' देशाला ‘कच्चा बदाम’वर थिरकवणाऱ्या गायकाची कशामुळे झालीये बिकट अवस्था? – InMarathi

देशाला ‘कच्चा बदाम’वर थिरकवणाऱ्या गायकाची कशामुळे झालीये बिकट अवस्था?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सर्वसामान्यांतला एक असलेला एक छुपा कलाकार भुईमूग विकायचे म्हणून एक गाणं तयार करतो काय आणि ‘कच्चा बदाम’ असे साधे शब्द असलेलं हे गाणं आपल्या हटके चालीमुळे आणि आवाजमुळे बघताबघता सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

सुरुवातीला बऱ्याच जणांना या गाण्याचा मूळ कलाकार कोण आहे? तो काय करतो? हे माहीत नव्हतं. पण गाणं जसं हिट झालं तसं ‘कच्चा बदाम’चे गायक भुबन बड्याकर चर्चेत आले आणि लोकांना हा भुईमूग विकणारा एक सामान्य माणूस आहे हे कळलं. हे गाणं इतकं गाजण्यापूर्वी आपलं नशीब आता पालटणार आहे याची खुद्द भुबन यांनाही कल्पना नसेल.

 

kaccha badam im

 

पश्चिम बंगालच्या या साध्या भुईमूग विक्रेत्याला आता अगदी टीव्हीवरच्या अनेक कार्यक्रमांमध्येही बोलावलं जातंय. हल्ली झटकन एखादी गोष्ट ट्रेंड होते आणि पटकन लोकांचा त्यातला रस संपून जातो. जुनी गोष्ट मागे पडून लगेच नवी गोष्ट ट्रेंड होण्याच्या आजच्या जमान्यात ‘कच्चा बदाम’ची इतकी हवा झालीये की इतके दिवस होऊनही अजूनही इन्स्टाग्रामवर ‘कच्चा बदाम’चे रिल्स थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.

 

kaccha badam im2

 

पण  भुबन बड्याकर यांच्या संदर्भात नुकतीच एक दुःखद बातमी समोर आली आहे.

संपूर्ण देशाला ‘कच्चा बदाम’वर थिरकवणाऱ्या या गायकाला गेल्या सोमवारी रात्री दुखापत झाली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं.

असं समजतंय की, भुबन यांनी इतक्यातच एक सेकंड हॅन्ड गाडी विकत घेतली होती. गेल्या सोमवारी जेव्हा ते काही लोकांच्या मार्गदर्शनाखाली ही सेकंड हॅन्ड गाडी चालवायला शिकत होते त्यावेळी ही दुर्घटना घडली.

त्यांच्या छातीला आणि शरीराच्या इतरही काही भागांना जखम झाली आणि त्यामुळे त्यांना पश्चिम बंगालच्या बीरभूममधील ‘सुपर स्पेशालिस्ट’ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

 

kachhaa badam im

 

पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील कुरालजुरी या गावात राहणाऱ्या भुबन यांचा पत्नी, २ मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.

इतकी लोकप्रियता मिळण्यापूर्वी भुबन हे भुईमूग विकून त्यावर आपली आणि कुटुंबाची गुजराण करायचे. त्यावेळीच त्यांनी ग्राहकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी ‘कच्चा बदाम’ हे गाणं तयार केलं आणि आपणच तयार केलेल्या चालीत आपल्या अनोख्या ढंगात ते गायला सुरुवात केली. कुणीतरी त्यांचं हे गाणं रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकलं आणि त्यानंतर ते तुफान व्हायरल झालं.

त्यांच्या गाण्याला इतकी अमाप प्रसिद्धी मिळाल्यावर आता ते पूर्वीसारखे गरीब राहिलेले नाहीत. त्यांच्यापाशी आता लाखो रुपये आहेत. त्यांनी इतक्यातच एक बंगाली गाणं रेकॉर्ड केलं ज्यासाठी त्यांना एका म्युझिक कंपनीतर्फे लाखो रुपये देण्यात आले.

इतकंच नाही तर, पश्चिम बंगालच्या पोलिसांकडून त्यांचा सन्मानही केला गेला. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या धर्तीवर ते वेगवेगळ्या पार्ट्यांकडून प्रचारही करताना दिसले.

 

singer im

‘आजतक’ शी बोलताना भुबन म्हणाले होते की,सरकारने आपल्याला मदत करावी अशी त्यांची इच्छा आहे जेणेकरून ते आपली कायमची राहण्याची सोय करू शकतील, कुटुंबियांसाठी चांगल्या प्रतीच्या कपड्यांची आणि अन्नाची व्यवस्था करू शकतील. लोक भुबन यांच्यासोबत सेल्फीही घेऊ लागलेत. भुबन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आता त्यांनी भुईमूग विकणं बंद केलंय कारण आता ते सेलिब्रिटी झालेत.

भुबन बड्याकर यांची तब्येत लवकरात लवकर सुधारून ते पाहिल्यासारखे ठणठणीत बरे होऊदेत आणि आणखी नवनव्या गाण्यांची निर्मिती करून लोकांचं याहीपुढे मनोरंजन करत राहुदेत हीच प्रार्थना!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?