' शेन वॉर्न प्रमाणे तुम्हीदेखील वजन घटवण्यासाठी डाएट करताय? थांबा या गोष्टी लक्षात ठेवा

शेन वॉर्न प्रमाणे तुम्हीदेखील वजन घटवण्यासाठी डाएट करताय? थांबा या गोष्टी लक्षात ठेवा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दिवसेंदिवस स्थूलतेची समस्या वाढत चालली आहे. चुकीची जीवनशैली, निष्काळजीपणे केलं जाणारं अन्नाचं, जंक फूडचं, गोड पदार्थांचं सेवन, सततचं बैठं काम, आळशीपणा करून स्वतःच्या फिटनेससाठी आवश्यक व्यायाम न करणं अशी वेगवेगळी कारणं या लठ्ठपणामागे असतात. पण वजन कमी करून सुदृढ होण्यापेक्षा सुदृढ दिसण्याला आपल्यातले बहुतेकजण महत्त्व देतात आणि शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानकारकच ठरतील अशी अघोरी डाएट्स सुरू करतात.

सध्या अनेक वेगवेगळी डाएट्स चर्चेत आहेत. त्यातली आपल्या शरीरासाठी योग्य डाएट्स कुठली आहेत हे तज्ज्ञांकडून समजून न घेताच अनेकजण ती फॉलो करायला सुरुवात करतात.

 

diet inmarathi

 

तज्ज्ञ व्यक्तींकडून डाएट कसं करावं हे नीट समजून घेतलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आपल्या कारकिर्दीत एक उत्कृष्ट फिरकीपटू म्हणून नावलौकिक मिळवलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉर्नचं वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी निधन झाल्याचं वृत्त इतक्यातच समोर आलंय. हृदयविकाराच्या झटक्याने शेन वॉर्नचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वेगवेगळ्या सेलिब्रिटीजकडून याविषयी शोक व्यक्त केला जातोय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

शेन वॉर्नच्या मृत्यूविषयी खूप उलटसुलट बातम्या समोर येत आहेत. काही बातम्यांनुसार शेन वॉर्न खूप दारू प्यायचा तर इतर काही बातम्यांनुसार तो ड्रग्जदेखील घ्यायचा. पण त्याचा दीर्घकाळ मॅनेजर असलेल्या जेम्स एर्स्किन याने या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलंय. त्याच्या म्हणण्यानुसार, शेन वॉर्न दारू आणि ड्रग्जला हातसुद्धा लावायचा नाही. मात्र आपलं वजन कमी करण्यासाठी शेन वॉर्न डाएट करत होता असं त्याच्या या मॅनेजरकडून समजतं. तर नुकत्याच आलेल्या माहितीनुसार त्याचं निधन नैसर्गिकरित्या झालं आहे, असं बोलले जात आहे.

 

shane warn im

 

वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असेल असं म्हणता येणार नाही. मात्र जे लोक आपलं वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करत आहेत त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.

बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी लोक खूप स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात. पण त्यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. एका ३० वर्षाच्या महिलेने डाएट करून आपलं १४१ किलो वजन कमी केलं होतं. पण त्यानंतर या महिलेची तब्येत इतकी बिघडली की तिला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. तिच्या शरीराने काम करणंच बंद केलं होतं. तुम्हीही जर वजन कमी करण्यासाठी वेट लॉस डाएट फॉलो करत असाल तर या शारीरिक समस्या उद्भवू शकतात :

 

weight gain inmarathi

 

 

१. शरीराच्या फिटनेसवर परिणाम –

काही अहवालांनुसार डाएटिंग केल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. डाएट केल्यामुळे स्नायूंची ताकद कमी होते, केस गळतात, डिहायड्रेशन होऊ शकतं, हृदयाचे ठोके मंदावू शकतात.

 

heart-attack-inmarathi

 

२. चक्कर येऊ शकते –

बऱ्याच लोकांना डाएटिंग करताना भूक लागते आणि ती भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी काही न खाणं खूप अवघड जाऊ शकतं. जर एखाद्याला भूक लागलीये आणि डाएट करायचंय म्हणून तो काही खात नसेल तर त्याला गॅसेस होऊ शकतात किंवा चक्कर येऊ शकते.

