' इमरान शेख यांचा "द काश्मीर फाईल्स" वरील डोळ्यात अंजन घालणारा रिव्ह्यु

इमरान शेख यांचा “द काश्मीर फाईल्स” वरील डोळ्यात अंजन घालणारा रिव्ह्यु

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – इमरान शेख

सगळ्यात आधी तर मला एक नाही समजलं, की चित्रपटाला इतका का विरोध होतोय…. कुठे स्क्रीनच मिळत नाहीये कुठे शोज बंद पाडले जातायेत कुठे आवाज mute केला जातोय… काय आहे नेमकं जे पचत नाहीये, असं काय आहे नेमकं जे घशाखाली उतरत नाहीये…

एकाच बाजूने सिनेमा बनवलाय असं बोलणाऱ्यांनी शौर्य धोखा हे सिनेमे youtube वर उपलब्ध आहेत ते जाऊन बघावे… दुसऱ्या बाजूचे सिनेमे आधीच येऊन गेलेत… ही बाजू सांगणारा /दाखवणारा हा पहिलाच सिनेमा असेल म्हणून कुणालाच मूळव्याध उठण्याचं काहीच कारण नाही… असं काही कधी घडलंच नव्हतं असं म्हणणाऱ्यांना तर विवेक रंजन अग्निहोत्री या माणसाने चित्रपटातूनच सणसणीत उत्तर दिलंय (बघा जाऊन एकदा) असो…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

चित्रपटाकडे वळूयात…. चित्रपट सुरू झाल्या झाल्या दुसऱ्याच सीन मधे जे काही पडद्यावर दिसतं तिथेच माणूस जागेवर फ्रीझ होतो… डोकंच भन्नाट व्हायला होतं, सिनेमा हळूहळू पुढे सरकतो तसा जे काही समोर येतं ते शब्दांत सांगणं जवळपास अशक्य… अक्षरशः दबा धरून जीव मुठीत घेऊन बसलोय आणि जे घडतंय ते आपल्या समोर प्रत्यक्ष घडतंय असं वाटत राहतं…

 

the kashmir files 1

 

चित्रपट काही सीन मधे शांत जरी होत असला तरी आता पुढच्या सीन मधे काय भयानक घडेल अशी एक भीती चित्रपटभर मनात दाटून असते…. ही विवेक अग्निहोत्रीचीच कमाल, सिनेमाचं डायरेक्शन इतकं इम्पॅक्टफुल आहे की क्षणभरही तुम्ही हलत नाही…. आणि शेवटचा सीन तर कौर्याची परिसीमा गाठतो… राग/भयं/द्वेष /अश्रू एकत्र दाटून येतात….

घरी आल्यावर बायकोला विचारलं काय गं काय वाटलं… घडलं असेल असं खरंच?? की ओव्हर करून दाखवलंय…. ती जे म्हणाली तिथेच दिग्दर्शक सफल झालाय….. तिचं वाक्य होतं….

“100% जे दाखवलंय ते तसंच घडलं असणारे कारण माझा या लोकांवर (कट्टरवाद्यांवर) पूर्ण विश्वास आहे की त्यांनी हे केलं असणार”

चमकलो मी क्षणभर… कारण ती फारसं पॉलेटिक्स वगैरे विषयात नसते… म्हणूनच एक न्यूट्रल व्यक्ती म्हणून तिची प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्वाची होती… पुढे ती म्हणाली हे जी आयडियॉलॉजी फॉलो करतात ते बघता त्यांनी असं काही केलंच नसेल किंवा करूच शकत नाही हे म्हणणं मूर्खपणाचं ठरेल….

(आता आतंकवादी फॉलो करत असलेली आयडियॉलॉजी धर्माने देखील सांगितलेली आहे का??? यावर मी यानंतर सविस्तर वेगळी पोस्ट लिहतो… त्यात मला बरेच मित्र खूप दिवसापासून विचारत असलेले “काफिर, गजवा ए हिंद, अलताकिया….” असे सगळेच विषय कव्हर करेन )

विवेक अग्निहोत्रीचं या ठिकाणी विशेष कौतुक या साठी की इतका ज्वलंत विषय मांडत असतांना देखील तो कुठेही वाहवत गेल्यासारखा वाटला नाही, अतिशय सेन्सिबल पद्धतीने त्याने विषय मांडलाय (त्याची दाहकता कमी न होता) त्या साठी त्याला 100% मार्क्स….

