' नसिरुद्दिन शाह यांना झालेला ओनोमॅटोमेनिया हा आजार आहे तरी काय? वाचा – InMarathi

नसिरुद्दिन शाह यांना झालेला ओनोमॅटोमेनिया हा आजार आहे तरी काय? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही काही अभिनेते-अभिनेत्रींना आपण ‘अभिनयाचं विद्यापीठ’ असं म्हणतो. नसिरुद्दीन शाह या दिग्गज अभिनेत्याचं नाव या यादीत आवर्जून घेतलं पाहीजे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने वेगवेगळ्या कलाकृतींतून त्यांनी रसिकांना आजवर अमाप आनंद दिला.

 

naseeruddin shah inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आज वेब सिरीजच्या जमान्यातही नव्या अभिनेत्यांच्या तोडीस तोड भूमिका मिळवताना आणि तितक्याच ताकदीने त्या निभावताना नसिरुद्दीन शाह आपल्याला दिसतात. त्यांच्या जुन्या चित्रपटांमधल्या भूमिका असोत किंवा अलीकडच्या अभिनेते-अभिनेत्रींबरोबर साकारलेल्या भूमिका, नसिरुद्दीन शाह यांनी कायमच आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनावर आपली वेगळी छाप पडलीये. ते जसे त्यांच्या कसदार अभिनयासाठी ओळखले जातात तसेच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळेही चर्चेत असतात.

म्हातारपण आलं की गोष्टी विसरायला होणं, त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा बडबडणं हे ओघाने आलंच. आपल्याच आजीआजोबांच्या किंवा ओळखीच्या वयस्कर माणसांच्या बाबतीत ही गोष्ट आपण अनुभवलेली असते. पण एकच गोष्ट पुन्हा पुन्हा बड्बडण्याच्या सवयीसारखा एखादा आजारही असो शकतो हे कदाचित आपल्यातल्या बहुतेकांना माहीत नसेल.

नसिरुद्दीन शाह आपल्याला झालेल्या एका आजाराविषयी नुकतेच बोलले. ‘चलचित्र टॉक्स’ या युट्युब चॅनेलला मुलाखत देताना त्यांनी आपल्याला ‘ओनोमॅटोमेनिया’ या आजार झाला असल्याचं सांगितलं. त्यामुळे ते सतत अस्वस्थ असतात. नासिरुद्दीन शाह यांना झालेला हा आजार नेमका आहे तरी काय? जाणून घेऊया.

 

naseerudin im

 

‘चलचित्र टॉक्स’ या युट्युब चॅनेलला मुलाखत देताना नसिरुद्दीन शाह म्हणाले, “मी ओनोमॅटोमेनिया या आजाराने ग्रस्त आहे. मी विनोद करत नाहीये. असा आजार खरंच आहे. तुम्ही याविषयी शब्दकोशात शोधू शकता.” हा आजार झाल्यावर माणूस काय करतो हे सांगताना ते पुढे म्हणाले, “ओनोमॅटोमेनिया हा असा आजार आहे ज्यात तुम्ही एखादा शब्द किंवा वाक्प्रचार, एखादं वाक्य किंवा कवितेतील चरण किंवा भाषण तुम्हाला ऐकायला आवडतंय हे कारण सोडल्यास कुठल्याही कारणाशिवाय पुन्हा पुन्हा म्हणता. मी पूर्ण वेळ हेच करतो आणि कधीच स्वस्थ बसू शकत नाही. मी झोपेत असतो तेव्हाही मी माझ्या आवडीचा उतारा म्हणत असतो.”

काय आहे ओनोमॅटोमेनिया?

ओनोमॅटोमेनिया म्हणजे काही शब्दांची आणि त्या शब्दांचं जे महत्त्व आहे त्याविषयी कमालीची आसक्ती वाटणे. ओनोमॅटोमेनिया झालेले लोक काही विशिष्ट शब्दांमागे वेडे होतात आणि ते शब्द पुन्हा पुन्हा वापरतात.

