' लोकं 'गोधरा फाईल्सची' मागणी करतायत; मात्र 'मोपला विद्रोह' सोयीस्कररित्या विसरतायत

लोकं ‘गोधरा फाईल्सची’ मागणी करतायत; मात्र ‘मोपला विद्रोह’ सोयीस्कररित्या विसरतायत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

एक ‘द कश्मिर फाईल्स’ हा सिनेमा काय आला, तथाकथित सेक्युलर वामपंथियांनी हा सिनेमा हाणून पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण जनतेच्या दरबारात कायम न्यायच होतो आणि त्याचीच प्रचिती आपल्याला गेल्या आठवड्यात आली असेल.

केवळ ९ दिवसांत कोणत्याही प्रमोशन शिवाय या सिनेमाने १०० करोडचा आकडा गाठून एक वेगळाच इतिहास रचला आहे. ज्या बॉलीवूडने आजवर काश्मिरचं भलतंच चित्र आपल्यासमोर मांडलं त्याच काश्मिरची एक काळी बाजू या सिनेमाने उघड केली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

३२ वर्षं जे सत्य आपल्या शासनकर्त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचू दिलं नाही तेच उघडं नागडं सत्य आहे तसं विवेक अग्निहोत्री यांनी आपल्यासमोर मांडलं आणि लोकांनी अक्षरशः ते डोक्यावर घेतलं.

 

the kashmir files IM

 

हा सिनेमा पाहून काहींच्या पोटात पोटशूळ उठलं आणि त्यांनी तातडीने #GodhraFiles #DelhiFiles हे हॅशटॅग ट्रेंड करायला सुरुवात केले. याचा अर्थ असा होतो की आता काश्मिरप्रमाणेच गोधरा हत्याकांडाविषयीसुद्धा सत्य बाहेर यायला हवं, विवेक अग्निहोत्री यावर सिनेमा बनवण्याचं धाडस दाखवणार का? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले.

आज जी लोकं हे प्रश्न विचारतायत २५ सेप्टेंबर १९२१ ही तारीख सोयीस्कररित्या विसरतायत. या दिवशी केरळच्या मालाबार भागातसुद्धा हिंदूंचा नरसंहार झाला होता याचा यांना विसर पडतो. तेव्हाच्या शासनकर्त्यांनी तर या नरसंहाराला ‘मोपल्यांचे बंड’ असं गोड नाव देऊन याच गोष्टीचं समर्थन केलं!

आज याचविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, खरंतर हा विषय आणि आपण शाळेच्या पाठ्यपुस्तकात शिकलेलो ‘खिलाफत आंदोलन’ याचा थेट संबंध या नरसंहाराशी आहे, कसा तेच आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू.

कशाप्रकारे डाव्या विचारवंतांनी आपला इतिहास त्यांच्या पद्धतीने लिहून एवढ्या भयानक नरसंहाराला ‘बंड’ हे गोड नाव कसं दिलं? याचा इतिहास जाणून घेऊयात! त्याआधी थोडी या सगळ्याची पार्श्वभूमी जाणून घ्यायचा प्रयत्न करुयात.

 

moplah genocide IM

 

मित्रहो १९२१ म्हणजे तेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता, पहिल्या महायुद्धाच्या तुर्कस्तानवर जे राज्य करणारे राज्यकर्ते होते त्यांच्या साम्राज्याला ऑटोमन साम्राज्य म्हंटलं जायचं आणि या हे शासन चलवणाऱ्या सर्वेसर्वाला खलिफा असं संबोधलं जायचं.

याच साम्राज्याकडे मुस्लिम लोकांचं पवित्र धर्मस्थळ मक्का आणि मदिना यांची सूत्र होती.

पहिल्या महायुद्धात तुर्कस्तानने जर्मनीला पाठिंबा दिला खरा पण या युद्धात जर्मनीचा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर मित्रराष्ट्रांनी हे ऑटोमन साम्राज्य बरखास्त करण्यासाठी जमेल तसे प्रयत्न करायला सुरुवात केली.

 

ottoman empire khalifa IM

 

ब्रिटिशांनी खलिफाच्या आणि ऑटोमन साम्राज्याच्या मुसक्या आवळायला घेतल्या तेव्हा खलिफाने इस्लाम धोक्यात आहे असा संदेश पाठवला, पण इतर कोणत्याही इस्लामिक राष्ट्रांनी त्याला जास्त गांभीर्याने घेतलं नाही, पण फाळणीपूर्व भारतात मात्र याचे पडसाद उमटू लागले!

इस्लामचं केंद्रस्थान असलेलं ऑटोमन साम्राज्याला जसे हादरे बसायला लागले तसं भरतातील मुस्लिम लोकांनी एक चळवळ उभी केली आणि या चळवळीच्या माध्यमातून आपली नाराजी दाखवायला सुरुवात केली. ती चळवळ किंवा आंदोलन म्हणजे ‘खिलाफत चळवळ/आंदोलन’!

