' युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलास!! महाराष्ट्र सरकार उचलणार मोठ्ठं पाऊल

युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलास!! महाराष्ट्र सरकार उचलणार मोठ्ठं पाऊल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमधील भारतीयांना मायभूमीत परतण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये रशिया किंवा युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे तब्बल १८००० विद्यार्थी आहेत. यातील २००० विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. युद्धामुळे मध्येच शिक्षण अर्धवट सोडून येण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे. पुढे यांच्या शिक्षणाचे काय होणार? यांना कुठे नवी संधी मिळणार ? असे प्रश्न या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात उत्पन्न होत असतानाच सरकार कडून काही मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

यूक्रेन मधील अभ्यासक्रम आणि भारतातील अभ्यासक्रम यात फरक असल्याने युक्रेनमधील विद्यापीठाशी संलग्न राहून भारतात उर्वरित शिक्षण पूर्ण करता येईल का किंवा कसे, याबाबत केंद्र सरकार पावले उचलत आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे, यात आता महाराष्ट्र सरकार ही विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे.

 

students im

 

आपल्या पाल्यांच्या भवितव्याच्या चिंतेत असलेल्या पालकांना महाराष्ट्र सरकारकडून काही दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात महाराष्ट्र सरकारची भूमिका नक्की काय आहे? कोणत्या प्रकारची मदत सरकार कडून पालकांना होवू शकते? चला पाहूया.

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे शिक्षण सोडून भारतात परतलेल्या या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मदत करता येईल, याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी संबंधीतांची बैठक घेतली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) युद्धग्रस्त युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यास तयार आहे आणि त्यापैकी काहींना NEET मध्ये बसण्याची परवानगी देखील दिली जाऊ शकते, या अशा काही मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

 

neet im

 

या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) माधुरी कानिटकर आणि शिवसेना विधानपरिषद सदस्य मनीषा कायंदे हे उपस्थित होते. “MUHS ने युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय अभ्यासक्रम चालवण्याची तयारी दर्शवली आहे कारण त्यांनी रशियाच्या आक्रमणामुळे त्यांचे शिक्षण बंद केले आहे.

हे सर्व शिक्षण ऑनलाइन अभ्यासक्रमाद्वारे पूर्ण करता येईल का? याची आम्ही चाचपणी करत आहोत. ” कायंदे यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. “यामध्ये अभ्यासक्रमाचे काही भाग समाविष्ट असतील जे शिकण्यापासून विद्यार्थी वंचित राहिले असते. आम्ही विद्यार्थ्यांना इतर काही पर्याय देखील देत आहोत आणि सर्व शक्यतांचे मूल्यांकन केले जात आहे,” असे ही कायंदे यांनी संगितले.

 

Online Classes fallout InMarathi

युक्रेनच्या धगधगत्या युद्धभुमीत ‘माणुसकी’ म्हणजे काय हे दाखवणारा भारतीय

 

ज्यांनी केवळ नोव्हेंबर २०२१ मध्ये किंवा नंतर युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला होता त्यांनाही राष्ट्रीय पात्रता सह प्रवेशासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाऊ शकते. भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेसंदर्भातील बैठकीला उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “प्रस्ताव सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि आम्ही सर्व त्यावर काम करत आहोत,

ज्यांनी युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नोव्हेंबर २०२१ मध्ये किंवा नंतर प्रवेश घेतला होता, त्यांना भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश (NEET) साठी देखील बसण्याची परवानगी दिली जाऊ शकते.” तेव्हा बैठकीत ठरल्याप्रमाणे जर घडले तर युक्रेनहून परत आलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना नक्कीच दिलासा मिळेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?