' “असं राहण्यापेक्षा रस्त्यावर राहणं बरं”, या श्रीमंत शहराचं भीषण वास्तव – InMarathi

“असं राहण्यापेक्षा रस्त्यावर राहणं बरं”, या श्रीमंत शहराचं भीषण वास्तव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणसाच्या तीन मूलभूत गरजा असतात ज्या अगदी आपण शाळेपासून शिकत आलो आहोत, यातील तिन्ही गोष्टींपैकी एखादी गोष्टी जरी नसेल तरी माणसाचे आयुष्य सुखकर होत नाही. यातील एक गोष्ट म्हणजे घर. आज माणूस कामानिमिताने कितीही  बाहेर राहिला तरी त्याला घराची ओढ असतेच, मात्र ‘Exempt Housing हा असा जीवघेणा प्रकार आहे ज्यात माणूस घरात राहण्यापेक्षा रस्त्यावर राहणे पसंत करतील, काय आहे नेमकं हे जाणून घेऊयात…

 

mud house inmarathi

 

‘Exempt Housing’ म्हणजे नक्की काय?

एक अशी वस्ती जिथे तुरुंगातून पळालेले कैदी ते गरीब, घर नसलेले लोक राहतात कुठल्याही सुखसोयी नसताना देखील राहतात.
हा प्रकार बर्मिंघम या शहरात गेली अनेक वर्षे सुरू आहे. National Homeless Charity च्या अहवालानुसार मे २०२१ पर्यंत इथे १५३,७०१ वस्त्या ग्रेट ब्रिटन मध्ये exempt accomodation म्हणून आहेत. तर exempt accomodation याचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हा एक असा भाग आहे जो शासनाकडून गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिला आहे. अश्या वस्तीमध्ये तऱ्हे तऱ्हेची लोकं राहत असून मनस्थिती आणि परिस्थिती न जुळल्यामुळे ती होरपळली जातात.

काही सामाजिक कार्यकर्ते या विषयावर अनेक वर्ष काम करत आहेत. अश्या प्रकारच्या वस्तीतल्या लोकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांच्या मानसिक स्वास्थासाठी काऱ्यरत आहेत. त्यांचे मानसिक स्वास्थ्य सुधारले तर ते सुधारून पुढे समाजात ताठ मानेने वावरू शकतील असा या समाज सेवकांचा आशावाद आहे.

 

exempt im 1

फिलीपा ही एक तिथलीच समाजसेविका असून तिच्या म्हणण्यानुसार, “असं राहण्यापेक्षा रस्त्यावर राहिलेलं बरं!” इथे येण्यापूर्वीची परिस्थिती बरी असं म्हणण्याची वेळ या लोकांवर येतेच. बरेचदा फिलिपा वाईट अनुभवांमुळे या लोकांत मदतीला जायला ही घाबरते.

फिलिपाचं कामच होतं की तिने वेगवेगळी शहर फिरून exempt accommodations पाहून तिथल्या लोकांना मदत करणे. रोज तिच्या नजरेसमोर कैदी, ड्रग्स घेणाऱ्या बायका आणि मुलं, मानसिक रुग्ण आणि अती दारूचं सेवन करणारे लोक येत.

“खरं तर ही वस्ती अश्या लोकांना आधार देण्यासाठी आहे परंतु याचा भलताच परिणाम समाजावर होताना दिसतोय. लोकांना छान राहणीमान आणि घर स्वच्छ कसं ठेवायचं हे इथे शिकवलं जावं!”, असं फिलिपा ला वाटतं.

देशातले असे लोक इथे राहतात ज्यांना समाजाने धुडकावलं आहे. इथे कुठल्याच सुखसोयी नाहीत तरीही नशेत धुत होऊन लोक इथे राहतात. अश्या वस्त्यांना खरं तर समाजाने आणि शासनाने लागेल ती मदत केली पाहिजे पण समाजाच्या इतर प्रश्र्नांपुढे हे मात्र दुर्लक्षितच राहते. दुकानांची गच्ची किंवा शेअर केली जाऊ शकतील अशी जुनी घरं अश्या जागांमध्ये exempt housing केलं जातं.

 

exempt im

 

खरंच अश्या वस्त्यांमध्ये समाजाने लक्ष घातलं तर इथल्या लोकांचं आणि समाजाचं देखील भलं होऊ शकतं पण ही वस्ती बेकायदेशीर असल्यामुळे इथे फारसा बदल किंवा मान्यता मिळवता येत नाही. गेल्या तीन वर्षात २२,००० वस्त्यांमधून बर्मिंघम शहरातील फक्त २००० वस्त्यांना म्हणजेच फक्त ९% वस्त्यांना शासनाकडून मान्यता मिळाली आहे.

फिलिपा ने सामाजिक कार्य सोडण्यापूर्वी अनेक अश्या संस्था व लोकांसाठी चांगलं काम केलं आहे. फिलिपा ने हे जग उघडकीस आणलं कारण तिच्या म्हणण्यानुसार, ” हे एक अंडरग्राऊंड जग आहे ज्याविषयी खूप कमी लोकांना माहीत आहे.

 

exempt 3 im

 

इथे राहण्याचा खर्च €२२० पेक्षा जास्तं आहे जो Department of Work and Pensions वेगवेगळ्या बिझनेस साठी थेट पाठवतात. फिलिपाला प्रत्येक नवीन क्लाएंट मागे €१०० मिळायचे.

Exempt Housing चा डोलारा खूप मोठा आहे आणि जिथे ३ आणि ६ च लोक राहू शकतात अश्या ठिकाणी ही जास्तं लोक राहतात. फिलिपा ने तिथल्या बेकायदेशीर कामांवर देखील प्रकाश टाकला आणि सांगितलं की इथल्या लोकांसाठी डॉक्टर आणि अन्य आवश्यक सेवा उपलब्ध करून देतो या खाली फक्त बिल्स लावली जायची पण प्रत्यक्ष या सुविधा मिळायच्याच नाहीत.

इथल्या लोकांच्या फाईल्स महिनोन्महिने दुर्लक्षित राहिलेल्या होत्या फिलिपा यायच्या आधीपर्यंत. फिलिपा ला काही पुरावे देखील सापडले ज्यात असं स्पष्ट झालं की या बिझनेस मध्ये खूप फसवणूक सुरू आहे.

 

exempt 2 im

 

एक प्रॉपर्टी तर अशी होती जिथे कोणीच राहत नव्हतं तरीही तिथे लोकं राहतात असं सांगून पैसा खाल्ला जात होता. हे असे बिनबुडाचे आरोप नसून यावर २०१९ पासून बर्मिंघम सिटी कौन्सिल ने अश्या मालकांकडून €३.६m परत मिळवले. या फ्रॉड्स मध्ये फिलिपाला ओढण्याचा देखील प्रयत्न झाला पण ती त्यातून बाहेर पडली.

इथल्या लोकांची देखील आयुष्यात चांगले बदल आणण्याची इच्छा आहे पण इथली माणसच त्यांना खाली खेचतात आणि पुन्हा त्याच वाटेवर आणतात. ड्रग्स चा धंदा तसाच चालू राहिला तर लोक कसे बदलतील?

जगात अश्या अनेक त्रासातून लोक रोज जात असतात. प्रत्येक माणूस आयुष्याशी झगडत असतो तेव्हा वाटतं की आपण ज्या परिस्थितीत राहतो ती किती चांगली आहे आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?