' युक्रेनमधील ८०० विद्यार्थांना मृत्यूच्या दाढेतून वाचवणारी २४ वर्षीय भारतीय वैमानिक! – InMarathi

युक्रेनमधील ८०० विद्यार्थांना मृत्यूच्या दाढेतून वाचवणारी २४ वर्षीय भारतीय वैमानिक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या रशिया युक्रेन यांच्यातील वाद आणि युद्धजन्य परिस्थितीचा आपल्या सगळ्यांना अंदाज आहे. या दोघांमध्ये  सुरू असलेल्या वादामुळे सामान्य नागरिक मात्र हतबल, हताश आणि निराश झालेला दिसतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

युक्रेनमधील लोकांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता सामान्य जनता यांमध्ये विनाकारण भरडली जातेय असं दिसतंय. स्थानिक नागरिकांसोबतच परदेशी शिक्षणासाठी व नोकरीसाठी गेलेल्या नागरिकांना देखील या युद्धाची झळ बसत आहे.

भारतातून परदेशी गेलेल्या आपल्या भारतीय नागरिकांच्या डोक्यावरदेखील जिवीतहानीची टांगती तलवार लटकत आहे. भारतीय नागरिकांची परदेशातील संख्या बरीच मोठी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न भारतीय सरकार करीत आहे. त्यासाठी सर्व स्तरांतून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

 

ukraine flight im

 

युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीयांच्या जीवाला कसलाही धोका उद्भवू नये म्हणून भारतीय सैन्य दल, केंद्रीय प्रशासन यंत्रणा कसोशीने कार्यरत असून, आत्तापर्यंत हजारो नागरिकांना मायदेशी सुखरुप परत आणण्यात आपल्याला यश मिळाले आहे.

या सगळ्या घडामोडींमध्ये बाजी मारली आहे ती एका २४ वर्षांच्या मुलीने. या मुलीचे नाव आहे महाश्वेता चक्रवती. या मुलीने असं काहीतरी भन्नाट काम केलंय, की तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय….

 

mahasweta chakraborty im1

 

भारतीय पायलट महाश्वेता ही वयाने फक्त २४ वर्षाची असून तिने ८०० भारतीय विद्यार्थ्यांना भयावह परिस्थितीत मायदेशी सुखरुप आणण्याची जोखिम पत्करली आणि यशस्वीपणे पार पाडली. इतक्या लहान वयात तिने दाखवलेल्या धाडसाने भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.

“ऑपरेशन गंगा’मध्ये (Operation ganga) आपली निवड झाल्याचा रात्री उशीरा फोन आला आणि युद्धग्रस्त देशात फसलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशात आणण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात आली आहे असे सांगण्यात आले”, असं तिने सांगितलं.

त्यावेळी महाश्वेताने धीराने आपले काम करत पोलंडमधून ४ वेळा आणि हंगेरी येथून २ वेळा अशी एकूण ६ उड्डाणे २७ फेब्रुवारी ते ७ मार्च या दरम्यान केली. या दोन्ही सीमांवरुन ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना सुखरुप आपल्या देशात पोहोचवण्यामध्ये महाश्वेता हिचा महत्त्वाचा वाटा आहे.

 

mahasweta chakraborty im

 

महाश्वेताने लहानपणापासून पायलट व्हायचे स्वप्न पाहिले आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे स्वप्न पूर्णदेखील केले. तिची आई तनुजा चक्रवर्ती या बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा अध्यक्ष आहेत.

‘ऑपरेशन गंगा’मध्ये सहभागी असलेली पायलट महाश्वेता पहिल्यापासून या ऑपरेशनचा महत्त्वाचा भाग आहे. इतकेच नाही तर जगभरात कोरोनाचे थैमान सुरू असताना परदेशात अडकलेल्या भारतीयांना स्वगृही परत आणण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम मिशन’ मध्येही तिने सहभाग नोंदवला होता.

“अशाप्रकारे युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्याचे काम हा आपल्यासाठी आयुष्यभरासाठीचा सुंदर अनुभव होता ” असे आकाशाला गवसणी घालून सुद्धा जमिनीवर पाय असणारी ही नम्र मुलगी म्हणते. ‘ऑपरेशन गंगा’च्या अंतर्गत आतापर्यंत जवळपास १८ हजार भारतीयांना मायदेशात सुखरुप आणण्यात आले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?