समस्त पुरुष वर्गाचा कलेजा खल्लास करणाऱ्या वंडर वूमनबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सध्या संपूर्ण जगात वंडर वूमन या एकाच चित्रपटाची चर्चा आहे. या चर्चेचे मुख्य कारण म्हणजे वंडर वूमनचं पात्र जी साकारतेय ती प्रसिद्ध इस्राईली मॉडेल आणि अभिनेत्री गल गॅडोट! तिच्या फास्ट अँड फ्युरीयस चित्रपटांच्या मालिकेतील अभिनयाने ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. जगभरातील पुरुषवर्ग तिच्या सौंदर्याने घायाळ झाला आहे. त्यात तुम्हीही असाल यात शंका नाही, चला तर जाणून घेऊया या सौंदर्यवती वंडर वूमनबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!

gal-gadot-marathipizza01
themarysue.com

सर्वप्रथम अगदी संक्षिप्त स्वरुपात तिची वैयक्तिक माहिती जाणून घेऊया:

जन्म दिनांक : ३० एप्रिल १९८५

जन्म ठिकाण : रोष हायीन, इस्राईल

उंची : ५ फुट आणि १० इंच

वजन : ५८ किलो

पतीचे नाव : यार्सोन वर्सानो (हे ऐकून बऱ्याच जणांच्या हृदयावर आघात झाला असेल.)

राष्ट्रीयत्व: इस्राईली

रास: वृषभ

कमाई: १० मिलियन डॉलर

 

आता जाणून घेऊया या वंडर वूमनबद्दल वंडर गोष्टी!

१. मिस इस्राईल

ती वयाच्या १९ व्या वर्षीच मिस इस्राईल झाली आणि २००४ मध्ये तिने मिस युनिव्हर्स मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते. जागतिक पातळीवरच्या जाहिरातीसाठी तिने Quito Ecuder मध्ये प्रवेश घेतला, परंतु ती शेवटच्या १५ मध्ये स्थान मिळवू शकली नाही. या स्पर्धेत तिने जिंकण्यासाठी नाही तर अनुभव मिळवण्यासाठी भाग घेतला होता.

 

२. जगातील ५ वी सर्वात हुशार, बुद्धिमान आणि सुंदर ज्युईश स्त्री

२०१२ मध्ये पहिल्या ५० हुशार, बुद्धिमान आणि सुंदर ज्युईश महिलांमध्ये तिचा ५ वा क्रमांक होता. अभिनेत्री बनण्यात तिला कधीही रस नव्हता. २००४ मध्ये मिस इस्राईल झाल्या नंतर तिने विद्यापीठामध्ये कायदा, आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था आणि सबंध या  विषयाचे शिक्षण घेण्यासठी प्रवेश घेतला होता आणि ते शिक्षण तिने पूर्ण देखील केले.

gal-gadot-marathipizza02
digitalspy.com

 

३. जगातील दुसरी सर्वात जास्त कमाई करणारी इस्राईली मॉडेल

ती सध्या दुसरी जगातील सर्वात जास्त मानधन घेणारी इस्राईली मॉडेल आहे. जगातील सर्वात जास्त श्रीमंत मॉडेल आहे- सुपरमॉडेल बार रेफेईली! २०१३ मध्ये गल  गॅडोटला दुसरी सर्वात जास्त पैसे घेणारी इस्राईली अभिनेत्री म्हणून जाहीर करण्यात आले. गल गॅडोट ही Gucci, bamboo परफ्युम यासह इतर अनेक मोठ्या मोठ्या ब्रँडचा चेहरा आहे.

 

४. तिचे लग्न झाले असून तिला २ मुली आहेत

गल गॅडोट ही ३२ वर्षाची आहे. २००८ मध्ये रीयल इस्टेट बिल्डर यार्सोन वर्सानो याच्याशी तिने लग्न केले. तिला दोन मुली आहेत एक अल्मा आणि दुसरी माया. ती कुटुंबासमवेत लंडनला राहते.

gal-gadot-marathipizza03
popsugar.com

५. ती पहिली अशी वंडर वूमन आहे जी अमेरिकन नाही

प्रत्येक वेळी एखादी अमेरिकन अभिनेत्रीच वंडर वूमनचा रोल करत असे, परंतु यावेळी एका इस्राईली अभिनेत्रीवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. बहुतेक लोकांना ही नवीन वंडर वूमन कोण आहे हे मुळात ठाऊकच नाही आहे, त्यामुळे ती या अभिनयासाठी खूपच उत्तम निवड असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ती त्यांच्यातीलच एक वाटते. तिने वंडर वूमन म्हणून ३ चित्रपटाचा करार केला आहे.

 

६. ती इस्राईलच्या सैन्यात होती

ती इस्राईलच्या सैन्यात २ वर्ष कार्यरत होती. याबद्दल सांगताना तिला खूप अभिमान वाटतो, कारण सैन्यात असताना तिला प्रशिक्षणा दरम्यान वेगवेगळ्या हत्यारांची माहिती मिळाली आणि  फास्ट अँड फ्युरीअस चित्रपटामध्ये काम करत असताना तिला त्या प्रशिक्षणाचा खूप उपयोग झाला.

gal-gadot-marathipizza04
standbyformindcontrol.com

 

७. चित्रपटासाठी डेडीकेशन

वंडर वूमन डीयाना अकाच्या शेपमध्ये येण्यासाठी गल गॅडोटने ६ महिने, दिवसातून सहा तास प्रशिक्षण घेतले. ती दिवसातून २ तास व्यायाम, २ तास लढण्याचे कौशल्य आणि २ तास घोड्यावर स्वार होणे शिकत असे, तिच्या मते घोड्यावर स्वार होणे सर्वात कठीण काम आहे.

 

८. तिची जेम्स बॉंडच्या चित्रपटात काम करण्याची संधी हुकली

शिक्षण पूर्ण केल्यावर तिने जेम्स बाँडच्या आगामी चित्रपटात रोल मिळण्यासाठी ऑडीशन दिली होती. नंतर तिने Quantum Of Solace या चित्रपटासाठी कॅमिल्ले मोन्तेसच्या रोलसाठी ऑडीशन दिले. तेव्हा तेथील कास्टिंग एजंटला वाटले की ही मुलगी फास्ट अँड फ्युरीयससाठी योग्य आहे आणि म्हणून त्याने तिला बॉंडच्या चित्रपटात न घेता फास्ट अँड फ्युरीयससाठी फायनल केले.

gal-gadot-marathipizza06
popsugar.com

 

९. स्टंट वूमन

गल गॅडोट हिला अॅक्शनची खूप आवड आहे. फास्ट अँड फ्युरीअस चित्रपटाच्या ५ व्या आणि ६ व्या चित्रपटातील तिचे स्टंटस तिने स्वतः केले आहेत.

 

१०. मोटारसायकल रायडर

गल गॅडोट हिने २००६ मध्ये काळ्या रंगाची डूकाटी मॉनस्टर-S2Rand मोटर साइकल खरेदी केली, तिचा उपयोग गल प्रत्येकवेळी आणि प्रत्येक ठिकाणी करते.

gal-gadot-marathipizza05
comicvine.gamespot.com

गल गॅडोटने आपल्या वंडर वूमनसाठी भरपूर मेहनत घेतली आहे, तर संधी मिळाली तर तिचा हा चित्रपट नक्की पहा!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?