' स्वार्थ बाजूला ठेवून सिनेमाच्या प्रेमाखातर बच्चन यांनी झुंड साठी ही गोष्ट केली! – InMarathi

स्वार्थ बाजूला ठेवून सिनेमाच्या प्रेमाखातर बच्चन यांनी झुंड साठी ही गोष्ट केली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बहुचर्चित ‘झुंड’ या चित्रपटाचा ट्रेलर गेल्या काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालाय. ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले या महापुरुषांच्या प्रतिमा आणि त्यांच्यासोबत दिसणारे बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन पाहून सिनेप्रेमींच्या चर्चांना उधाण आलं होतं.

 

 

“मेन स्ट्रीम बॉलिवूडमध्ये नागराजच अशी क्रांती करू शकतो.” अशा आशयाचे ट्विट्स काही नेटकऱ्यांनी केले होते. नागराज मंजुळेंचा हा पहिलावहिला आणि तोही साक्षात बिग बिंगसोबतचा हिंदी सिनेमा आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयी चांगलीच उत्कंठा आहे. नागराज मंजुळे यांनी आतापर्यंत दिलेल्या एका पेक्षा एक सरस चित्रपटांमुळे रसिकांच्या मनात त्यांचं एक वेगळं स्थान निश्चितच निर्माण झालंय.

 

jhund im 1

 

‘झुंड’ या चित्रपटाच्या ट्रेलरने पुन्हा एकदा नागराजची हीदेखील कलाकृती उत्तमच असेल अशा आशा आपल्या मनात पल्लवित केल्या आहेत. या चित्रपटात बिग बींच्या सोबत आपले अनेक लाडके कलाकार दिसणार आहेत.

बिग बी या चित्रपटात फुटबॉल कोचची भूमिका साकारताना दिसतील. ‘स्लम सॉकर’ या एनजीओचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे. भरकटलेल्या मुलांना वळणावर आणताना बिग बींच्या पात्राला घ्यावी लागणारी मेहनत आणि या मुलांना फुटबॉलचं रीतसर प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय स्तरावर त्यांच्याकडून चांगली कामगिरी व्हावी असा या पात्राचा मानस आपल्याला या चित्रपटातून दिसतोय. पण या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सिनेमाच्या प्रेमाखातर बिग बींनी अशी एक गोष्ट केलीय जी कळल्यावर बिग बींविषयी आपल्याला वाटणारा आदर द्विगुणित होईल.

 

vijay im 1

 

चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी एका मुलाखतीत सांगितलं की विजय बरसे यांच्या भूमिकेसाठी त्यांना फक्त अमिताभ बच्चन यांनाच घ्यायचं होतं कारण तेच ही भूमिका उत्तम साकारतील असा त्यांना विश्वास होता. अमिताभ बच्चन हे स्वतः फुटबॉलचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांना ‘झुंड’ या चित्रपटाची संहिता फार आवडली. हा चित्रपट बनत असताना अनेक अडचणी आल्या.

 

jhund 2 IM

२०१८ साली दिग्दर्शक नागराज मंजूळे यांनी पुण्यात एक सेट उभारला होता पण पुरेश्या पैशांअभावी तो सेट हटवावा लागला. त्यानंतर वर्षभर चित्रपट अडकून राहिला होता. चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी सांगितलं की बिग बींना चित्रपटाबद्दल पूर्ण विश्वास होता. चित्रपट अडचणीत आला तेव्हा बिग बींनी आपण केवढे मोठे सुपरस्टार आहोत असा विचार न करता चित्रपटाच्या दृष्टीने काय करणं फायद्याचं आहे असा व्यापक दृष्टिकोन ठेवत स्वतःहूनच आपलं मानधन कमी केलं. बिग बींची ही कृती पाहून बाकी कर्मचाऱ्यांनीही आपापलं मानधन कमी केलं.

 

nagraj manjule 3 IM

 

चित्रपटाचं बजेट कमी आहे याची जाणीव बिग बींना होती. “अमिताभ म्हणाले की माझ्यावर खर्च करण्यापेक्षा सिनेमावर खर्च करा.”, अशी माहिती निर्माते संदीप सिंह यांनी दिली. बच्चनजींच्या असंख्य चाहत्यांना त्यांची ही कृती पाहून नक्कीच सुखद धक्का बसेल.

आपण केलेल्या कामाचं मानधन चोख वसूल करणारे अनेक सुपरस्टार्स असतात. सुपरस्टार्स म्हटले की त्यांच्या नखऱ्यांचे, टँट्रम्सचे अनेक किस्से आपण ऐकलेले असतात. अमिताभ बच्चन मात्र आपल्याबाबतीत नेहमीच हे सगळे समज सपशेल खोटं ठरवत आले आहेत. आजवर रसिकांचं इतकं उदंड प्रेम मिळालेल्या या महानायकाने यशाच्या इतक्या पायऱ्या चढल्यावरही माणसाला इतक्या नि:स्वार्थीपणे विचार करता येऊ शकतो हेच आपल्या उदाहरणातून सिद्ध केलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?