' “याला समीक्षण म्हणायचं का?” कश्मिर फाईल्सबद्दल अखेर यांनी गरळ ओकलीच! – InMarathi

“याला समीक्षण म्हणायचं का?” कश्मिर फाईल्सबद्दल अखेर यांनी गरळ ओकलीच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

सोशल मीडियाची ताकद केवढी आहे हे आपण गेल्या ३ ते ४ दिवसांत अनुभवलं असेलच. कमी स्क्रीन्समधून सुरुवात करणाऱ्या ‘द कश्मिर फाइल्स’ या सिनेमाने आता पूर्ण बॉक्स ऑफिसवर चांगलीच पकड घेतली आहे.

बऱ्याच थिएटरमध्ये सिनेमाला स्क्रीन न दिल्याने वाद झाले, सुरू असलेले शोज हाणून पाडायचा प्रयत्न केला गेला पण तरी याचा काहीच फायदा झाला नाही, सगळीकडे याच सिनेमाचे शोज हाऊसफूल होत आहेत आणि सिनेमाला अभूतपूर्व यश मिळत आहे.

एकीकडे सिनेमा पाडायचा प्रयत्न होत आहे तर एकीकडे सोशल मीडियावर सिनेमाबद्दल खूप काही बोललं जात आहे. ज्यांना सिनेमा आवडला आहे, ते सिनेमाविषयी भरभरून बोलत आहे, ज्यांना हा सिनेमा प्रोपगंडा सिनेमा वाटतोय ते खुलेआम या सिनेमाचं विरोध करताना दिसत आहे.

 

the kashmir files 3 IM

 

येणाऱ्या काळात वादग्रस्त पोलिटिकल सिनेमांच्या यादीत ‘द कश्मिर फाइल्स’ हा वरच्या स्थानावर असेल हेदेखील खरं आहे, पण केवळ राजकीय मतभिन्नता म्हणून या सिनेमाला मूळ प्रवाहातल्या लोकांनी ज्यापद्धतीने दुर्लक्षित केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे.

खरंतर काश्मिरच्या परिस्थितिवर आजवर बरेच सिनेमे येऊन गेले पण कोणत्याही सिनेमातून हे दाहक वास्तव न दाखवता त्यातून एक वेगळाच अजेंडा सेट करण्यात आला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतीय आर्मीला व्हिलन म्हणून दाखवणारे आणि आतंकवाद्यांचं समर्थन करणारे असे बरेच सिनेमे आले, पण कोणत्याही सिनेमात काश्मिर पंडितांच्या या नरसंहाराचा साधा उल्लेखही आपल्याला दिसला नव्हता.

जेव्हा द कश्मिर फाइल्स या सिनेमाची घोषणा केली गेली तेव्हा कुठे या फिल्ममेकर्सचे डोळे उघडले आणि केवळ स्वतःचा अजेंडा रेटण्यासाठी विधु विनोद चोप्रासारख्या नामवंत दिग्दर्शकाने ‘शिकारा’ नावाचा सिनेमा केला, ज्याने फक्त काश्मिरी पंडितांच्या जखमांवर मीठ चोळायचं काम केलं होतं!

 

shikara IM

 

शिकारा या सिनेमाचं जेव्हा खास स्क्रीनिंग झालं तेव्हा सिनेमा पाहून एका काश्मिरी हिंदू स्त्रीने ज्या प्रकारे विधु विनोद यांना खडेबोल सुनावले होते तेव्हाच तो व्हिडिओ चांगला व्हायरल झाला होता, तेव्हा तर नंतर यावर प्रतिक्रिया देताना विधु विनोद चोप्रा यांची “झालं गेलं विसरून माफ करा” असं स्टेटमेंट करण्यापर्यंत मजल गेली होती.

यावेळेससुद्धा असंच काहीसं काश्मिर फाइल्सबाबत घडलं आहे, पण यावेळेस विधु विनोद चोप्रा यांच्या पत्नीने या सिनेमाविषयी गरळ ओकली आहे, खरंतर या सिनेमाला सगळ्या समीक्षकांनी boycott केलं आहे आणि इंडस्ट्रीतल्या मोठमोठ्या लोकांनीसुद्धा या सिनेमाविषयी ब्र देखील काढलेला नाही.

