' क्लेप्टोमेनिया म्हणजे काय? करोडपती असूनही दिवसाला हजारोंची पाकीटमारी करणारी रूपा दत्ता – InMarathi

क्लेप्टोमेनिया म्हणजे काय? करोडपती असूनही दिवसाला हजारोंची पाकीटमारी करणारी रूपा दत्ता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘दे धक्का’ चित्रपटातलं सिद्धार्थ जाधवचं पात्रं आठवतंय? त्या पात्राला चोरी करायची सवय होती. असंच एक दुसरं पात्रं म्हणजे ‘ब्रेकिंग बॅड’ या अतिशय लोकप्रिय वेब सिरीजमधलं मुख्य नायकाच्या/खलनायकाच्या मेव्हणीचं पात्रं. बरं हे पात्रं तर अगदी डॉक्टर असूनही तिला चोरी करायची सवय होती. या दोन्ही पात्रांना ‘क्लेप्टोमेनिया’ हा मानसिक आजार झाला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हा आजार झालेली व्यक्ती गरीब आहे, तिला पैशांची गरज आहे म्हणून चोरी करतेय असंही नसतं. आर्थिक परिस्थिती अगदी व्यवस्थित असूनही आणि चोरी करण्याच्या कृतीतून कुठलाही वैयक्तिक फायदा मिळणार नसतानाही अशी व्यक्ती चोरी करते. हे ती जाणूनबुजून करते असंही नाही. अशी चोरी तिच्याकडून नकळत होते.

 

siddharth jadhav 2 IM

 

या आजारामागे बरीच मानसिक कारणं असू शकतात. रूपा दत्ता या अभिनेत्रीला पाकीटमारीच्या गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. तिला क्लेप्टोमेनिया झाला असल्याचं समजतंय.

रूपा दत्ता रोज चोरी करायची नाही. पण करोडो रुपयांची मालकीण असलेली ही अभिनेत्री थोड्याथोडक्या नाही तर जवळपास ६०-५० हजारांची पाकीटमारी वारंवार करायची.

 

rupa dutta IM

 

याच पार्श्वभूमीवर क्लेप्टोमेनिया म्हणजे काय? त्यामागची कारणं, त्याचं निदान, त्यावरचे उपचार आणि रूपा दत्ताच्या पाकीटमारीचं सविस्तर वृत्त समजून घेऊया.

काय आहे क्लेप्टोमेनिया?

या विकाराचं बऱ्याचदा व्यवस्थित निदान होत नाही आणि हा विकार झालेल्यांमध्ये या विकाराच्या बरोबरीनेच नैराश्य, अँझायटी, खाण्याशी संबंधित विकार, अल्कोहोल आणि इतर अमली पदार्थांच्या सेवनासंबंधित विकार असल्याचंही आढळतं. हा विकार झालेल्या व्यक्तीच्या मनात सातत्याने चोरी करण्याचे विचार येतात. चोरी करण्याची जी प्रबळ इच्छा होते त्या इच्छेला आळा घालणं शक्य होत नाही.

चोरी केल्या केल्या त्यांना एकदम हायसं वाटतं. क्लेप्टोमेनियाच्या या लक्षणांवरून हा विकार ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर्सच्या प्रकारात मोडू शकतो. कुठलीही पूर्वयोजना आखलेली नसताना अचानक तीव्र इच्छा झाली म्हणून क्लेप्टोमेनिया झालेली व्यक्ती चोरी करते.

ही चोरी कुठल्या रागातून किंवा कुणावर सूड उगवायचा म्हणून केली जात नाही. असा विकार असलेल्या व्यक्ती प्रचंड तणावाखाली असतात आणि त्याच्या मनात अपराधीपणाची आणि पश्चात्तापाची भावना तीव्र स्वरूपात असते.

अशी लक्षणं एकाच वेळी बरेच विकार होण्याला आणि त्यांची तीव्रता वाढण्याला कारणीभूत ठरू शकतात. चोरीशी संबंधित अशी लक्षणं असलेली व्यक्ती समाजापासून वेगळी पडणे आणि अमली पदार्थांचं सेवन अशांसारख्या समस्यांमधूनही जाऊ शकते.

क्लेप्टोमेनिया होण्यामागची कारणं :

१. मनोविश्लेषणात्मक कारणं –

बऱ्याच मनोविश्लेषणात्मक सिद्धांतांनुसार क्लेप्टोमेनिया झालेली व्यक्ती खरोखर काहीतरी गमावल्यामुळे किंवा आपण काहीतरी गमावू या भीतीपायी निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी वस्तूंची चोरी करते.

‘ड्राइव्ह थेअरी’नुसार आपल्याला नकोश्या वाटणाऱ्या भावना व्यक्त करायच्या नसतील तर त्यावरचा डिफेन्स मेकॅनिझम म्हणून व्यक्ती अशा प्रकारे चोरी करते.

काही फ्रेंच मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, क्लेप्टोमेनिया झालेल्या व्यक्तींना केवळ एखादी गोष्ट हवी असते आणि त्यांना चोरी केल्यावर जे वाटतं ते अनुभवायचं असतं म्हणून ते अशा प्रकारे चोरी करत असावेत.

 

kleptomania im

 

२. कग्निटीव्ह बिहेविअरल मॉडेल्स –

कग्निटीव्ह बिहेविअरल मॉडेल्सनुसार, व्यक्तीने काही गोष्टी चोरल्यावर त्या व्यक्तीच्या अशा वर्तनाला जर प्रोत्साहन मिळालं, त्याला जर अशा वर्तनासाठी काहीच शिक्षा झाली नाही काही किंवा त्याच्यावर या कृतीचे अगदीच किरकोळ परिणाम झाले तर त्या व्यक्तीने वारंवार अशा प्रकारे वागण्याच्या शक्यता वाढतात.

