' स्विमिंग पूल, हेलिपॅड आणि बरंच काही…जगातील सर्वात लांब कारने तोडलेत रेकॉर्ड्स – InMarathi

स्विमिंग पूल, हेलिपॅड आणि बरंच काही…जगातील सर्वात लांब कारने तोडलेत रेकॉर्ड्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत सगळ्यांनाच कारचं अप्रूप असतं. अर्थात, सर्वसामान्यांसाठी आधी स्वतःची बाईक/स्कुटर आणि मग पुरेसे पैसे जमले की स्वतःची कार घ्यायची असं गणित असतं.

सिनेमाच्या मोठ्या पडद्यावरही आपण डोळ्यांचं पारणं फिटेल अशा एका पेक्षा एक सरस कार पाहिलेल्या असतात, पण आजच्या घडीला तंत्रज्ञान इतकं प्रगत झालंय, की ते आपल्याला केवळ अशक्य वाटतील अशा आपल्या कल्पनेपलीकडल्या अनेक गोष्टी  सत्यात उतरवत आहे.

कार हे वाहन सगळ्या स्तरातल्या माणसांनी किमान पाहिलेलं तरी आहे, पण आपल्या परिचयाच्या असलेल्या कारचा चेहरामोहराच बदलून टाकून एका विलक्षण रूपात ती जर आपल्याला दिसली तर ती पाहायला, तिच्याविषयी जाणून घ्यायला कुणाला आवडणार नाही?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ने आपल्या वेबसाईटवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जीर्णोद्धार केल्या गेलेल्या अशाच एका अतिशय नवलपूर्ण कारचा फोटो पोस्ट केला आहे. या अद्भुत कारविषयी आणि त्यातल्या वैविध्यपूर्ण सुविधांविषयी जाणून घेऊया.

‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’नुसार ‘द अमेरिकन ड्रीम’ या नावाच्या जगातील सर्वात लांबलचक कारचा तिच्या सगळ्या वैभवासकट जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या कारने स्वतःचाच स्वतःचा रेकॉर्ड मोडला आहे.

१९८६ साली कॅलिफोर्नियाच्या बरबँक या शहरात जय ओहरबर्ग या कार कस्टमायझरने ही मूळ कार तयार केली होती. त्यावेळी या कारची लांबी ६० फूट होती. तिला २६ चाकं होती आणि तिच्या पुढे आणि मागे V8 इंजिन्स जोडलेले होते.

बऱ्याच सुधारणा केल्यानंतर ओहरबर्ग यांनी ३०.५ मीटर्सनी म्हणजे १०० फुटांनी ही कार आश्चर्यकारकरित्या वाढवली. या वर्षी मात्र ही अलिशान कार १.५० इंचांनी आणखी वाढवण्यात आली आहे.

car im

 

‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ने आपल्या वेबसाईटवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर या नव्याने जीर्णोद्धार केलेल्या कारचा फोटो पोस्ट केला आहे.

भारतीय मार्केटनुसार पाहिलं तर, या ‘द अमेरिकन ड्रीम’च्या शेजारी प्रत्येकी साधारण १५ फुटांच्या ६ होंडा सिटी सेडन्स एकामागोमाग एक पार्क केल्या तरीही थोडी जागा बाकी उरेल इतकी या कारची लांबी आहे.

‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’नुसार, १९७६ च्या ‘कॅडिलॅक एल्डोरॅडो लिमोझिन्स’ या आलिशान गाडीला डोळ्यांसमोर ठेवून ही कार तयार करण्यात आली होती. ही कार दोन्ही बाजूंनी चालवता येते.

ही कार दोन विभागांमध्ये तयार केलेली असून कारचे कोपरे घट्ट वळवता येणाऱ्या बिजागरीने ती मधोमध जोडलेली आहे. या कारमध्ये आपल्याला अचंबित करतील अशा अनेक उत्तमोत्तम सुविधा आहेत.

 

car im 1

 

ही कार भलामोठा वॉटरबेड, डायविंग बोर्ड सकट स्विमिंग पूल, जॅकुझ्झी, बाथटब, मिनी गोल्फ कोर्स, वेगवेगळे टेलिव्हिजन संच, टेलीफोन्स, फ्रीज आणि चक्क हेलिपॅड अशा नाना सुविधांनी युक्त आहे.

