' आपल्या देशाला 'भारत' हे नाव कसं पडलं? ५ संभाव्य कारणं वाचलीच पाहिजेत

आपल्या देशाला ‘भारत’ हे नाव कसं पडलं? ५ संभाव्य कारणं वाचलीच पाहिजेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारतीय संस्कृती ही जगातील अतिप्राचीन संस्कृतींपैकी एक आहे, जेथे ठायीठायी विविधता आढळून येते. भारतात जवळपास १६५० बोलीभाषा वापरत आहेत. परंपरा, धर्म आणि भाषा वेगवेगळ्या असून सुद्धा लोक इथे एकमेकांचा आदर करतात.

अश्या या आपल्या भारताबद्दल प्रत्येक भारतीयाला आदर आहेच, पण एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, ‘आपल्या देशाला भारत का म्हणतात?’

आज आपण याच प्रश्नाचा मागोवा घेणार आहोत. या लेखात आपण भारताला ‘भारत’ हे नाव कसे पडले त्याबद्दलची ५  कारणे जाणून घेऊया.

१. भारताच्या भौगोलिक इतिहासानुसार:

ऋग्वेदाच्या सातव्या पुस्तकाच्या १८ व्या श्लोका मध्ये ‘दशराजन’ युद्ध म्हणजेच ‘दहा राजांचे युद्ध’ याचे वर्णन केले आहे. दहा राजांचा महासंघ आणि भरत जमातीच्या राजा सुदास यांच्यामध्ये मध्ये पंजाबच्या रावी नदीवर हे युद्ध लढले गेले होते.

या युद्धात राजा सुदासने दहा राजांच्या महासंघावर विजय प्राप्त केला. या विजयामुळे राजा सुदासची ख्याती कित्येक पटीने वाढली होती आणि अखेर लोक देखील स्वतःला भरत म्हणवून घेऊ लागले.

यामुळे भरत हे नाव कित्येक काळ लोकांच्या  मुखावर होते, त्यामुळेच पुढे संपूर्ण जगात आपल्या देशाला ‘भारतवर्ष’ व ‘भरताची भूमी’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

 

dasarajna-marathipizza01
themysteriousindia.net

 

२. महाभारत आणि भरत चक्रवर्ती नुसार:

महाभारतानुसार आपल्या देशाला भारतवर्ष हे नाव, राजा भरत चक्रवर्ती याच्या नावावरून पडले. राजा भरत हे भरत राजवंशाचे संस्थापक आणि कौरव आणि पांडवांचे पूर्वज होते. ते दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचे पुत्र होतं.

भरत यांनी संपूर्ण देशातील साम्राज्य जिंकून एका संघटीत राज्याची स्थापना केली होती, म्हणून त्यांच्या संपूर्ण साम्राज्याला भारतवर्ष म्हणून ओळख मिळाली.

विष्णू पुराणामध्येही याबद्दलचे दाखले मिळतात. विष्णू पुराणानुसार आपल्या देशाला भारतवर्ष नाव तेव्हा देण्यात आले जेव्हा भरतच्या वडिलांनी आपला संपूर्ण राजपाट आपल्या मुलांच्या स्वाधीन करून संन्यास घेतला आणि ते जंगलात निघून गेले.

विष्णू पुराणामध्ये एक श्लोक आढळतो. तो असा-

उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।।

या श्लोकाचा अर्थ आहे,

एक असा देश जो समुद्राच्या उत्तरेला आणि बर्फाळ डोंगराच्या दक्षिणेला आहे ज्याला ‘भारतम’ म्हटले जाते आणि येथे भरत वंशाच्या अस्तित्वाचे पुरावे देखील मिळाले आहेत.

आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की भरतच्या साम्राज्यामध्ये म्हणजेच भारतववर्षा मध्ये आजचे पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, इराण, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गीस्तान, रशिया, तुर्कमेनिस्तान, उत्तर-पश्चिम तिबेट, नेपाळ आणि बांग्लादेश सर्व समाविष्ट होते.

 

King-Bharata-marathipizza
ph.krishnakosh.org

 

३. संस्कृतनुसार भारताचा जन्म:

भारताचे अधिकृत संस्कृत नाव भारत गणराज्य आहे. संस्कृत मध्ये भारताचा अर्थ अग्नी असा होतो, कारण या शब्दाचे संस्कृत मूळ ‘bhr’ असे आहे, ज्याचा अर्थ होतो- सहन करणे किंवा एखादा भर उचलणे.

म्हणजे याचा शब्दश: अर्थ होतो- अग्नी अखंड तेवत ठेवणे. पण याचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे- ज्ञान प्राप्त करण्यासाठी अखंड प्रयत्न करत राहणे.

 

bharat-marathipizza
jagranjosh.com

 

४.  जैन धर्मानुसार:

जैन धर्मातील नोंदीनुसार, आपल्या देशाचे खरे नाव भारत आहे, जे सम्राट भरत चक्रवर्ती यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे आणि हे भरत चक्रवर्ती जैन धर्माच्या पहिल्या तीर्थकारांचे सर्वात मोठे पुत्र होते.

जैन धर्मातील या गोष्टीनुसार, आपल्या देशाला मिळालेले भारत हे नाव म्हणजे जैन धर्माचीच देण आहे आणि त्यातूनच भारतीय संस्कृतीचा विकास झाला आहे.

 

bharat-marathipizza01
jagranjosh.com

 

५. आधुनिक कारण

इंडिया नावाचा उगम ‘इंड्स’ शब्दामधून झाला आहे जो जुना पारशी शब्द हिन्दुस पासून उत्पन्न झाला होता. जो उत्तरार्धामध्ये  संस्कृत शब्द सिंधू पासून घेतला गेला, ज्यामुळे सिंधू नदीला नाव पडले.

 

अशी आहेत ही कारणे, पण सगळ्यात मोठा तिढा हा की यातील कोणते कारण खरे मानायचे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “आपल्या देशाला ‘भारत’ हे नाव कसं पडलं? ५ संभाव्य कारणं वाचलीच पाहिजेत

  • January 10, 2019 at 10:53 pm
    Permalink

    आदिनाथ उर्फ वृषभनाथ पहिले जैन तिर्थंकर यांचे ज्येष्ठ पूत्र भरत यांनी सदर भूमीचे सहा खंड जिंकून प्रथम चक्रवर्ती बनला.विशाल भूमीवरील सार्वभौमत्वामुळे ही भूमि भारत, भारतवर्ष,भरतखंड नावाने ओळखली जाते.जैन-वैदिक पुराणात यांची स्पष्ट नोंद आहे.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?