मिती, कौतुकाचा अथवा आनंदी स्पर्श अशा विविध भावना आणि संवेदना हसण्याला कारणीभूत असतात. यावर मेंदू आणि अंतर्मन नियंत्रण ठेवत असते.

इतरांना दिली जाणारी सूचना…

एखाद्या व्यक्तीचं हास्य ही त्याच्या मेंदूने समोरच्याला दिलेली सूचना असते असं म्हणता येईल. तुम्ही एकटे असताना सहसा कधीही हसत नाही. स्वतःशी बोलत असताना किंवा एकटेच असताना हसण्याची क्रिया होणं अगदीच दुर्मिळ आहे. कारण आपलं हास्य हे आपल्या स्वतःसाठी नसतं. ती समोरच्या व्यक्तीला देण्यात आलेली सूचना असते. या प्रतिक्रिया देण्यासाठी मेंदू तयार असणं आवश्यक असतं. त्यामुळे लहानपणी, मूल जवळपास ३-४ महिन्याचं होईपर्यंत हसत नाही. त्यानंतर हसण्याची सुरुवात होते.

 

laughing inmarathi

हसणं ही एक प्रतिक्रिया आणि समोरच्याला देण्यात आलेली सूचना आहे, याचा आणखी एक पुरावा म्हणजे आपल्याला हसायला येण्याची कारणं. “अरे काय मित्रा काय करतोयस?’, ‘ती बघ आलीच स्वप्ना.”, “प्रतिकला ८१ मार्क मिळाले.” अशा साध्याशा वाक्यांवर सुद्धा हसायला आल्याचं तुम्हाला आठवत असेल. विनाकारण हसल्यामुळे तुम्ही शिक्षकांचा ओरडा सुद्धा खाल्ला असेल.

नेहमीच एखाद्या व्यक्तीला हसण्यासाठी विनोद घडण्याची गरज नसते. कारण व्यक्तीचं हास्य हे अंतर्मनातून आलेलं आणि मेंदूच्या सूचनेतून समोरील व्यक्तीला देण्यात आलेली सूचना असते.

थोडक्यात काय, तर हसायला येण्यासाठी विनोद निर्मिती व्हायलाच हवी असं काहीही नाही. अंतर्मातून वाटलं की हसू आपोआप गालांवर फुलतं. मग त्याचं कारण अगदी काहीही असू शकतं, जे इतरांसाठी फारसं महत्त्वाचं नाही असंही घडू शकतं. आपल्या मेंदूने ती इतरांना दिलेली सूचना असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?