' एक्सपायर झालेली औषधं का घेऊ नयेत असा प्रश्न पडत असेल तर हे वाचाच! – InMarathi

एक्सपायर झालेली औषधं का घेऊ नयेत असा प्रश्न पडत असेल तर हे वाचाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका: मृदुला बेळे

औषधं expire झाली अर्थात त्यांची मुदत संपली की आपण त्याचा वापर टाळतो आणि हे प्रत्येक सामान्य माणूस करतो बरं का! औषधं expire झाली की ती वापरण्यालायक राहत नाहीत, ती खराब होतात, असा आपलं एकंदर समज! पण खरंच असं असतं का हो?

औषधं  म्हणजे थोडी ना एखाद फळ आहे नासायला किंवा खराब व्हायला. चला तर जाणून घेऊया या मागचं खरं सत्य!

 

medicine InMarathi

 

औषध expire होतं म्हणजे नक्की काय होतं हेच लोकाना माहित नसतं. औषध expire झालं म्हणजे त्यात विष तयार झालं यासारखे असे अनेक समज आहेत लोकांचे.

तर औषध expire होतं म्हणजे त्याच्या लेबल वर त्याची जी स्ट्रेंग्थ लिहिलेली असते, (उदा. क्रोसिन वर लिहिलेले असते each tablet contains paracetamol 500 mg, तर 500 mg ही झाली या औषधाची strength) ती ज्या दिवशी १०% ने कमी होते ती झाली त्या औषधाची expiry date!

 

MEDICATION_EXPIRY InMarathi

 

मुळात expiry date साठी वापरला जाणारे जे शास्त्रीय नाव आहे ते आहे t-90%. यातला t म्हणजे Time…वेळ.

औषध जेव्हा 90% उरते (म्हणजेच १०% ने कमी होते) तो वेळ म्हणजेच expiry date. आता यावरूनच लक्षात येईल की बहुतेक वेळेला expiry date उजाडते तेव्हा त्यावर दिलेल्या dose पेक्षा औषधाची मात्रा कमी झालेली असते. त्यामुळे त्याचा परिणाम थोडा फार कमी होतो, तो शून्य होतो असे अजिबात नव्हे.

वर दिलेल्या उदाहरणात १०% म्हणजे 500 पैकी 50 mg paracetamol कमी झाले तरी ४५० mg शिल्लक असतेच, आणि त्याचा परिणाम दिसून येतोच, पण तरीही expiry date नंतर औषधे शक्यतो घेऊ नयेत. त्याचे कारण असे- वरच्या उदाहरणात मी लिहिलंय की औषधाची strength १०% कमी होते.

 

medicine 1 InMarathi

 

पण म्हणजे नक्की काय होतं?

तर औषध हे शेवटी एक chemical आहे आणि काळानुसार ते हळू हळू chemical reactions मुळे degrade होते. हवेतील oxygen मुळे oxidation होऊन किंवा हायड्रोजनमुळे reduction होऊन किंवा सूर्यप्रकाशामुळे किंवा इतर असंख्य chemical reactions मुळे हे औषध degrade होते आणि जसजसा वेळ जाईल तसतसे ते degrade होऊन त्याचे इतर पदार्थात रुपांतर होते.

 

medicien-expiry-marathipizza02
violenceanddevelopment.org

एका औषधाचे वेगवेगळ्या मार्गाने degradation होऊ शकते आणि त्यामुळे एकाच वेळी त्याची वेगवेगळी reaction products बनू शकतात. ही reaction products निरुपद्रवी असतील तर त्याचा परिणाम इतकाच होतो कि औषधाची strength कमी होते. पण कधी कधी मात्र ही reaction products अपायकारक असूही शकतात.

अर्थात प्रत्येक औषधाचा अश्या प्रकारचा forced degradation study औषध कंपनीत केलेला असतोच आणि expiry date पर्यंत त्यात काहीही अपायकारक reaction product बनत नाही ना हे तिथे पहिलेच जाते, पण expiry date नंतरचा असा अभ्यास मात्र कंपनीने केलेला नसतो.

समजा औषधावर लिहिलेली expiry date २ वर्षे आहे.

 

medicine 2 InMarathi

 

तर मग जो अभ्यास केला जातो तो या दोन वर्षांचाच असतो. पण समजा हे औषध दोन तीन वेगवेगळ्या degradation pathways ने degrade होते आहे, ज्यातला एक pathway अत्यंत संथ आहे, त्याचे reaction product ४ वर्षानंतर बनतेय आणि ते अपायकारक आहे.

आणि असे औषध जर कुणी expiry date नंतर घेतले तर अपाय होऊ शकतो.

 

medicien-expiry-marathipizza03
sciencenewsforstudents.org

भारतासारख्या देशात जिथे अशिक्षित रुग्णांचे प्रमाण प्रचंड आहे तिथे ही गोष्ट लोकांना समजावून सांगणे कठीण आहे. शिवाय कुठले औषध expiry नंतर घेतले तर चालेल आणि कुठले नाही हे सांगणे ही कठीण आहे.

कारण हजारो औषधे बाजारात आहेत. आणि म्हणूनच expiry date नंतर औषधे न घेणेच उत्तम!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?