'इतिहास - "हार्ट" च्या चिन्हाचा आणि व्हॅलेंटाईन डे चा!

इतिहास – “हार्ट” च्या चिन्हाचा आणि व्हॅलेंटाईन डे चा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लाल बदाम म्हणजे हृदय असं प्रतिकात्मक मानल जात.आजवर कोट्यावधी लोकांनी आपल्या प्रेमाचे प्रतिक म्हणुन हे लाल बदाम वापरलेले आहेत. मानवी मनाचा प्रतिनिधी म्हणुन हृदयाला स्थान मिळाल आणि भावनिक बंध, आत्मिक, ईश्वरिय प्रतिक म्हणुन या लाल बदामाचा वापर होऊ लागला.

heart-marathipizza
emoji.com.tr

ऍरिस्टोटल सहित अनेक पाश्चात्य तत्वज्ञान्यांच्या मते हृदय हेच “विचार, कारण आणि भावनेचे”उगमस्थान आहे, मेंदु न्हवे.आत्म्याची बैठक म्हणजे हृदय. कारण मेंदु हा तत्वनिष्ठ आणि कसोट्या लावणारा असतो तर भावना कसोट्या लावत नाही.

या बदामाचा रंग लाल का? तर लाल रंग हा रक्त, भावना, संस्कृती, आकर्षण यांचे प्रतिनिधित्व करतो. १५ व्या शतकापासुन हा बदाम वापरण्यास सुरुवात झाली असे मानतात. काहींच्या मते “सिल्फियम” नामक औषधी झाडाच्या बिया या बदामाच्या आकाराचे उगमस्थान आहेत. काहींच्या मते हा बदामी आकार स्त्रीच्या गुप्तांगाचे प्रतिनिधित्व करतो. ज्वालमुखीमधे गडप झालेल्या “पॉम्पी” शहरातील वेश्यागृहात या प्रतिकाचा फार वापर झाला आणि त्याकाळात तो सुप्रसिद्ध होता, लोक प्रेमाचे प्रतिक म्हणुन हे चिन्ह गोंदवुन घेत. तर काहींच्या मते हे चिन्ह म्हणजे दोन राजहंसांच्या प्रणयराधना समयी दिसणाऱ्या मानेच्या आकारावरुन घेण्यात आलेले आहे.
———–
सेंट वेलेंटाईन :

सेंट वेलेंटाईन हे बऱ्याच हुतात्मा ख्रिस्ती संतांच नाव होत,आणि कुठल्या वेलेंटाईनच्या नावाने हा सण साजरा होतो याबद्दलही बरीच मतमतांतर आहेत.यापैकी सर्वात सुप्रसिद्ध कथा म्हणजे रोमन साम्राज्याने ख्रिस्ती सैनिकांचे लग्न लावण्याचा प्रमाद करणाऱ्या संत वेलेंटाईन बद्दल.

saint-valentine-marathipizza
youtube.com

त्याला १४ फ़ेब्रुवारी रोजी मृत्युदंड दिला गेला. तत्पुर्वी त्याने त्याने त्याच्य मुलीला एक कार्ड पाठवलं आणि त्यात शेवटी “तुझा वेलेंटाईन” असा उल्लेख केला. हे पहिले वेलेंटाईन कार्ड असे म्हणतात. यांना रोम येथे जाळुन ठार मारण्यात आल, त्यानंतर त्यांच्या कन्येने त्या जागेवर आलमंड नावाचा वृक्ष लावला, जो प्रेम आणि मैत्रीचे प्रतिक मानला जातो.

येथेही मतमतांतरे आहेत, काही लोकांच्या मते ह्या सर्व खोट्या कथा आहेत,”जिओफ़्रे कौसर” नामक थोर सहित्यिकाने १४ व्या शतकात एक रोमॅंटिक काव्य या वेलेंटाईनवर लिहिले आणि त्यानंतर या सर्व दंतकथा पसरल्या. त्या काव्यातिल काही ओळी अशा होत्या,

For this was on seynt Volantynys day
Whan euery bryd comyth there to chese his make.
[“For this was on Saint Valentine’s Day, when every bird cometh there to choose his mate.”]

आता या सगळ्याचा फ़ायदा व्यापारी न घेतील तर काय? १७९७ मधे ज्यांना काव्यामधे प्रेम व्यक्त करणे जमत नाही अशा प्रेमींसाठी वेलेंटाईन लव कार्ड छापले गेले .ही कल्पना कल्पनेबाहेर यशस्वी ठरली आणि मग वेलेंटाईन साहित्याचा पाउस विक्रिसाठी पडु लागला. ख्रिसमस नंतर सर्वाधिक साजरा केला जाणारा जागतिक सण म्हणजे वेलेंटाईन असावा, या एका दिवसाच्या निमित्तने अब्जावधी रुपयांची उलाढाल बाजारात होते.

आपल्याकडे हा उत्सव १९९२ च्या कालावधीत आला. नुकतेच जागतीकीकरणाचे वारे भारतात घुमु लागले होते आणि एम.व्ही. चॅनेल वगैरे मंडळींनी तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वाहिन्या असा प्रचार करुन याला हातभार लावला. १० रुपयाला एक याप्रमाणे प्रेम रस्त्यावर विकलं जाऊ लागलं.

valentine-marathipizza
atimes.com

मुलीने गुलाब घेतला तर ठिक, नाहीतर मग त्या गुलाबाच्या जागी सुरा तिच्या पोटात खुपसला जाऊ लागला. पाश्चात्यांना फ़ॉलो करताना “नकार” पचविण्याची त्यांची खिलाडुवृत्ती आपण सोयिस्करपणे विसरलो.

असो, ही प्रतिकं, भेटकार्ड, वस्तु असतील किंवा नसतील, हा सण साजरा केला जाईल किंवा न जाईल परंतु प्रेमाला या सर्वांची गरज कधीच भासली नाही की भासणार नाही. जेव्हा आपण बोलायला, लिहायला शिकलो नव्हतो तेव्हाही प्रेम केलच जात असेल, प्रेमाला प्रतिक किंवा भाषेची गरजच काय, हा तर दोन मनांच्या मनोमिलनाचा स्वर्णक्षण आणि सुवर्णक्षण साधायला कुठल्या मुहुर्ताची, वस्तुची गरज आहे असे मलातरी वाटत नाही.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?