अशा परिस्थितीत अनुपमा चोप्रा यांच्या film companion या साईटवर ‘द कश्मिर फाइल्स’चं परीक्षण करणारा लेख छापण्यात आला, हा लेख ज्या विकृत मानसिकतेतून लिहिला गेला आहे, त्याची कीवसुद्धा येत नाही, इतका हा लेख कालच्या पातळीवर जाऊन लिहिला आहे.

हा लेख तुम्ही पुढील लिंकवर जाऊन वाचू शकताThe Kashmir Files Is a Defensive and Dishonest Dive Into The Past

film companion या पोर्टलमध्ये बऱ्याच सिनेमांचे, छोट्या छोट्या प्रोजेक्टचेसुद्धा रिव्यू आपल्याला वाचायला मिळतात मग विवेक अग्निहोत्री यांच्या सिनेमालाच एवढी हीन दर्जाची वागणूक का?

 

film companion IM

 

आज ज्या सिनेमाला साऱ्या जनतेने डोक्यावर घेतलं आहे त्या सिनेमाविषयी जाणून बुजून इतकं विखारी लिहिणाऱ्या माणसाला समीक्षक तरी म्हणावं का? असा प्रश्न आपल्या मनात येतो. फुकट पॉपकॉर्न आणि पिझ्झासाठी सिनेमा बघून लेख लिहिणाऱ्या या समीक्षकाच्याच मानसिकतेविषयी आणि त्याने लिहिलेल्या लेखाबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत!

film companion साठी कश्मिर फाइल्सचा रिव्यू लिहिणाऱ्या या महाशयांचं नाव आहे राहुल देसाई, या लेखाचं शीर्षक वाचूनच तुम्ही दंग व्हाल. या शीर्षकात त्याने या सिनेमाला जी विशेषणं दिली आहेत ती वापरताना यांना खरंच काही वाटलं नसेल का?

या शीर्षकमधून त्यांना असं म्हणायचं आहे की हा सिनेमा बचावात्मक पवित्रा घेऊन बनवला असून, असत्य गोष्टी या सिनेमातून मांडण्यात आलेल्या आहेत!

 

the kashmir files title IM

 

याचा अर्थ म्हणजे जी लोकं सिनेमा बघून ओक्साबोक्शी रडत बाहेर येत आहेत, ते चुकीचे आहेत, एवढ्या लाखो लोकांना ही कथा आपलीशी वाटतिये आणि म्हणूनच त्यांच्या डोळ्यातून पाणी येतंय पण या अशा समीक्षकांसाठी हा सिनेमा म्हणजे बचावात्मक धोरण आणि असत्याचे प्रयोग आहेत!

kashmir files 2 IM

 

पुढे यांनी या सिनेमाची तुलना थेट schindler’s list शी करून काश्मिरी पंडितांची तुलना ज्यू लोकांशी केली आणि मुस्लिम आतंकवादी लोकांची तुलना थेट नाझी सैनिकांशी केली, तसंच JNU मधल्या चित्रीकरणावरसुद्धा या महाशयांना आक्षेप आहे.

अर्थात असणारच कारण इतकी वर्षं याच intellectuals लोकांनी यांना आजवर जो इतिहास शिकवला आणि ज्या गोष्टी लपवून ठेवल्या ते पाहता यांनी असं विधान करण सहाजिक आहेच.

चित्रपटात अरुंधती रॉय आणि आतंकवाद्यांशी असलेलं साटलोटं, शिवाय JNU च्या तुकडे तुकडे गॅंगचे मनसुबे अगदी बेधडकपणे मांडले आहेत, त्याच्याशी यांना प्रॉब्लेम असणारच ना, कारण यांना फंडिंग कुठून मिळतं हे आपण सगळेच जाणतो!

 

arundhati roy yasin malik IM

 

जे आहे ते सत्य दाखवलं तरी त्यांना तोंड फिरवून गप्प राहायचं आहे, पण “ये पब्लिक है ये सब जानती है” याचा या बुद्धीजीवी लोकांना विसर पडलेला दिसतोय!

