' वयाच्या ७ व्या वर्षी भेटले आणि जन्मोजन्मीचं नातं जुळलं, सेहवागची फिल्मी लव्हस्टोरी – InMarathi

वयाच्या ७ व्या वर्षी भेटले आणि जन्मोजन्मीचं नातं जुळलं, सेहवागची फिल्मी लव्हस्टोरी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 —

सुप्रसिद्ध मंडळी किंवा सेलिब्रिटी प्रकारातील मंडळी म्हटली की त्यांच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे, यातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा अगदी मोठी चर्चा होत असते. मग लग्नासारखे मोठे प्रसंग असतील, तर काही विचारायलाच नको!

काही दिवसांपूर्वी लग्न केलेलं विकी-कतरिना हे जोडपं अजूनही चर्चेत आहे. बॉलिवूड स्टार्स, मोठी मोठी नेतेमंडळी, व्यावसायिक अशा कुटुंबामधील लग्नांची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते.

 

vicky katrina IM

 

याच यादीत क्रिकेटपटूंचा सुद्धा समावेश आहे. झहीर खान, विराट कोहली अशा क्रिकेटर मंडळींनी थेट बॉलिवूड कलाकारांशी लग्न केलेलं असल्यामुळे त्यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा होणं तर अगदीच साहजिक आहे. मात्र रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, चहल अशा मंडळींच्या लग्नाची चर्चा सुद्धा होताना दिसते.

भारताचे दिग्गज क्रिकेटर सचिन आणि गांगुली यांच्या प्रेमविवाहाच्या चर्चा आजही होताना दिसतात. त्यांच्याच पंक्तीत बसणारा सेहवाग सुद्धा या यादीत मागे नाहीये, त्याची लव्ह स्टोरी सुद्धा झकास आणि हटके आहे, हे मात्र सगळ्यांना ठाऊक नसतं. चला तर मग, ही फिल्मी लव्ह स्टोरी कशी होती, तेदेखील जाणून घेऊयात.

फलंदाजी स्फोटक आहे पण…

 

sehwag inmarathi

 

वीरेंद्र सेहवाग, अर्थात वीरू हे नाव घेतलं, की आजही त्याच्या अनेक समकालीन गोलंदाजांच्या मनात धडकी भरेल. त्याची फलंदाजी तशीच होती. स्फोटक आणि कुणालाही घाम फुटेल अशी! फॉर्मात नसलेल्या वीरूला सुद्धा गोलंदाज आणि प्रतिस्पर्धी खेळाडू टरकून असत.

मात्र मैदानावर वीरू जितका भयावह आणि कर्दनकाळ वाटतो, तितकाच एक माणूस म्हणून तो गमत्या स्वभावाचा आणि अफलातून व्यक्तिमत्वाचा आहे. त्यामुळे त्याची लव्हस्टोरी खास आणि अगदी बॉलिवूड स्टाईल फिल्मी असण्याचं आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही.

बचपन का प्यार…

 

sehwag im

 

वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत पहिल्यांदा भेटले, तेव्हा अगदीच लहान होते. सेहवागच्या भावाचं आरतीच्या मावशीसह लग्न होतं. त्यावेळी ते दोघे पहिल्यांदा भेटले. यावेळी वीरूचं वय होतं ७ वर्ष, तर आरती होती अवघी ५ वर्षांची! मात्र या पहिल्याच भेटीत त्यांची घट्ट मैत्री झाली.

पुढे ते कायम एकमेकांच्या संपर्कात राहिले. जसजसं वय वाढत गेलं, तसतशी ही मैत्री सुद्धा मोठी होऊ लागली, वेगळ्या नात्याकडे वळू लागली. तारुण्यात या मैत्रीला प्रेमाचे अंकुर फुटले आणि बालपणीच्या खास सवंगड्यांच्या एक नवा प्रवास सुरु झाला.

वयाच्या २१ व्या वर्षी मात्र वीरूने या प्रेमाची उघड कबुली देण्याचं आणि आरतीला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. १९ वर्षीय आरतीने हे नातं लगेच मान्य केलं. मात्र वीरू आणि आरती यांच्यात लांबचं नातं असल्यामुळे, तिच्या घरच्यांनी मात्र हे नातं सुरुवातीला मान्य केलं नाही.

ते लव्हबर्ड्स मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. त्यांचा विश्वास, नात्यातील दृढता आणि प्रेम बघून, आरतीच्या घरच्यांनी सुद्धा या नात्याला मान्यता दिली.

 

sehwag im 1

 

३ वर्ष एकमेकांना डेट करणाऱ्या वीरू आणि आरतीचं २००४ साली लग्न झालं. वीरुचं वय त्यावेळी अवघं २३ वर्षांचं होतं. पुढे २००७ साली आर्यवीर आणि २०१० साली वेदांत अशा २ गोड मुलांना जन्म देत त्या दोघांचं प्रेम अधिक फुलत गेलं.

बालपणी नातेवाईकांच्या लग्नात भेटणं, तिथे झालेली मैत्री, पुढे ऐन तारुण्यात या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होणं, तारुण्याच्या जोशात प्रपोज करणं, तिचा होकार, तिच्या घरच्यांचा विरोध आणि मग प्रेमकहाणी सुफळ संपूर्ण! आहे की नाही एकदम बॉलिवूडच्या सुपर डुपर हिट फिल्मसारखी लव्हस्टोरी!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?