' आधीची दोन युद्धं आणि आताचे रशिया युक्रेन, यांच्यात एक गोष्ट सारखी आहे, जाणून घ्या – InMarathi

आधीची दोन युद्धं आणि आताचे रशिया युक्रेन, यांच्यात एक गोष्ट सारखी आहे, जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठल्याही युद्धात असंख्य माणसांचा संहार होतोच पण त्यानंतरही दीर्घकाळ त्याचे पडसाद उमटत राहतात. महायुद्धाच्या बाबतीत तर अगदी अनेकं दशकं सरली तरी थोड्याफार प्रमाणात त्याचे परिणाम राहतातच. पाहिलं आणि दुसरं महायुद्ध संपूर्ण जगासाठीच अतिशय भीषण ठरलं. जपानने वेगाने प्रगती केलेली असली तरी हे राष्ट्र अजूनही दुसऱ्या महायुद्धाने केलेल्या विपरीत परिणामांतून पूर्णतः मुक्त झालेलं नाही. सध्या जगभरात रशिया-युक्रेनमधली चिंताजनक परिस्थिती नेमकं कुठली कुठली वळणं घेईल याचं प्रचंड भय पसरलंय.

 

world war 2 IM

 

अनेकांचं नुकसान झालेलं आहेच. जरा कुठे जग कोरोनाच्या भयातून सावरतंय तशात आता हे संकट नव्याने उद्भवलंय. हे सगळं अजून असं किती काळ सुरू राहणार हे आपल्याला कळेनासं झालंय. जे सगळे यात प्रत्यक्ष भरडले जात आहेत त्यांच्या परिस्थितीचा तर विचारही करवत नाही. ही तिसऱ्या महायुद्धाची तर नांदी नाही ना अशाही शक्यता वर्तवला गेल्या. सध्या या सगळ्या परिस्थितीविषयी लोकांकडून नाना तर्क लढवले जात आहेत. माणसाला कधी कशाचं कुतूहल वाटेल सांगता येत नाही.

 

russia im

 

कधीकधी अचानक एखादी गोष्ट आपल्याला सहज क्लिक होते आणि आपल्याला जे वाटतंय हे खरोखऱच तसं असेल का असा संबंध आपण जोडू पाहतो. एका व्यक्तीला तर थेट पाहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला या तिन्ही घटनांमध्येत एक विलक्षण साधर्म्य आढळलंय. या तिन्ही घटनांची सुरवात झाली त्या दिवसांच्या तारखांच्या आकड्यांची बेरीज सारखी येतेय असं त्याच्या लक्षात आलंय. नेमका काय आहे हा प्रकार?

पॅट्रिक बेट- डेव्हिड या व्यक्तीला या तिन्ही घटनांची सुरुवात झाली त्या दिवसांच्या तारखांच्या आकड्यांची बेरीज ६८ होतेय असं आढळलं आहे. ऑस्ट्रिया-हंगेरी ने सर्बियावर युद्ध करू असं जाहीर केलं ती तारीख पॅट्रिक ने पाहिली. तेव्हापसून पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. ही तारीख जुलै २८, १९१४ ही होती. पॅट्रिक ने ७ + २८ + १९ + १४ अशी बेरीज केली आणि ती ६८ आली. मग त्याने सप्टेंबर १, १९३९ ही दुसरं महायुद्ध सुरू झाल्याची तारीख घेतली आणि त्यातल्या १ + ९ +१९ + ३९ या आकड्यांची बेरीज केल्यावरही ६८ हेच उत्तर आलं.

 

ukrain russia featured IM

या उद्योजकाने त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध घोषित केलं  त्या दिवसाची म्हणजेच फेब्रुवारी २४, २०२२ ही तारीख घेतली. २४ + २ + २० + २२ अशी बेरीज केल्यावर आताही त्यांना ६८ हेच उत्तर मिळालं. “माझ्यासाठी सगळं काही गणिती सूत्र आहे. हे विचित्र आहे.” असं ट्विट करत त्यासोबत पॅट्रिक यांनी या तारखांमधला संबंध ट्विटरवर शेअर केलाय. तारखांच्या बेरजांचं हे सारखेपण खरंच बुचकळ्यात पाडणारं आहे.

 

Vladimir-Putin-russia-inmarathi01
interaztv.com

 

हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं असून त्याला ११,०००पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत आणि ३,३०० हून अधिक जणांनी ते रिट्विट केलंय. हे विचित्र आहे असं काही युजर्सनी त्यावर म्हटलंय. कुणीतरी असं ट्विट केलंय की, “लोक एखादं भाकीत वर्तवावं अशा आविर्भावात असं काही करतात ते मला अजिबात आवडत नाही. या वर्षातल्या प्रत्येक महिन्यात अशी एकतरी तारीख असेल ज्याची बेरीज ६८ होईल. असं होण्याची शक्यता फार कमी नाही.” तर दुसऱ्या युजरने असं लिहिलंय, “याचा काही अर्थ होतो का? कदाचित नाही. मात्र तरीही हे निरीक्षण रंजक आहे.

 

david im

 

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली त्याच्या तारखा आणि रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध घोषित केलं त्या दिवसाची तारीख यात काही संबंध असू शकेल का असा विचार मनात आल्यावर ते पडताळून पाहण्यासाठी त्या तारखांच्या आकड्यांची बेरीज करून बघूया असं एखाद्या माणसाला सुचणं याचंच मुळात नवल वाटतं पण पॅट्रिकचं हे निरीक्षण कितीही लक्षवेधी असलं तरी त्यापलीकडे त्याचा आणखी कुठला अर्थ असू नये हीच प्रार्थना.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?