दिल्लीतील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. पारुल अदलखा यांच्या म्हणण्यानुसार, “ओनोमॅटोमेनिया ही अशी अवस्था असते ज्यात व्यक्तीच्या डोक्यात सतत एखादा विशिष्ट शब्द, वाक्प्रचार, ओळ आणि आणखीही काही घोळत असतं आणि संभाषणांदरम्यान ती त्याचा पुन्हा पुन्हा वापर करते. अशा प्रकारच्या अती एकाग्रतेमुळे कधीकधी एखादा शब्द किंवा वाक्प्रचार काही केल्या आठवत नाही आणि मग व्यक्ती ते आठवायच्या जास्तच मागे लागते.”

 

naseerudin 1 im

 

ओनोमॅटोमेनिया मानसिक आजार आहे का?

‘फोर्टिस हेल्थकेअर’च्या ‘मेंटल हेल्थ अँड बिहेवियरल सायन्सेस’चे डायरेक्टर डॉ. समीर पारीख यांच्या म्हणण्यानुसार हा मानसिक आजार नाही. ते म्हणतात, “ओनोमॅटोमेनिया हा आजार नाही. तो एक रँडम शब्द आहे. त्यामुळे त्याला आजार किंवा मानसिक आजार असं नको म्हणूया. ज्या लोकांच्या एकूण कामकाजावर याचा परिणाम होतो त्यांना याचा त्रास होऊ शकतो. याखेरीज, आपण एखाद्या गोष्टीला तेव्हाच आजार म्हणतो जेव्हा ती गोष्ट आपल्या दैनंदिन वैयक्तिक आणि व्यावसायिक  जीवनावर वाईट परिणाम करते.” ,

 

tension inmarathi

 

उदाहरणार्थ ज्या लोकांचा साहित्याकडे कल आहे किंवा ज्यांना भाषेत रस आहे किंवा ज्यांना संगीत आवडतं त्यांच्या डोक्यात त्यांना आवडणाऱ्या गोष्टींचे विचार वारंवार येत असतात. अधिक सांगायचं झालं तर, जर तुम्हाला एखादं गाणं आठवत नसेल तर तुम्ही त्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करता किंवा जर तुम्हाला काही शब्द वापरायला आवडत असतील आणि कशाचं तरी स्पष्टीकरण देताना बाकी शब्द उपलब्द्ध असले तरी तुमच्या मते तुम्हाला आवडणारे शब्दच त्या स्पष्टीकरणात चपखल बसत आहेत असं तुम्हाला वाटतं. तज्ञांच्या मते त्याला आजार किंवा मानसिक विकृती म्हणणं योग्य ठरणार नाही.”

वेगवेगळी व्यक्तिमत्त्वं असलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात. जर एखाद्याच्या विचारांचा कल साहित्याकडे असेल तर त्यांना अगदी नेमके शब्द वापरणं आवश्यक वाटतं. हा आपल्य जगण्याचा भाग असल्यामुळे हे ठीक आहे. त्यामुळे जर यात काळजी करण्यासारखं काही असेल तर हे काळजीचं कारण का आहे हे  शोधणं गरजेचं आहे.”

नसिरुद्दीन शाह हे अलीकडेच शकून बत्राच्या ‘गेहराईयां’ या चित्रपटात दीपिका पदुकोणच्या पात्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले होते. ‘कौन बनेगा शिकरवती’ या वेब सिरीजमधूनही ते आपल्याला दिसले होते. अर्जून कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘कुत्ते’ या आगामी चित्रपटातून ते आपल्याला पुन्हा दिसतील.

 

deepika padukon im

 

केवळ ‘ओनोमॅटोमेनिया’ विषयी भीती वाटण्यासारखं काही नाही हे डॉक्टरांच्या म्हणण्यावरून आपल्या लक्षात आलं आहेच. नसिरुद्दीन शाह यांचा हा त्रास लवकरात लवकर थांबावा इतकीच प्रार्थना त्यांच्या अभिनयाचे चाहते म्हणून आपण करू शकतो. अनेक उत्तमोत्तम कलाकृतींतून ते यापुढेही आपलं मनोरंजन करत राहतील अशी आशा करूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?