' बॉसच्या मुलीच्या प्रेमात पडले परेश रावल; म्हणाले, ‘हीच होणार माझी पत्नी’! – InMarathi

बॉसच्या मुलीच्या प्रेमात पडले परेश रावल; म्हणाले, ‘हीच होणार माझी पत्नी’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गोलमाल सिनेमा आठवतोय का? अजय देवगणचा नव्हे तर जुना गोलमाल, ज्यात अमोल पालेकर उत्पल दत्त सारख्या दिग्गज मंडळींनी उगाच ओढून ताणून विनोद निर्मिती न करता, रोजच्या जगण्यातल्या घडमोडींवर विनोद निर्मिती केली आहे.

या सिनेमात अमोल पालेकर आपल्या बॉसच्या मुलीच्या प्रेमात पडतात, गाणं शिकवण्याच्या बहाण्याने बॉसच्या मुलीशी ओळख होते आणि पुढे या दोघांचे सूर जुळलेले दाखवले आहेत. हा सिनेमा आजही क्लासिक कॉमेडीमध्ये गणला जातो. या सिनेमात जसे अमोल पालेकर बॉसच्या मुलीच्या प्रेमात पडतात वास्तवात अशीच घटना एका कलाकाराच्या बाबतीत घडली आहे, कोण आहे नेमका तो कलाकार जाणून घेऊयात..

 

amol p im

 

खलनायक, चरित्र भूमिका, विनोदी भूमिका अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकणारे अभिनेते म्हणजे परेश रावल, सिनेमात फारसे रोमँटिक सीन्स, प्रेमकथा त्यांच्या वाट्याला आली नाही मात्र खऱ्या आयुष्यातील त्यांची प्रेमकथा एखाद्या सिनेमाच्या कथेसारखी आहे.

 

मूळचे मुंबईकर असलेले परेश रावल, कॉलेज जीवनातच थिएटर नामक प्रकाराशी जोडले गेले आणि त्यांना तिथेच अभिनयाची गोडी लागली. थिएटर करता असताना साहजिकच इतर कलाकारांचे नाटक बघणे हा एक प्रकारचा अभ्यास असतोच, असच एकदा परेश रावल आणि त्यांचा एका मित्र एक नाटक बघण्यासाठी गेले होते.

 

paresh in sir inmarathi

 

नाटक त्यांनी कितपत बघितले कुणास ठाऊक मात्र त्यांची नजर पडली ती एका मुलीवर, बघताक्षणिक परेशजी त्या मुलीच्या प्रेमात पडले. सोबत असलेल्या मित्राला देखील त्यांनी सांगितले की लग्न करेन तर याच मुलीशी. परेशजींच्या या वाक्याने मित्र देखील चक्रवला आणि त्याने लगेच परेशजींना सांगितले की ती मुलगी तू ज्या कंपनीत काम करतो आहेसत्या कंपनीच्या मालकीची मुलगी आहे.

हे एवढं ऐकून देखील परेशजी थांबले नाहीत आपल्या निर्णयावर ठाम होते. ते रिलेशनीप वगरे च्या भानगडीत न पडता थेट लग्नसाठी मागणी घालणार होते. नाटकाच्या दरम्यान दिसलेली तो मुलगी इतकी मनात बसली होती की कधी एकदा त्या मुलीला जाऊन मागणी घालतो अशी इच्छा परेशजींच्या मनात होती.

 

paresh r im 1

आपल्याकडे जस म्हणतात की जोड्या स्वर्गात बनल्या जातात, झालं असं की परेशजी एका नाटकात काम करत होते. त्या नाटकाच्या प्रयोगाला ती मुलगी देखील होती.  मात्र गमंत अशी झाली की त्या नाटकात खूप साऱ्या शिव्या होत्या, नाटकाला आलेल्या अनेक मुली नाटक अर्धवट सोडून जात होत्या, मात्र ती मुलगी शेवटपर्यंत थांबली होती.

अखेर नाटक संपलं आणि ती मुलगी परेशजींना जाऊन भेटली आणि त्यांच्या अभिनयाची प्रशंसा केली. परेशजी त्या मुलीशी बोलण्यासाठी संधी शोधातच होते, आणि अखेर ती संधी समोरून चालू आल्याने त्यांच्या आनंदनाला पारावर उरला नाही. तिच्याशी बोलता बोलता थेट मुद्याला हात घालत त्यांनी एका झटक्यात आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाकली.

अभिनयाची प्रशंसा करता करता अचानक लग्नाची मागणी आल्याने ती मुलगी जरा गोंधळली, परेशजी मात्र तिला पुढे सांगतच होते की आधी एकमेकांना वेळ देऊ, ओळखूयात असं अजिबात नको, लोक आयुष्यभर एकमेकांना ओळखत नाही. आधीच लग्नाचे प्रपोजल त्यात असे बोलून परिस्थिती गोंधळाची झाल्याने त्या मुलीने शेवटी संध्याकापर्यंत कळवते अशी विनंती केली.

परेशजी उतावळे जरी झाले असले तरी ते आपल्या मतावर ठाम होते हो तर हो नाही तर नाही, अखेर त्या मुलीने दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी परेशजींना होकार दिला. प्रेमाची कबुली दोघांकडून जरी आली असली तरी लग्न मात्र त्यांचे १२ वर्षानंतर झाले आज त्यांना दोन मुले आहेत.

 

paresh r im

 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे परेशजींना ज्या मुलीशी लग्न केले ती मुलगी १९७९ साली मिस इंडियाचा ‘किताब जिंकली होती तीच नाव आहे स्वरूपा संपत. खलनायक रंगवलेल्या परेशजींच्या आयुष्यात ही सुंदरी आली आणि त्यांच्या करियरमध्ये चांगलीच भरभराट आली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?