 

SS 2 IM

 

पुढे तर या लेखात असं म्हंटलं गेलंय की हा सिनेमा सध्याच्या हिंदू राष्ट्रवादाला खतपाणी घालणारा असून, या लेखात या सिनेमासाठी वापरलेले शब्द ही खूप लाजिरवाणे आहेत. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराला तर इथे थेट all-out torture porn हा शब्द वापरला गेला आहे.

खरंतर या शब्दांच्या प्रयोगावरुनच हा लेख लिहिणाऱ्या माणसाची मानसिकतेचा आपल्याला अंदाज येतो!

 

SS 3 IM

 

यापुढे लिहिलेली गोष्ट तर खरंच त्या काश्मिरी पंडितांच्या जखमांवर मीठ मसाला लावून चोळण्यासारखं आहे. लेखात सिनेमाच्या शेवटच्या आणि काही हिंसक सीन्सविषयी लिहिताना या लेखकाने असं म्हंटलंय की “सिनेमात या लोकांना militant म्हंटल्याने त्यांना तसं संबोधणं आवश्यक आहे, त्यांना जर तुम्ही रेबेल म्हणून संबोधलं तर तुम्हाला रोष पत्करावा लागेल!”

निष्पाप लोकांवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांना ‘rebel’ म्हणजे क्रांतिकारक म्हणणारी जमात ही फक्त आपल्याच देशात आपण पोसतो, बाहेरच्या देशात कुणी असं उद्गार जरी काढलं तर होणाऱ्या शिक्षेचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही, याहून अभिव्यक्ति स्वातंत्र्य किती हवंय?

भारतीय सुरक्षा दलावर बलात्कारासारखे गंभीर आरोप लावण्यापासून इथवर या लोकांची मजल गेली आहे, आणखीन किती आपण यांचं ही अभिव्यक्ति स्वातंत्र्य खपवून घ्यायचं हे ज्याचं त्याने ठरवावं!

 

critic IM

 

हे तर काही ठराविक मुद्देच आहेत जे इथे मांडता आले आहेत, बाकी एकंदर हा संपूर्ण लेख अशाच विषारी शब्दांनी भरलेला आहे. एवढ्या भयंकर नरसंहाराविषयी इतकं विचित्र बोलताना कुणाला काहीच कसं वाटत नाही? सिनेमा, दिग्दर्शक, राजकीय मतभेद या सगळ्या खूप नंतरच्या गोष्टी आहेत, पण एक माणूस म्हणून या समीक्षकांमध्ये थोडी तरी संवेदनशीलता शिल्लक आहे की नाही? असा सवाल माझ्या मनात येतो.

भले तुमच्यात वैचारिक मतभेद असतील, क्रिएटिव्ह डिफरन्स असतील, राजकीय मतभेद असतील पण जर तुम्हाला एखाद्या सिनेमाविषयी चांगलं बोलायचं नसेलच तर निदान त्याबद्दल एवढी गरळ तरी ओकू नये!

सिनेमाचा विषय काय आहे? त्या लोकांवर काय अत्याचार झाले आहेत याची ०.००१% जरी जाणीव हा लेख लिहिणाऱ्या सो कॉल्ड समीक्षकाला असती तर त्याने हे असे शब्द लिहिण्याआधी १००० वेळा विचार केला असता!

सिनेमा आवडला किंवा नाही या गोष्टी वैयक्तिक आहेत, पण इतक्या गंभीर गोष्टींवर अशा भाषेत टिप्पणी करणं मानवतेच्या कोणत्या व्याख्येत बसतं हे परमेश्वरच जाणे!

अनुपमा चोप्रा आणि तिच्या या ऑनलाइन पोर्टल टीमकडून या अशा गोष्टी आपल्यासाठी काही नवीन नाहीत, खरंतर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीच या अशा विकृत मानसिकतेने भरलेली आहेत!

 

anupama chopra IM

 

आता सोशल मीडियामुळे यांचा पाखंडीपणा बाहेर येऊ लागलाय, आणि म्हणूनच संपूर्ण film fraternity ने या सिनेमाकडे दुर्लक्ष करूनसुद्धा, असे विखारी लेख लिहूनसुद्धा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घालतोय, ही ताकद आहे ती सामान्य जनतेची आणि सच्च्या सिनेप्रेमींची!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?