' सचिनच्या घरचा ‘चिकन डिनर’ शेन वॉर्नला पडला चांगलाच महागात! – InMarathi

सचिनच्या घरचा ‘चिकन डिनर’ शेन वॉर्नला पडला चांगलाच महागात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हेडिंग वाचून तुमच्या डोक्यात काही वेगळं येत असेल तर त्याला वेगळंच राहू द्या. ‘चिकन डिनर’ ही कन्सेप्ट पबजी या जगप्रसिद्ध खेळामुळे सगळ्यांनाच ठाऊक आहे.

मात्र हा किस्सा खरोखरीच डिनरला असलेल्या चिकनबद्दल आहे. तेही कोणा साध्यासुध्या माणसांच्या डिनरचा नाही तर क्रिकेटमधला देव सचिन तेंडुलकर आणि जगद्विख्यात लेगस्पिनर शेन वॉर्न यांच्यातला आहे.

 

sachin and shane warne IM

 

ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉर्न याचं अलीकडेच ४ मार्चला हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या केवळ ५२ व्या वर्षी असा झटका यावा तोही कुटुंबापासून दूर थायलंडमध्ये हे दुर्दैवच म्हणता येईल. त्याचं जाणं अनेकांना चटका लावून गेलं.

वॉर्न हा त्याच्या काळातल्या खेळाडूंचाच नव्हे तर सगळ्यांचाच मित्र होता. पण त्याचा खास मित्र होता तो म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. क्रिकेटच्या मैदानवरची त्यांची टशन, खुन्नस कितीही असली तरी ते दोघे मैदानाबाहेर खूप घट्ट मित्र होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एकदा वॉर्न भारतात आला असताना सचिनच्या घरी जेवायला म्हणून गेला आणि त्याची फजिती झाली. त्याचाच हा ‘चिकन डिनर’चा किस्सा…!

काय झालं नेमकं त्या दिवशी??

१९९८ मध्ये वॉर्न नुकताच भारतात टेस्ट सिरीज खेळण्यासाठी आला होता. तेही पहिल्यांदाच. त्यावेळी वॉर्न आणि सचिनची लोकप्रियता आणि खुन्नस एवढी होती की त्या सिरीजला लोक भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असं न ओळखता वॉर्न विरूद्ध सचिन असं ओळखत होते.

चेन्नईला पहिली टेस्ट मॅच खेळली जाणार होती. पण त्या आधी ऑस्ट्रेलियन टीम मुंबईत उतरली. तिथे त्यांची टेस्टपूर्वी एक फर्स्ट क्लास मॅच होणार होती.

 

sachin shane 2 IM

 

जेव्हा सगळे खेळाडू भेटले, तेव्हा वॉर्न पहिल्यांदाच भारतात आल्यामुळे सचिननं त्याला बोलता बोलता जेवायचं आमंत्रण दिलं. तेव्हाच त्यानं वॉर्नला त्याची खाण्याची आवडही विचारली.

वॉर्ननं सांगितलं की खास भारतीय पद्धतीचं जे काही असेल, ते त्याला आवडेल. पण प्रत्यक्षात जेव्हा सचिनच्या घरी गेल्यानंतर चिकनचा पहिला घास त्याने घेतला, तेव्हा त्या तिखट आणि चमचमीत चवीमुळं त्याला काय करू आणि काय नको असं झालं.

नंतर पूर्ण वेळ तो काय खावं हे न कळून सचिनच्या मॅनेजरशी वारंवार चर्चा करत होता. एवढंच नाही तर कोणाच्या न कळत त्यानं आपल्या ताटातलं निम्मं चिकन त्या मॅनेजरच्या ताटात सरकवलं होतं. मात्र सचिन बाकीच्या पाहुण्यांसोबत बिझी असल्यामुळं त्याला हे काहीच माहित नव्हतं.

 

sachin shane warne 3 IM

 

त्यानं फक्त वॉर्न मॅनेजरशी बोलतोय एवढंच बघितलं होतं. सचिनच्या मॅनेजरनं त्याला सांगितलं की वॉर्न जेवलाच नाही. पण सचिनला तर वॉर्नची प्लेट रिकामीच दिसत होती. पण नेमकं काय घडलं होतं ते काही वेळातच सचिनच्या लक्षात आलं.

लेग स्पीनर ग्राउंडवर कितीही स्ट्रॉंग असला तरी भारतीय मसालेदारपणा मात्र त्याला सांभाळता येणार नाही, हे सचिनला कळून चुकलं. वॉर्नला सचिन आणि त्याच्या कुटुंबाबद्दल खूप जिव्हाळा होता.

त्यामुळे ह्या जेवण प्रसंगी आपल्यामुळे सर्वांना त्रास झाला ह्याचंही त्याला वाईट वाटलं. म्हणून त्यानेच किचनमध्ये जाऊन आपल्या पद्धतीने सॉसेज, बीन्स आणि उकडलेले बटाटे बनवून तेच खाल्ले. हा प्रसंग सचिनच्या आठवणीत कायम राहील.

 

shane 3 IM

 

त्या टेस्ट सिरीजमध्ये आपल्या भारतीय लिजंडने ४४६ रन काढल्या आणि तो टॉप स्कोअर झाला. वॉर्नने एकूण १० विकेट्स घेतल्या.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?