' काश्मीर फाईल्सप्रमाणे हिंदूंवर अन्याय झालेल्या या ज्वलंत विषयांवर चित्रपट यावेत, प्रेक्षकांची मागणी – InMarathi

काश्मीर फाईल्सप्रमाणे हिंदूंवर अन्याय झालेल्या या ज्वलंत विषयांवर चित्रपट यावेत, प्रेक्षकांची मागणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा आणि त्याचे दिगदर्शक विवेक अग्निहोत्री हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला आहे. दिग्दर्शकाने ज्या प्रामाणिक पद्धतीने घडलेलं सत्य लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचं सगळीकडेच कौतुक होत आहे.

गुजरात सारख्या राज्यांमध्ये सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. “असा अन्याय पुन्हा कोणत्याच व्यक्तीवर होऊ नये आणि होऊ द्यायचा नाही” ही प्रतिज्ञा कित्येक लोक हा सिनेमा बघून घेत आहेत, हीच सिनेमाच्या यशाची खरी पावती आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला तर हे लक्षात येतं, की कित्येक घटना अशा घडून गेल्या आहेत ज्यांचा कुठेच उल्लेख नाहीये किंवा केवळ अर्धवट माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सोशल मीडिया नसलेल्या त्या काळात गोष्टी घडायच्या, दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांची ठळक बातमी व्हायच्या आणि वातावरणात विरून जायच्या.

“कोणत्याही समाजावर झालेला अन्याय असो, तो समोर आला पाहिजे” का? तर तो पुन्हा होऊ नये इतकाच अशा परखड सत्य मांडणाऱ्या सिनेमांचा उद्देश असतो. आजचा प्रेक्षक बदलला आहे. त्याला मनोरंजनासोबत माहिती मिळवण्यात सुद्धा रस आहे.

विवेक अग्निहोत्री यांच्या आधी सत्य मांडणारे दिग्दर्शक म्हणून ‘मधुर भांडारकर’ यांचं नाव घेतलं जायचं, पण सध्या त्यांनी सिनेमा तयार करण्यापासून विश्रांती घेतल्याचं जाणवतंय. हेच कारण आहे की, प्रेक्षकांच्या विवेक अग्निहोत्री यांच्याकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत.

 

vivek agnihotri inmarathi

 

भारतात घडून गेलेल्या अशाच ज्वलंत घटनांवर विवेक अग्निहोत्री यांनी तयार करावा अशी आता प्रेक्षकांची इच्छा आहे, जी त्यांनी नुकतीच व्यक्त केली आहे. कोणत्या आहेत अशा अजून घटना? जाणून घेऊयात:

१. गोध्रा हत्याकांड:

 

godhara im

 

२७ फेब्रुवारी २००२ ची सकाळ ही काश्मिरी पंडितांप्रमाणेच हिंदू धर्मातील सेवकांची वाताहत करण्यासाठी झाली होती. ‘साबरमती एक्सप्रेस’ या रेल्वेचा एक भाग जाळून टाकण्यात आला होता. काय वेदना असतील त्या?

५९ निष्पाप लोकांना काही धर्मांध लोकांमुळे आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेची चौकशी ६ वर्ष सुरू होती. चौकशी मधून हे निष्पन्न झालं होतं की, १००० मुस्लिम तरुणांनी एकत्र येऊन हे दुष्कृत्य केलं होतं. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल सुरू झाली होती.

दुकानांची जाळपोळ, सार्वजनिक वाहनांची तोडफोड यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरचा सामान्य माणसांचा विश्वास उडाला होता. गुजरात हायकोर्टाने या घटनेसाठी ३१ मुस्लिम तरुणांचा दोष सिद्ध करून त्यांना शिक्षा सुनावली होती.

२. भारताची फाळणी:

 

partition inmarathi

 

१९४७ हे वर्ष जसं भारताच्या स्वातंत्र्याचं आहे तसंच ते भारताच्या फाळणीचं वर्ष म्हणून देखील ओळखलं जातं. ब्रिटिश भारतातून गेले, पण जातांना ते एका मोठ्या देशाचे तीन तुकडे करून गेले.

धार्मिक लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून केलेल्या या भरताच्या फाळणीत मुस्लिम समाजातील लोकांनी पाकिस्तानमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. या फाळणी नंतर ब्रिटिश इंडियन आर्मी, रॉयल इंडियन नेव्ही, रॉयल इंडियन एअरफोर्स, इंडियन सिव्हिल सर्विस, रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंपत्ती या सर्वांची विभागणी झाली.

१९४७ मध्येच भारतात ‘इंडिपेंडेन्स ऍक्ट’ अस्तित्वात आला आणि भारतात ‘ब्रिटिशराज’ चा अंत झाला. १५ ऑगस्ट १९४७ यादिवशी भारत आणि पाकिस्तान या दोन लोकशाही जगाच्या नकाशावर अस्तित्वात आल्या.

३. भोपाळ गॅस :

 

bhopal tragedy inmarathi

 

२ डिसेंबर १९८४ ची रात्र ही भोपाळ मधील कित्येक परिवारांसाठी काळरात्र ठरली होती. ‘युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड’ या कंपनीच्या पेस्टीसाईड्स प्लँट मधून अचानक ‘मिथिल आयसोसायनेट’ हा विषारी वायू बाहेर पडण्यास सुरुवात झाली आणि या घटनेने मध्यप्रदेश मधील ५ लाख लोकांना त्रास झाला होता. ४००० लोकांच्या आसपास जीव गमवावा लागल्याची ही घटना इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना मानली जाते.

विषारी वायू वातावरणात सोडणाऱ्या या प्लँटला शहरालगत जागा का देण्यात आली? इतक्या मोठ्या प्रमाणावर गॅस गळती होईपर्यंत कंपनी प्रशासन काय करत होती? असे बरेच प्रश्न त्यावेळी उपस्थित झाले होते. मध्यप्रदेश सरकारने या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना आर्थिक मदत केली होती आणि जखमी लोकांच्या उपचारासाठी इलाजाची सोय केली होती.

७५ वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळात भारतात अशा कित्येक घटना घडल्या आहेत ज्यावर साहित्य, कला क्षेत्राने प्रकाश टाकण्याची गरज आहे ही इच्छा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नुकतीच एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केली होती.

विवेक अग्निहोत्री यांनी प्रेक्षकांच्या मागणीबद्दल अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, पण त्यांच्यातील संवेदनशील व्यक्ती हा नक्कीच पुन्हा त्यांना अशाच एखाद्या सिनेमाची निर्मिती, दिगदर्शन करण्याची प्रेरणा देतील असा चाहत्यांना विश्वास आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ची टीम हा विश्वास सार्थ ठरवत पुढच्यावेळी सुद्धा एक नवीन सत्य समाजासमोर आणतील अशी आशा व्यक्त करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?