' ‘बॉम्ब काळ बनून आला आणि…’ नविन शेखराप्पाची ही अखेरची झुंज थरकाप उडवणारी आहे – InMarathi

‘बॉम्ब काळ बनून आला आणि…’ नविन शेखराप्पाची ही अखेरची झुंज थरकाप उडवणारी आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रशिया-युक्रेन युद्धाच्या धगधगत्या आगीत आज संपुर्ण जग होरपळून निघतंय. युद्ध थांबवा, शांततापुर्ण मार्गाने चर्चा करा अशी आळवणी केली जात असली तरी इरेला पेटलेली रशिया आणि त्यांचे हल्ले परतवण्यासाठी सज्ज असलेला युक्रेन देश यांच्यातील विस्तव काही विझताना दिसत नाही.

 

war im

 

एकीकडे अंतरराष्ट्रीय स्तरावर याचे पडसाद उमटत असताना दुसरीकडे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या पालकांना रोजचा दिवस जगणे मुश्किल झाले आहे. युद्धाच्या खाईत अडकलेल्या भारतीय लेकरांच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या अशाच एका घरात मंगळवारी एक बातमी काळ बनून आली आणि केवळ कर्नाटकातील त्या घरातच नव्हे तर संपुर्ण देशाला हादरवून गेली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

कर्नाटकातील नविन शेखरप्पा हा विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पहात चार वर्षांपुर्वी युक्रेनला गेला तेव्हा असे काही अघटीत घडेल याची कुणी कल्पनाही केली नसावी.

 

navin im

 

तीन वर्ष मन लावून अभ्यास करणारा नवीन यंदा अखेरची परिक्षा देऊन डॉक्टर होणार होता, मात्र त्याचं हे स्वप्न पूर्ण होणं नियतीला मान्य नव्हतं.

बॉम्ब काळ बनून आला आणि…?

युक्रेनमधील खारकिव्हमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यातील बहुतांश सगळेजण हे एमबीबीएसचे विद्यार्थी आहेत. युक्रेनमध्ये जसे युद्धाचे रणशिंग फुंकले गेले. तेव्हापासून हे विद्यार्थी एकत्र आले. मिळेल त्या शेल्टरमध्ये आसरा शोधू लागले.

काहींनी हॉस्टेलमध्येच मुक्काम हलवला तर काहींनी शाळा-महाविद्यालय, रेफ्युजी कॅम्प्समध्ये बस्तान हलवले. सुरवातीचे काही दिवस भितीच्या छायेत घालवले, मात्र जसजसे युद्धाचे ढग गडद होऊ लागले तशी विद्यार्थ्यांची भिती वाढत गेली. अनिश्चितता, भिती, घोंगावणारे युद्ध, कुटुंबाचा विरह या कठीण परस्थितीत आजही अनेक विद्यार्थी रहात आहेत.

 

students im

 

अशातच खारकिव्हमध्ये राहणाऱ्या नविनजवळील खाद्यपदार्थ संपले होते. परतीचा मार्ग नेमका कधी सापडेल याची शाश्वती नव्हती. आसपासच्या सर्व विद्यार्थ्यांचीही तिच परिस्थिती असल्याने अखेरिस नाईलाज म्हणून नविन घराबाहेर पडला.

खाद्यपदार्थ घेऊ तातडीने परतायचे असे म्हणत तो दुकानाजवळ पोहोचला मात्र त्याचवेळी रशियन सैन्याने केलेल्या बॉम्बहल्ल्यात त्याने जीव गमावला.

नविन परतला नसल्याने त्यांच्या मित्रमैत्रिणींनी तक्रार केली आणि अखेरिस बॉम्बहल्ल्याच्या ठिकाणी त्याचा मोबाईल सापडल्याने ही बाब उघडकीस आली. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय दुतावासाला याबाबतची माहिती दिली गेली आणि त्यानंतर नविनची ओळख पटली.

सध्या त्याचा मृतदेह शवागरास पाठवण्यात आला असल्याची माहिती भारतीय दुतावासातर्फे देण्यात आली आहे.

 

navin s im

 

कर्नाटक येथे राहणाऱ्या शेखराप्पा कुटुंबियात सध्या काय परिस्थिती निर्माण झाली असेल याची कल्पनाही करणे कठीण! भारतीय दुतावासातर्फे या कुटुंबाशी संपर्क साधला जात असून नविनचे शव भारतात नक्की आणता येईल का? याबाबत अद्याप कोणताही खुलासा केला गेलेला नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?