असं वर्तन जेव्हा पुन्हा पुन्हा घडत राहतं तेव्हा ही कृती करण्याकरता काही अतिरिक्त कारणं माणसाच्या मनात तयार होतात आणि त्यांची एक साखळीच तयार होते.

३. जीवशास्त्रीय कारण –

काही अभ्यासांनुसार, मेंदूतील सेरोटोनिन, डोपामाईन आणि नैसर्गिक ओपीऑईड्सच्या वाईट नियमानामुळे क्लेप्टोमेनिया होतो.

रूपा दत्ताला अटक :

रूपा दत्ता या अभिनेत्रीला ‘कोलकाता इंटरनॅशनल बुक फेअर’मध्ये पाकीटमारीच्या आरोपाखाली कलकत्ता पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

पोलिसांना तिच्या बागेत तब्बल ६५,७६० रुपये रक्कम सापडली असून रूपा यावर पोलिसांना काहीच समाधानकारक उत्तर देऊ शकलेली नाही. या संदर्भात पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा आपण या गर्दीने भरलेल्या प्रदर्शनात पाकीटमार केल्याचं तिने मान्य केलं आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिने पहिल्यांदाच अशी चोरी केलेली नाही. पोलिसांना तिच्या बॅगेत एक डायरीही सापडली आहे ज्यात तिने आपण केलेल्या चोऱ्यांच्या नोंदी ठेवल्या आहेत.

 

rupa datta im 1

 

समोर आलेल्या वृत्तानुसार रूपाच्या या डायरीत कलकत्त्यातल्या काही गर्दीच्या ठिकाणांच्या नोंदी आहे जी ठिकाणं तिची नेहमीची टार्गेट्स असू शकतात. या प्रदर्शनस्थळी रूपा काही पैशांच्या बॅग्स कचरापेटीत टाकत असताना पोलिसांना आढळली आणि तिने चोरी केली असावी असा संशय पोलिसांना आला.

पोलिसांना तिच्याकडून पैशांच्या अनेक बॅग्स मिळाल्या आणि त्यांनी तिला अटक केली. ‘बिधाननगर नॉर्थ पोलीस स्टेशन’चे सब इंस्पेक्टर जयन्य नाथ साह यांच्या तक्रारीवरून इंडियन पेनल कोडचं कलम ३७९/४११ तिच्या विरोधात लावण्यात आलं आहे.

१२ तारखेला संध्याकाळी ५:१५ वाजता हे सब इंस्पेक्टर आपली आर. टी. ड्युटी करत असताना त्यांना ‘कोलकाता बुक फेअर’मध्ये गोंधळ चाललेला आढळला. या सगळ्यात हस्तक्षेप केल्यावर रूपा दत्ता पर्समधून पैसे चोरताना पोलिसांना सापडली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली आणि अधिक तपासणी केल्यानंतर तिच्याकडच्या अनेक पर्सेसमध्ये तब्बल ६५,७६० रुपये सापडले.

तिच्याजवळ इतक्या पर्सेस कशा अशी पोलिसांनी विचारणा केल्यावर ती काहीच कारण देऊ शकली नाही. रविवारी या अभिनेत्रीला न्यायालयात हजर केले गेले. तिचा जामीन नाकारला गेला आणि तिला एका दिवसाची कोठडी सुनावली गेली.

 

jail im

 

कोल्ड ड्रिंक प्यायल्यावर त्याची बाटली कचरापेटीत टाकत असताना आपल्याला तिथे पर्स दिसली आणि आपण ती पर्स उचलल्यावर पोलिसांनी आपल्याला अटक केली असा या अभिनेत्रीने कोर्टात दावा केला. पोलिसांना मिळालेली बॅग तिची नसून तिने ती कचरापेटीतून उचलली होती असाही दावा तिने यावेळी केला.

रूपा दत्ता क्लेप्टोमेनियाने ग्रस्त असण्याची दाट शक्यता आहे. रूपा दत्ताने टॉलिवूडच्या आणि बऱ्याच हिंदी सिरियल्समध्ये कामं केली आहेत. तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर तिने तिची ओळख ‘पश्चिम बंगालच्या करणी सेनेची अध्यक्षा’ अशी लिहिली आहे.

तिने अनुराग कश्यप या दिग्दर्शकावर आपल्याला अयोग्य प्रकारचे मेसेजेस पाठवल्याचा आरोपही केला होता. या आरोपात काही तथ्य नसून अनुराग नावाच्या एका दुसऱ्या इसमाकडून तिला ते मेसेजेस आले होते.

चोरीचा गुन्हा ही गंभीर समस्या आहेच. पण नकळतपणे जेव्हा व्यक्ती अशी चोरी करते तेव्हा त्या व्यक्तींच्या या वर्तणूकीकडे वेळीच लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण ही केवळ हेतूपुरस्सर केलेली चोरी नसून एका मानसिक आजाराचा तो दुष्परिणाम असतो.

नैराश्य, अँझायटी, अमली पदार्थांचं व्यसन यांच्यावर वेळीच उपचार व्हायला हवेत नाहीतर असा एखादा अनपेक्षित विकारही माणसाला होऊ शकतो यादृष्टीने ही धोक्याची घंटा म्हणता येईल.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?