“हे हेलिपॅड वाहनाला संरचनात्मकरित्या माउंट करण्यात आलं असून त्याच्या खाली स्टील ब्रॅकेट्स आहेत. या हेलिपॅडमध्ये ५,००० पाउंड्स  वजन पेलण्याची क्षमता आहे.”, अशी माहिती ‘द अमेरिकन ड्रीम’च्या जीर्णोद्धाराच्या कामात ज्यांचा सहभाग होता त्या मायकेल मॅनिंग यांनी ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ला दिली. ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’नुसार, ही कार तब्बल ७५ लोकांना सामावून घेऊ शकते.

‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’च्या पेजवर ही पोस्ट शेअर केली गेल्यानंतर या पोस्टने मोठ्या प्रमाणावर लोकांचं लक्ष वेधून घेतलंय. या कारमध्ये स्विमिंग पूल, हेलिपॅड, गोल्फची सुविधा आहेत यावर काही युजर्सचा विश्वासच बसू शकला नाही.

“ही कार नसून ट्रेन आहे… कारची एक व्याख्या आहे आणि आपल्या नेहमी दिसतं त्यापलीकडे काहीही वेगळं असेल तर त्याची असामान्य गोष्टींमध्ये गणना होते.”, अशी मजेशीर कमेंट करा युजरने केली.

 

car im 2

 

ही कार भव्यदिव्य आहे यात काही शंकाच नाही. पण या कारच्या इतक्या भल्यामोठ्या आकारामुळे शहराच्या रस्त्यांवर ती कशी चालवली जाईल अशी काही लोकांना काळजी वाटतेय.

या कारच्या जमान्यात ‘द अमेरिकन ड्रीम’ अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती आणि वारंवार ती भाड्याने घेतली जायची,  पण तिच्या मेंटेनन्सचा प्रचंड खर्च आणि पार्किंगची समस्या पाहता लोकांचा या कारमधला रस संपला आणि ती कार गंजायला सुरुवात झाली.

 

car im 3

 

ही कार बरीच वर्षं न्यू जर्सी वेअरहाऊसच्या मागे नादुरुस्त अवस्थेत बरीच वर्ष तशीच पडून होती. काही काळानंतर मॅनिंग यांनी या कारचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं आणि ‘इबे’कडून ती विकत घेतली. ही कार आपल्या मूळ स्थितीत परत आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले.

‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’च्या माहितीनुसार, शिपिंग, साहित्य आणि श्रम या सगळ्यांचा मिळून कारच्या जीर्णोद्धारासाठी तब्बल २,५०,००० डॉलर्स खर्च आला आणि जीर्णोद्धाराचं हे काम पूर्ण व्हायला तीन वर्षं लागली.

‘द अमेरिकन ड्रीम’ रस्त्यावर चालवली जाणार नाही. ‘डेझरलँड पार्क कार म्युझियम’मध्ये संग्रहित केलेल्या अद्वितीय आणि क्लासिक कार्सचा ती भाग असेल.

बॉलिवूडचा ‘स्वदेस’, मराठीतला ‘हॅप्पी जर्नी’ यांसारख्या चित्रपटांतून चित्रपटातल्या पात्रांना अशा भरपूर सोयीसुविधा असलेल्या गाड्यांमध्ये राहताना आपण पाहिलंय. प्रत्यक्षात जाऊदेच पण पडद्यावर पाहतानाही ती दृश्यं काय सुरेख दिसली आहेत!

‘द अमेरिकन ड्रीम’ ची एकूणच किमया पाहता ज्या जमान्यात ही कार चित्रपटांमध्ये दाखवली जायची त्या काळात आपण जन्माला आलो असतो तर किती बरं झालं असतं असा विचार मनात येतो. भविष्यात अशा सुंदर सुंदर गाड्यांचं दर्शन आपल्याला चित्रपटांमधून किंवा प्रत्यक्षात म्युझियम्समधून होत राहो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?