माझं विचाराल तर माझ्या डोक्यात जी सगळ्यात जास्त सनक गेली ती दोन दृश्य बघून…. (कौर्याची दृश्य वगळता)-

नंबर एक… भाजीवाला अनुपम खेरला पाकिस्तानी करन्सी देतो आणि सुनावतो, की कल से सब्जी तभी मिलेगी जब ये नोट दोगे क्यू की कल से ये जगह इस्लामाबाद मे होगी…. आणि नंबर दोन…. मिथुन च्या गाडीच्या काचेवर एक पोस्टर ठेऊन साधारण सात आठ वर्षांचा मुलगा म्हणतो की “अल सफा.. पंडित दफा” म्हणजे किती लहानपणीपासून ब्रेनवॉश ची सुरवात होते… धक्कादायक 😢

 

गाडीतून खाली उतरल्यावर काही काश्मिरी महिलांचा वाद सुरु असतो आणि एक हिंदू महिला रडत आय एस असलेल्या मिथुन समोर हाथ जोडत म्हणते देखिये यहा हमारे साथ क्या हो रहा है… आपको हमारे लिये कुछ करना होगा, अगर आप नही करेंगे तो कौन करेगा सर 🙏🙏…. ती अगतिकता तो असाह्यपणा सगळंच भयंकर…..

त्या काळात काय गुजरली असेल त्यांच्यावर याच्या साध्या कल्पनेने देखील शहारे येतात….. धर्मांतर करा वा सगळं सोडून पळून जा नाहीतर मरायला तयार रहा….. फक्त तीन ऑपशन्स…. रालिव, सालीव, गालीव.

अ वेल मेड फिल्म ऑन ब्रुटल रिऍलिटी बाय विवेक रंजन अग्निहोत्री… Hatts off

 

the kashmir files featured IM

 

चित्रपट बघितल्यावर मला असं जाणंवलं, की फक्त हिंदूंनीच का?? मुस्लिम समाजातील लोकांनी सुद्धा हा सिनेमा बघायला हवा… त्यांना ही कळू दे काय काय कांड करून ठेवलेत स्वतः ला मुसलमान म्हणवणाऱ्यांनी… त्यामुळे सर्व हिंदू बांधवाना विनंती की हा सिनेमा फक्त हिंदूंचा सिनेमा म्हणून प्रमोट करू नका… उलट तुमच्या आजूबाजूच्या मुस्लिम मित्रांना ओळखीच्या लोकांना प्रेरित करा की एकदा हा सिनेमा बघा म्हणून, बघू दे जास्तीतजास्त लोकांना….

कारण असं काही घडलं होतं हेच बहुतांश लोकांना माहीत नाही…. मला स्वतःला फेसबुक वर आल्यावर 2011/12 च्या आसपास असं काही घडलं होतं हे समजलं…. याला सर्वस्वी जबाबदार आपला मीडिया…. दूर सद्दाम हुसेन बुश बद्दल मला सगळी माहिती इथे मिळते, सिरिया इराण इराक अफगाणिस्तान मधे काय घडतंय ते समजतंय आणि माझ्याच देशात एक इतकी भयंकर घटना होऊन सुद्धा वर्षानुवर्षे मला त्याबद्दल माहीतच होत नाही….. आणि आता माहीत झाल्यावर इतकं काय फार सिरीयस घडलं नव्हतं असं स्पष्टीकरण दिलं जातंय….That’s रिडिक्यूलस

कलम 370 चं काय महत्व होतं हे या निमित्ताने अधोरेखित झालं…..

मित्रांनो खूप काही आहे लिहण्यासारखं… पूर्ण एक डायरी कमी पडेल… पण तूर्तास इतकंच की जास्तीतजास्त लोकांनी हा सिनेमा बघा आणि इतरांना दाखवा, यासाठी नाही, की त्याने फार मोठी काही क्रांती घडेल, तर यासाठी की नेमकं काय आणि कुठे चुकलंय हे समजेल….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?