' बॉलिवूडच्या टुकार सिनेमांना धुडकावून ऐश्वर्याने पदार्पणासाठी साऊथचा सिनेमा निवडला – InMarathi

बॉलिवूडच्या टुकार सिनेमांना धुडकावून ऐश्वर्याने पदार्पणासाठी साऊथचा सिनेमा निवडला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळण्यासाठी कलाकार जीवाचे रान करत असतात, नुकतंच कारण जोहरने आणखीन एका स्टार कीडला बॉलीवूडमध्ये लाँच करण्याची घोषणा केली. आधीच नेपोटीझममुळे कारण जोहरला टीकेचा सामना करावा लागला होता, आता पुन्हा एका स्टार कीडमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळणं तितकं सोपे नसते हे आता सगळ्यांनाच माहिती आहे, देशातूनच नव्हे तर जगभरातून कलाकार या बॉलीवूड नामक गोष्टीच्या आकर्षणमुळे येत असतात. त्यातील मोजक्याच लोकांचे नशीब चमकते. तर अशा बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळत असताना देखील तो नाकारून साऊथ फिल्म्सचा पर्याय निवडणारी अशी एक अभिनेत्री आहे ती म्हणजे  जगतसुंदरीचा ‘किताब मिळवलेली आज बच्चन घराण्याची सून बाई असलेली ऐश्वर्य राय बच्चन.

 

abhishek aishwarya IM

 

आज कोणत्याही मॉडेल अथवा मिस इंडिया मिस वर्ल्डचा ‘किताब मिळवाऱ्या व्यक्तीला साहजिकच बॉलीवूडचे दरवाजे खुले होतात. ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा ‘किताब मिळवला आणि भारताचे नाव साऱ्या जगात पोहचवले, कायमच इतर देशांची मक्तेदारी असलेल्या या स्पर्धेत ऐश्वर्याने आपल्या अंगी असलेल्या गुणांनी आणि नैसर्गिक सौंदर्याने ही स्पर्धा जिंकली होती.

 

miss-world-aishwarya-rai inmarathi
indiatoday.in

मिस वर्ल्डसारखी स्पर्धा जिंकणं हे आज जरी आपल्याला सोपे वाटत असले तरी ३० वर्षांपूर्वी तितकस कठीण होते. आज भारताकडे बघण्याची  इतर देशांची दृष्टी बदलली असली तरी त्याकाळी वेगळ्या दृष्टीने बघितले जात होते. ऐश्वर्याने ही स्पर्धा जिंकली आणि तिच्याकडे बॉलीवूड निर्मात्यांची रांग लागली.

 

aishwarya rai jodha akbar inmarathi

फेमिना या मासिकासाठी दिलेल्या मुलाखतीत तिने हे स्पष्ट केले की, धर्मेश दर्शन यांनी राजा हिंदुस्थानी सिनेमासाठी सर्वप्रथम माझी निवड केली होती तसेच या सिनेमाची कथा आणि हिरोच्या बाबतीत माहिती दिली होती. तसेच यश चोप्रा यांना मला घेऊन दिल तो पागल हैं हा सिनेमा बनवायचा होता, मात्र मी या दोघांना नकार दिला होता.

या दोन बड्या निर्मात्यांच्या ऑफर नाकारून तिने मणी रत्नम यांचा इरुवर या सिनेमाला होकार दिला. मणी रत्नम हे साऊथच्या दिग्दर्शकांमध्ये हे मोठं नाव आहे. बॉम्बे, रोजा सारखे सिनेमे बनवून मणी रत्नम यांनी हिंदी प्रेक्षकांची मने जिंकली होती. ऐश्वर्याने होकार दिलेल्या इरुवर चांगलाच हिट झाला. केवळ बॉक्स ऑफिसवर नव्हे तर समीक्षकांनी देखील सिनेमाचे कौतुक केले होते.

 

iruvar film

 

सिनेमात ऐश्वर्याच्या बरोबरीने तब्बू, प्रकाश राज आणि मोहनलालसारखी मातब्बर मंडळी असल्याने सिनेमा एक वेगळ्या उंचीवर दिग्दर्शकाने नेऊन ठेवला होता. गुरुनंतर आता पुन्हा एकदा मणी रत्नम आणि ऐश्वर्या ही जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसर येणार आहे.

पोनियन सेल्वन नावाचा ऐतिहासिक सिनेमा ते आपल्या भेटीस घेऊन येत आहेत, नुकतंच या सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आहे. हा सिनेमा खरं तर २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता मात्र कोरोनामुळे या सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलले होते. आज तब्बल २ वर्षांनी तो रिलीज होतोय, बरेच वर्षांनी ही जोडी दिसत असल्याने प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?