' “…म्हणून कपिलच्या शोमध्ये आम्ही प्रमोशन केलं नाही” अनुपम खेर यांनी वादाला दिला पूर्णविराम – InMarathi

“…म्हणून कपिलच्या शोमध्ये आम्ही प्रमोशन केलं नाही” अनुपम खेर यांनी वादाला दिला पूर्णविराम

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या सोशल मीडियावर एकच गोष्ट ट्रेंड होतीये ती म्हणजे ‘द कश्मिर फाईल्स’. बहुतेक संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीने या सिनेमाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं असलं तरी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले आहेत.

रोज सोशल मीडियावर सिनेमाविषयी काही ना काही नवी गोष्ट आपल्याला बघायला मिळतिये, काही लोकं सिनेमाचं तोंडभरून कौतुक करतायत तर काही लोकं अत्यंत विखारी टीका करतायत. 

 

the kashmir files 1

 

सिनेमाला राजकीय रंग द्यायचासुद्धा प्रयत्न सुरू आहे, पण या सगळ्या गोष्टी सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच छोट्या प्रमाणावर होत होत्या. सिनेमा रिलीज होऊ नये म्हणून याचिका दाखल केल्या गेल्या, सिनेमा चालू नये म्हणून बहुतेक मीडिया हाऊसेसनी याविषयी वाच्यतासुद्धा केली नाही.

सध्या सिनेमा हीट करायचा असेल तर त्याच्या प्रमोशनसाठी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार जीवाचं रान करतात. सिनेमा रिलीज होण्याआधी त्याची हवा तयार केली जाते, मुलाखती, स्क्रीनमागील किस्से अशा सगळ्या गोष्टींना उधाण येतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

याबरोबरच सिनेमाचे कलाकार वेगवेगळ्या रीयालिटि शोमध्ये हजेरी लावतात आणि सिनेमाचं जोरदार प्रमोशन करतात. पण ‘द कश्मिर फाइल्स’च्या बाबतीत हा प्रकार आपल्याला पाहायला मिळालाच नाही.

सिनेमाचं परदेशात एवढ्या मोठ्या प्रमाणात गाजावाजा होऊनसुद्धा भारतीय मीडियाने त्याची दखल घेतली नाहीच. ज्या मोठमोठ्या रीयालिटि शोमध्ये सिनेमांच्या प्रमोशनसाठी कलाकारांना निमंत्रण मिळतं अशा बऱ्याच कार्यक्रमांनीदेखील या सिनेमाकडे पाठ फिरवली.

या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती ‘द कपिल शर्मा शो’ची. विवेक अग्निहोत्री यांनी सिनेमा रिलीज होण्याआधी ट्विट करून  माहिती दिली होती की “आमच्या फिल्ममध्ये कोणताही मोठा स्टार नसल्याने कपिल शर्मा शो मध्ये आमच्या फिल्मचं प्रमोशन करण्यास नकार दिला!”

 

the kashmir files kapil sharma IM

 

या ट्वीटनंतर सगळीकडेच खळबळ माजली, सोशल मीडियावर लगेच boycott kapil sharma ट्रेंड होऊ लागलं, लोकांनी विवेक अग्निहोत्री यांचं ट्विट व्हायरल करत कपिलवर निशाणा साधायला सुरुवात केली.

“चला हवा येऊ द्या सारख्या मोठ्या मराठी कार्यक्रमात या सिनेमाचं प्रमोशन केलं गेलं तिथे कपिल शर्माला थोडीतरी लाज आहे का?” असं म्हणत यावर खूप टीका झाली.

कपिल शर्माने प्रथम यावर मौन पाळलं पण जेव्हा पाणी डोक्यावरून जायला लागलं तेव्हा मात्र त्याने एका फॅनची ट्विटला उत्तर देत ही स्पष्ट केलं की “असं काहीही नसून, या सगळ्या अफवा आहेत” शिवाय लोकांनी सोशल मीडियाचा वापर योग्य रीतीने करावा अशी विनंतीदेखील या ट्विटमधून केली!

 

kapil sharma tweet IM

 

यानंतर हे सगळं शांत झालं, सिनेमा ठरलेल्या दिवशी रिलीज झाला, सुरुवातीला कमी स्क्रीन मिळाल्या, पण नंतरमात्र लोकांनी अक्षरशः सिनेमा डोक्यावर घेतला, अवघ्या ४ दिवसांत सिनेमाने ४० करोडची कमाई केली.

मूळ प्रवाहातल्या कोणत्याही मीडिया हाऊसकडून प्रमोशन न करताही ही ऐतिहासिक कमाई करणारा हा एकमेव सिनेमा असेल, नुकत्याच एका मुलाखतीत या सिनेमात महत्वाची भूमिका निभावणारे ज्येष्ठ कलाकार अनुपम खेर यांनी याविषयी भाष्य केलं!

या मुलाखतीत अनुपम खेर यांनी कपिल शर्मा कॉंट्रोवर्सीबद्दलसुद्धा स्पष्टीकरण दिलं, ते म्हणाले की “ही फिल्म खूप सीरियस आहे त्यामुळे मला त्या शोमध्ये जाऊन प्रमोशन करायची इच्छा नाही, आणि कपिलच्या मनात आमच्याविषयी किंवा सिनेमाविषयी काहीच द्वेष नाहीये!”

 

the kashmir files anupam kher IM

 

सिनेमाविषयी बोलताना खेर म्हणाले की “हा सिनेमा माझ्यासाठी खूप जवळचा आहे, आमच्यावर ५ लाख काश्मिरी विस्थापितांच्या नजरा लागून होत्या, सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मला बऱ्याचदा रडू आवरलं नाही, तेव्हा विवेक मला मिठी मारून आम्ही दोघे रडायचो, ही भूमिका माझ्या करियरमधली सर्वात कठीण भूमिका होती!”

सिनेमा बघतानासुद्धा बऱ्याच लोकांना अनुपम यांच्याप्रमाणेच अश्रु अनावर झाल्याचे कित्येक व्हिडिओज आपण पाहिले आहेत, सिनेमाविषयी बरच काही बरं वाईट बोललं गेलं असलं तरी हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहेरा बदलू शकतो ही सध्याच्या चित्रांवरून दिसत आहे.

 

people crying IM

 

फक्त कमाईच नव्हे तर प्रेक्षकांच्या काळजाला हात घालण्यात सिनेमाला आणि कलाकारांना अभूतपूर्व यश मिळालं आहे यात काहीच वाद नाही. येणाऱ्या काळात असेच अनेक रेकॉर्ड ब्रेक करत हा सिनेमा एक वेगळा इतिहास रचेल अशी आशा आपण करुयात!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?