' मार्केट टर्न-अराऊंड की डेड-कॅट-बाऊन्स? इन्व्हेस्टमेंट गुरु नीरज बोरगांवकर काय सांगतायेत… – InMarathi

मार्केट टर्न-अराऊंड की डेड-कॅट-बाऊन्स? इन्व्हेस्टमेंट गुरु नीरज बोरगांवकर काय सांगतायेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मार्केटने सलग दुसऱ्या दिवशी चांगलीच उसळी मारली. सध्याच्या मार्केटमध्ये असे अनेक जण आहेत ज्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली.

या कालावधीमध्ये मार्केट केवळ एकाच दिशेने वर चालले होते. परंतु गेल्या काही आठवड्यांमध्ये या रॉबिन हूडना चांगलाच फटका बसलाय. मार्केटमध्ये गेल्या दोन दिवसात आलेली सुधारणा कायमस्वरूपी असेल का? आता परत वरच्या दिशेने वाटचाल होणार आहे का? की सध्याचे इन्फ्लेशन, कच्च्या तेलाचे चढते भाव, वाढणारे इंटरेस्ट रेट्स यामुळे बाजार आणखी खाली येणार?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या अशा दोलायमान परिस्थितीमध्ये तुम्हाला नेहमीच एक भक्कम आधार हवा जो तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकतो! या क्षेत्रात वीस वर्षापासून काम करणारे नीरज बोरगांवकर हे असंच एक नाव. जाणून घेऊया, आज त्यांचं काय म्हणणं आहे…

 

neeraj borgaonkar IM

===

दिनांक – ९ मार्च २०२२

निफ्टी – १६३४५.३५ (+३३१.९०)
सेन्सेक्स – ५४६४७.३३ (+१२२३.२४)
बॅंकनिफ्टी – ३३८१५.४५ (+६५७.३५)
गोल्ड – ५५९००
यु एस डॉलर – ७६.५५

Nifty High Low – १५९९०.०० – १६४१८.०५

निफ्टीमधील टॉप गेनर्स – ASIANPAINT , RELIANCE , BAJFINANCE , INDUSINDBK , M&M

निफ्टीमधील टॉप लूझर्स – SHREECEM , ONGC , POWERGRID , NTPC , COALINDIA

 

nifty 50IM

तेजीचे वारे?

गेले काही दिवस युद्धाच्या पार्श्वभूमीवर मंदीमध्ये जाणारा आपला शेअर बाजार आज जोरात उसळल्याचे दिसून आले. रिलायन्स, एशियन पेंट्स यासारख्या काही शेअर्समध्ये गेले काही दिवस जी पडझड सुरु होती तिला आजच्या सत्रामध्ये ब्रेक लागल्याचे दिसून आले, आणि त्यामुळे निफ्टी निर्देशांकामध्ये एक मोठी उसळी दिसून आली.

काल व आज जरी बाजारामध्ये तेजी दिसलेली असेल, तरी बाजाराचा एकूण कल हा सध्या मंदीचाच दिसत आहे. सध्याचा काळ हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम असा काळ आहे. कारण बाजाराचा पीई रेश्यो हा सध्या 20 व 21 च्या मध्ये आहे.

पीई रेश्यो म्हणजे काय याचे सविस्तर विवेचन तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला मिळेल – https://youtu.be/eYeJerNvetc

पोझिशनल ट्रेडर्ससाठी सध्याचा काळ थोडासा व्होलटाईल आहे. पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे थोड्या कालावधीसाठी शेअर्स घेणे आणि भाव वाढल्यावर ते शेअर्स विकून नफा बूक करणे. अश्या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये शेअर्स दीर्घकाळ होल्ड करण्याची आवश्यकता नसते.

सध्याचा बाजाराचा एकूण कल हा नकारात्मक असल्यामुळे पोझिशनल ट्रेडर्सनी काळजी घेणे आवश्यक आहे. एखादी पोझिशन घेताना आपला “स्टॉप लॉस” किती हे अगोदर ठरवुन मगच ट्रेड घेणे योग्य राहील.

 

stop loss IM

ट्रेडिंगचा अजून एक प्रकार असतो तो म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग. या प्रकारामध्ये आज शेअर्स घ्यायचे आणि आजच ते विकून टाकायचे या तत्वावर काम केले जाते. शेअर बाजार सध्या व्होलटाईल असल्यामुळे सध्या इंट्राडे ट्रेडर्ससाठी बाजारामध्ये खूप मोठ्या संधी मिळत आहेत.

इंट्राडे ट्रेडिंग करणे सोयीचे जावे याकरिता तुम्ही आमचा RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकता. सध्या या RTSS टेलिग्राम चॅनलची दोन आठवड्यांची फ्री ट्रायल उपलब्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला ही फ्री ट्रायल मिळवता येईल – https://marathimarket.in/free-trial

फ्री ट्रायल घेण्याकरिता पहिले टेलिग्राम हे अ‍ॅप तुमच्याकडे इन्स्टॉल करुन घ्या आणि मग वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. हे केल्यानंतर तुम्हाला START असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करुन पुढे मिळणार्‍या सूचनांची पालन करा म्हणजे तुम्ही आपला RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकाल.

हे करीत असताना काही शंका आले तर आम्हाला connect@guntavnook.com येथे एक ईमेल करा म्हणजे तुमची शंका सोडवून दिली जाईल.

“गुंतवणूक कट्टा” हा खास मराठी माणसांकरिता चालवला जाणार एक उपक्रम असून यामध्ये एक “पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन” नावाचा ऑनलाईन कोर्स आम्ही तयार केलेला आहे.

 

neeraj borgaonkar 2 IM

 

या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याकरिता एका मोफत वेबिनारचे आयोजन केले आहे. हा वेबिनार आज रात्री नऊ वाजता घेतला जाईल. पुढील लिंकवर रजिस्टर केल्यास बरोब्बर रात्री ९ वाजता हा वेबिनार तुम्हाला बघता येईल.

वेबिनार सुमारे एक ते दीड तास चालेल आणि यामध्ये तुम्हाला आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली जाईल. हा वेबिनार नक्की अटेंड करा.

रजिस्ट्रेशन लिंक – https://marathimarket.in/register

===

टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?