' ‘एक बिहारी, सौ बिमारी…’ बाळासाहेबांच्या वक्तव्याची आताच का होतेय पुनरावृत्ती? – InMarathi

‘एक बिहारी, सौ बिमारी…’ बाळासाहेबांच्या वक्तव्याची आताच का होतेय पुनरावृत्ती?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात जसे सण समारंभ उत्साहाने साजरे केले जातात, लोक आतुरतेने आपापल्या सणांची वाट बघत असतात. सामान्य माणसाप्रमाणे राजकारणी मंडळी एका सणाची वाट आतुरतेने बघत असतात तो सण म्हणजे निवडणुका. राजकारणी मंडळी अगदी वर्षभरापासून या सणाची तयारी करत असतात.

आज भारतात अनके राज्य आहेत, प्रत्येक राज्याच्या निवडणुका दरवर्षी येतच असतात, नुकतंच ५ राज्यांच्या निवडणुका झाल्या ज्यात ४ राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली. पुढच्या वर्षी राजस्थान छत्तीसगड राज्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय पक्ष जोमाने कामाला लागतील.

 

elections 1 im

मागच्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील बंगालच्या निवडणुका पार पडल्या होत्या, यंदाच्या वर्षी याच बंगाल राज्यातल्या आसनसोल मतदारसंघाच्या पोट निवडणुका लागल्या आहेत.

त्यासाठी तृणमूलकडून ममता दीदींनी रविवारी बॉलीवूडचे आणि कधीकाळी भाजपचे नेते असलेले शत्रुघ्न सिन्हा यांची निवड केली आहे. मात्र तृणमूल पक्षाच्या एका आमदाराने एक वादग्रस्त विधान केले आहे, नेमकं काय म्हणाले आहेत चला जाणून घेऊयात…

 

rallies in west bengal inmarathi

 

ममता दीदींनी जेव्हा शत्रुघ्न सिन्हांची निवड केली त्यांनतर तृणमूलचे आमदार मनोरंजन वाजपेयी यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. ते असं म्हणाले की एक बिहारी सौ बिमारी असं म्हणत बंगालला आजारमुक्त करण्याचं आवाहन केले. त्यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

वाजपेयी यांच हे वक्तव्य काही दशकांपूर्वी दि. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील बिहारींच्या बाबतीत असेच विधान केले होते. तेव्हा बाळासाहेबांनी बिहारी जनतेला आजारी म्हणून संबोधित केले होते. तेव्हा रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव होते ते बिहारी जनतेच्या पाठीशी होते. मुंबईमध्ये आणखीन बिहारींना पाठवू अशा शब्दात  त्यांनी बाळासाहेबांना चिथावले होते.

 

balasaheb thackrey IM

 

बाळासाहेबांच्या नंतर उत्तर प्रदेश आणि बिहार जनतेच्या विरोधात राज ठाकरे उतरले होते. २००८ साली त्यांनी मुंबईमध्ये आपल्या भाषणांमध्ये बिहारी जनतेला टार्गेट केले होते. आज फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात देखील बिहारी जनतेचा विरोध करत आहेत. आज बिहार सारख्या राज्यातून अनेक लोक कामासाठी इतर राज्यात जातात अगदी केरळ पासून काश्मीर पर्यंत सर्वच राज्यात बिहारी जनता काम करताना दिसून येते.

बंगाल आणि बिहार तसे सख्खे शेजारील राज्य, व्यापाराची देवाणघेवाण दोन्ही राज्यात होत असते, मात्र तरीदेखील प्रांतवादाचा मुद्दा तिथे देखील दिसून येतो. शत्रुघ्न सिन्हा जे कधीकाळी भाजपमध्ये होते ते आता तृणमूलपक्षात सामील झाले आहेत. तृणमुल पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख मिळावी यासाठी इतर नेत्यांना डावलत शत्रुघ्न सिन्हा यांना पक्षाने संधी दिली आहे. त्याचबरोबरीने ज्या मतदार संघात त्यांना तिकीट दिले आहे त्या मतदार संघात अनेक बिहारी कामगार काम करत आहेत.

 

shatrughna sinha inmarathi

 

२०११ पासून ममता दीदी सत्तेत आल्यापासून त्यांनी अनेक फिल्मी लोकांना निवडणुकीचे  तिकीट दिले आहे. कोलकातामधील स्थानिक कलाकारांपासून ते अगदी मिथुन चक्रवर्तींपर्यंत अशा कलाकरांना त्यांनी संधी दिली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?