 

gastric problems inmarathi

 

३. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता –

डाएटिंग करताना लोक कमी कॅलरीजचं सेवन करतात. त्यामुळे डाएटिंग करताना काही काळाकरता त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता जाणवू शकते. कमी कॅलरीज पोटात गेल्यामुळे शरीराकरता आवश्यक असतात तेवढे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराला मिळत नाहीत.

 

vitamins inmarathi
newsnationtv.com

 

४. थकवा आणि सुस्ती –

जे लोक आधी जास्त खातात त्यांनी डाएट करायचं म्हणून कमी खायला सुरुवात केली तर शरीर आधी जसा प्रतिसाद द्यायचं तसा प्रतिसाद देत नाही. आपल्याकडच्या ऊर्जेचा भविष्यात उपयोग करता यावा म्हणून शरीर आपली ऊर्जा वाचवायला सुरूवात करतं. त्यामुळे थकवा किंवा सुस्ती येणं अगदीच कॉमन आहे.

 

lazy people inmarathi

 

५. तणाव वाढू शकतो –

काही अहवालांनुसार, जोपर्यंत शरीराला पुरेसं अन्न मिळत नाही तोपर्यंत आपल्याला थकवा जाणवू शकतो. याचा व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. ज्या महिला डाएट करतात त्यांना पिरीएड्समध्येही खूप अनियमितता दिसू शकते.

 

Stressed girl Inmarathi

 

डाएटिंग करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या :

१. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर तज्ञांच्या सल्ल्यानुसारच डाएट करा. लवकर वजन कमी करायचं असेल तर मेंटेनन्स कॅलरीज (शरीराकरता आवश्यक कॅलरीज) पेक्षा केवळ २००-३०० कॅलरीजच कमी खा. जर तुम्ही आवश्यक्तेपेक्षा कमी कॅलरीज खाल्ल्यात तर त्यामुळे शरीराचं बरंच नुकसान होऊ शकतं.

२. वेट लॉस डाएटमध्ये पुरेश्या प्रमाणात फळांचा, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. कारण त्यांतून पुरेश्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटी ऑक्सिडंट्स मिळू शकतात.

३. भात, पोळी, ब्राऊन ब्रेड, ओट्स या पिष्टमय पदार्थांचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा. कारण, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर तुमच्यात ताकद राहते.

 

meal in india
healthifyme

 

४. कमी कॅलरीजचं सेवन केल्यानंतर शरीराला विश्रांती देणंही खूप गरजेचं आहे. जर तुम्ही विश्रांती घेतली नाहीत तर दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवू शकते.

५. डाएट फॉलो करत असताना शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून पुरेसं पाणी प्यायलं जाणंही गरजेचं आहे. याच्याबरोबरीने तुमच्या डाएटमधून प्रथिनं, आरोग्यासाठी उपयुक्त असणारे फॅट्स आणि पिष्टमय पदार्थही तुमच्या पोटात गेले पाहिजेत.

६. कमी खाऊन नाही तर चांगलं अन्न खाऊन वजन कमी होतं हे कायम लक्षात ठेवा. मेन्टेनन्स कॅलरीजपेक्षा फक्त २००-३०० कॅलरीज कमी खा आणि बाकी शारीरिक कसरत वाढवा.

 

mineral water inmarathi

डाएट करण्याला कुणाचीच ना नाही. मात्र आता जेव्हा तुम्ही डाएट कराल तेव्हा वेळीच सावध व्हा आणि चुकीच्या प्रकारे डाएट करून स्वतःचंच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडवून घेऊ नका. डाएट करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं बिनमहत्त्वाचं समजू नका आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन डाएट करायला सुरुवात केल्यानंतरही त्याला पुरेश्या शारीरिक कष्टांची जोड मिळाली तरच तुमचं वजन कमी होईल हे कायम ध्यानात ठेवा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?