' रजनीकांतने नाकारलेली ही भूमिका केवळ ‘नाना’मुळे अजरामर झाली! – InMarathi

रजनीकांतने नाकारलेली ही भूमिका केवळ ‘नाना’मुळे अजरामर झाली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजकुमार हा त्याच्या विक्षिप्त स्वभावासाठी इंडस्ट्रीत ओळखला जात असे. मात्र त्याच्या नावावर आणि त्याच्या दमदार संवादफेकीवर त्याचे चाहते इतके खुष असत की त्याचे सर्व नखरे सांभळूनही निर्माता या विक्षिप्त कलाकाराला चित्रपटात घेत असत.

मात्र त्याच्या या स्वभावाचा फटका कधी कधी निर्मात्याला बसत असे. याचं उदाहरण म्हणजे तिरंगा हा चित्रपट. हा चित्रपट नव्वदच्या दशकातला एक माईलस्टोन चित्रपट म्हणून ओळखला जातो.

 

tiranga IM

 

नाना पाटेकरच्या हिंदी चित्रपटातल्या कारकिर्दीला एक वेगळं वळण देणारा, राजकुमारच्या उतरत्या काळातला हिट आणि मेहूल कुमारच्या हिट यादीतला हिट अशी याची नोंद झाली आहे.

या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान मात्र मेहूल कुमारला अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं. मुळात तिरंगाची कथाच राजकुमारला डोळ्यासमोर ठेवून बेतलेली होती. त्यामुळे अर्थातच पहिली निवड त्याची झाली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खरा प्रश्न उभा राहिला तो त्याच्या सहकलाकार किंवा त्याच्याबरोबर जो दुसरा कलाकार होता त्याची निवड करताना. वास्तविक पहाता दोन्ही भूमिका तितक्याच दमदार होत्या (चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नानाचं जे कौतुक झालं त्यावरून हे सिध्दच झालं.)

मात्र राजकुमार सोबत काम करायला कोणीही बडा कलाकार तयार होत नव्हता. ही भूमिका घेऊन मेहूल कुमार सर्वात आधी रजनीकांतकडे गेले. दक्षिणेच्या बॉक्स ऑफिसचा राजा असणार्‍या रजनीनं कथा आणि भूमिका ऐकली मात्र राजकुमारसोबत काम करायचं आहे हे समजल्यावर त्यानं नम्रपणे नकार दिला.

 

rajnikanth IM

 

खरंतर राजकुमारसमोर त्याच ताकदीचा, बराबर की टक्करवाला अभिनेता मेहूल कुमारला हवा होता. त्यानंतर ही भूमिका आणि चित्रपटाचं स्क्रिप्ट घेऊन मेहूल नासिरुद्दीन शहाला भेटला. भूमिकेची ताकद लक्षात येऊनही नासिरनं या भूमिकेला नकार दिला. याचं कारण होतं राजकुमार.

त्याच्यासोबत काम करणं म्हणजे विकतची डोकेदुखी घेणं होतं. मेहूल कुमार चांगलाच अडचणीत आला. चित्रपटाची सगळी तयारी झालेली असताना केवळ राजकुमारमुळे दुसर्‍या भूमिकेसाठी कलाकार मिळणं मुश्किल झालेलं होतं. मेहूलला राजकुमारला काढणंही पटत नव्हतं.

राजकुमार तर हवाच होता आणि त्याच्यासमोर ताकदीचा दुसरा कलाकारही. आता ही निवड हे मेहूलसाठी शिवधनुष्य बनलं होतं. शेवटी विचार करता करता एकच नाव उरलं आणि ते म्हणजे, नाना पाटेकर.

 

nana patekar inmarathi 12
DNA india

 

नाना पाटेकर हे नाव अभिनयाच्याबाबतीत इतकं उंचावर जाऊन पोहोचलं होतं की तो या भूमिकेचं सोनंच करेल याबाबत मेहूलला शंकाच नव्हती. मात्र खरा प्रश्न हा होता कि नानाही तापट आणि राजकुमारही तापट. हे दोन पेटते पलिते एकत्र सांभाळणं फ़ार कठीण काम होतं.

मेहूलने नानाला भूमिका सांगून काम करण्याची गळ घातली मात्र रजनी आणि नासिरप्रमाणेच नानानेही स्पष्ट नकार दिला. एक कारण राजकुमार होतं तरी नानाचं खरं कारण होतं व्यावसायिक मसालापटात अभिनयाला फारसा वाव नसतो. गल्लाभरू चित्रपट करण्यात नानाला काहीही रस नव्हता.

मेहूलने खूप कष्टानं पटवून दिलं की ही भूमिका, हा चित्रपट त्याच्यासाठी नवं दालन ठरेल. व्यावसायिक चित्रपटातही नाना यशस्वी होईल. अखेर नानाने ही भूमिका तर स्विकारली पण आता नविनच पेच निर्माण झाला.

राजकुमारला जेंव्हा समजलं की दुसर्‍या भूमिकेसाठी नाना पाटेकर येणार आहे तेंव्हा तो मेहूलवर संतापला. नाना सेटवर खूप शिवी गाळ करतो आणि बोलताना तमिज आणि तेहजीब पाळणार्‍या राजकुमार हे पटणारं नव्हतं.

 

rajkumar and nana IM

 

अखेर मेहूलनं राजकुमारची समजूत काढली आणि आश्वासन दिलं की सेटवर चित्रीकरण वगळता एरवी हे दोघं समोरासमोर येणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल.

चित्रपटाचं चित्रीकरण पार पडलं, चित्रपट प्रदर्शितही झाला आणि त्याने छप्परफाड व्यवसायही केला. मात्र या संपूर्ण चित्रीकरण्यादरम्यान हे दोन अभिनेते परस्परांशी अजिबात बोलले नाहीत.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?