' सिद्धांतने अभिनयाच्या प्रेमापोटी खऱ्या आयुष्यातल्या 'प्रेमाला' दिली होती सोडचिट्ठी

सिद्धांतने अभिनयाच्या प्रेमापोटी खऱ्या आयुष्यातल्या ‘प्रेमाला’ दिली होती सोडचिट्ठी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूड हे एक असं विश्व आहे जिथे हजारो लोक रोज ॲक्टर व्हायचं स्वप्नं घेऊन येतात. नुकताच ‘ गेहराईयां ‘ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी हा देखील त्याच हजारोंमधला एक. या चित्रपटामुळे त्याचे खूप कौतुक झाले आणि प्रेक्षकांच्या मनात त्याने वेगळी जागा निर्माण केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अनेक लोक असेच आले आणि त्यांनी आपली अशी एक वेगळी ओळख निर्माण केली त्यातलं असच एक उदाहरण म्हणजे शाहरूख खान. काहींची स्वप्नं पूर्ण होतात आणि काहींना आपल्या वेगळ्या वाटा निवडाव्या लागतात.

 

gehraiyan IM

 

 

इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी सिद्धांत CA चा अभ्यास करत होता. आता तो आपल्याला अनेक चित्रपटांमधून आपली छाप पाडताना दिसत आहे. मात्र आता सिद्धांत हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सिद्धांत याला आपले वैयक्तिक जीवन मीडिया समोर आणायला आवडत नाही परंतु एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर खुलासा केला आहे.

प्रत्येक अभिनेत्याच्या यशामागे एक संघर्ष असतो. सिद्धांतचा प्रवास देखील काही सोपा नव्हता, बॉलिवूडमध्ये पाऊल टाकण्यापूर्वी तो उत्तर प्रदेशमधील बलियामध्ये राहत होता आणि एक वर्ष त्याने पूर्णपणे घरात बसून काढले मात्र त्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसून देत नव्हते.

 

siddhant chatirwedi inmarathi

सिद्धांतची इच्छाशक्ती आणि त्याची जिद्द अफाट होती. त्याने २०१६ साली त्याच्या करिअरची सुरुवात ‘लाईफ सही है’ या युट्यूब सिरीज ने केली. सिरीजला भरपूर यश मिळून त्याला त्याचा दुसरा भाग देखील ऑफर झाला पण त्याला बॉलीवूड हिरो बनायचे होते त्यामुळे त्याने या सिरीजचा दुसरा भाग केला नाही.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तो CA चा अभ्यास करत होता पण तो ही त्याने सोडून दिला आणि ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. तब्बल पाच वर्ष ऑडिशन्स देऊन त्याला ‘इन्साइड एज’ या वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सिरिजने प्रचंड यश मिळवलं आणि त्याच्या सक्सेस पार्टीमध्ये सिद्धांत ने मनसोक्त डान्स केला तेव्हा जोया अख्तरची नजर त्याच्यावर पडली.

 

inside edge inmarathi

 

जोयाने त्याच्यातलं टॅलेंट ओळखून त्याला ‘गली बॉय’ च्या ऑडिशनसाठी बोलावले. उसका टाईम आगया आणि अर्थातच ऑडिशनमध्ये तो सिलेक्ट झाला आणि त्याने ‘गली बॉय’ या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांवर आपली छाप पाडण्यात यश मिळवले.

एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने त्याच्या आधीच्या प्रेमकहाणी बद्दल दिलखुलासपणे सांगितले. तो चार वर्ष एका रिलेशनशिपमध्ये होता. तो म्हणाला, “मला २०व्या वर्षीच माहीत होते की मला आयुष्यात काय करायचे आहे” पण त्याच्या प्रेयसी ला एक साधं सोपं जीवन हवं होतं त्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं.

सिद्धांतला करिअर बदलायचे असल्यामुळे त्याने CA चा अभ्यास सोडला हे त्याच्या प्रेयसीला आवडले नाही. शेवटी सिद्धांतला काहीतरी एक निवडावेच लागले आणि त्याने अर्थातच आपल्या करिअरला प्राधान्य दिले.

 

siddhant gully boy InMarathi

 

३ idiots या चित्रपटात आमिर खान जसं माधवनला समजावताना म्हणतो, ” गाडी गेट पे थी, थोड़ी और हिम्मत कर लेता तो आज जिंदगी कुछ और होती!” आणि सिद्धांतने ती हिम्मत दाखवली, त्याने गाडी पकडली आणि आज आपल्याला तो सोनेरी पडद्यावर झळकताना दिसतो आहे.

बॉलिवूडमध्ये यायचं स्वप्नं घेऊन अनेक लोक मुंबईत येतात, हे बॉलिवूडचं विश्व काहींचं आयुष्यच असं बदलून टाकतं की रोजचं जीवनही स्वप्नवत वाटतं. त्यातीलच एक असा चमकता तारा म्हणजे सिद्धांत चतुर्वेदी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?