मौलाना शौकत अली, अबुल कलाम आझाद यांच्यासारखे मोठे नेते भारतात या चळवळीचं नेतृत्व करत होते. तसं बघायला गेलं तर खिलाफत चळवळीचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी काहीही संबंध नव्हता तरी तेव्हाच्या कॉँग्रेसनी या चळवळीला पाठिंबा दिला!

khilafat movement IM

 

पाठ्यपुस्तकातील आपल्याला शिकवलेलं खिलाफत आंदोलन आणि त्याचा खरा इतिहास खूप वेगळा आहे. खिलाफत आंदोलनाच्या माध्यमातून या लोकांना फक्त तुर्कस्तानातच नव्हे तर साऱ्या जागावर इस्लामचं वर्चस्व प्रस्थपित करायचं होतं आणि त्याची पहिली ठिणगी पडली ती केरळच्या मालबार परिसरात!

१९२१ ला गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला आणि सामान्य लोकांनाही तसं करण्यासाठी तसेच आर्थिक देणग्यादेखील देण्यासाठी आव्हान केलं होतं, तेव्हाच केरळच्या मालबार प्रांतात या खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे काही हिंस्त्र जिहादी लोकं एकत्र आले!

या सगळ्यांचं नेतृत्व करणारे लोकं म्हणजे हाजी मुसलिया, कोण्णारा थांगल, चेंबरासली थंगल. यांना मलाबार परिसरात मोपला असंही म्हंटलं जायचं.

आजच्या भाषेत म्हणायला गेलं तर हे सगळे फिदाईन जिहादीच. यांच्या डोक्यात केवळ एकच ध्यास तो म्हणजे साऱ्या जागावर इस्लामिक राजवट!

 

haaji muslia IM

 

याच मोपल्यांनी २५ सेप्टेंबर १९२१ च्या २ दिवस आधीच या नरसंहाराची पूर्वतयारी सुरू केली. टेलिग्रामच्या तारा तोडल्या गेल्या, दळणवळणाची सगळी साधनं बंद करण्यात आली. आणि मग त्यांनी हिंदू वस्त्यांवर हल्ले करायला सुरुवात केली.

तलवार आणि कुराण असे दोन पर्याय देऊन लोकांना बाटवण्याची कामं सुरु झाली, ज्यांनी विरोध केला त्यांना थेट त्याच तलवारीने कापण्यात आलं. स्त्रियांवर बलात्कार केले गेले, गरोदर स्त्रियांना चिरून त्यांचे गर्भ वेगळे करण्यात आले, लहान मुलांचे अवयव कापून तिथल्या विहिरीत फेकून दिले गेले!

फक्त मोपलेच नव्हे तर त्यांच्या बायकादेखील यात सामील होत्या, घरात शिरून कपडा लत्ता, भांडी आणि इतर गोष्टी लुटून न्यायचं काम त्या करत होत्या.

 

mopla genocide IM

 

मालाबार प्रांतातला ४० % भाग हा मोपल्यानी काबिज केला होता, काहींनी तिथून पळ काढला तर काहींनी या नरसंहाराला घाबरून इस्लाम कबूल केला. आपल्याच देशातल्या इतिहासकारांनी या नरसंहराला जुलमी राजवटी विरोधात केलेलं ‘मोपल्यांचे बंड’ असं नाव दिलं.

या सगळ्यावर आत्ताप्रमाणेच त्यावेळची कॉंग्रेसदेखील मौन बाळगून होती, पण या सगळ्याची सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निंदा केली. त्यांच्या पुस्तकात त्यांनी या नरसंहारावर चांगलेच ताशेरे ओढले!

यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ‘मोपल्यांचे बंड – मला काय त्याचं’ या पुस्तकातून या गोष्टीचा निषेध केला. Annie Besant यांनीदेखील त्यांच्या पुस्तकात या नरसंहाराची कठोर शब्दांत निंदा केली.

 

ambedkar and savarkar IM

 

गेल्याच वर्षी या नरसंहाराला तब्बल १०० वर्षं उलटून गेली, तरी १०० वर्षांपूर्वीच्या या भयंकर जिहादविषयी तेंव्हाही कुणी काही बोललं नाही आणि आत्ताही कुणाला याविषयी फारसं ठाऊक नाही!

यावरून आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की आजवर आपल्याला शिकवलेला इतिहास हा कसा एकाच बाजूने लिहिला गेला आहे आणि हाच एकांगी इतिहास आजवर आपण कित्येक सिनेमातूनही पाहिला आहे!

आज ‘द कश्मिर फाईल्स’ या सिनेमामुळे या इतिहासाची दुसरी बाजू बाहेर यायला सुरुवात झाली आहे, लोकं त्यावर चर्चा करतायत, आणि हेच होणं अपेक्षित आहे!

खरंतर हत्याकांड ही गोष्ट भयावहच आहे निंदनीयच आहे याबद्दल काही दुमत नाही. गोधरा हत्याकांड असेल, दिल्लीच्या दंगली असतील, मालेगावची केस असेल किंवा मोपला हत्याकांड असेल, याविषयी गोष्टी बाहेर यायलाच हव्यात आणि त्यावर चर्चादेखील व्हायलाच हवी.

 

godhra_train_burning_inmarathi
hindustantimes.com

केवळ कश्मिर फाईल्स आलाय तर आता गोध्रा फाईल्स काढायचं धाडस कोण दाखवणार का? हा प्रश्नच विचारणंच मूर्खपणाचं लक्षण आहे. जसं काश्मिर, दिल्ली, गोधरा विसरता येणार नाही तसंच मोपला हत्याकांडसुद्धा विसरता कामा नये, असं माझं स्पष्ट मत आहे!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?