' "रशिया - युक्रेन युद्ध होणार आणि...." बाबा वंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी

“रशिया – युक्रेन युद्ध होणार आणि….” बाबा वंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच विषय चघळला जातोय, तो म्हणजे युक्रेन-रशिया या देशात धगधगणारं युद्ध! न्युज चॅलेन्स, सोशल मिडीया यांच्यामुळे क्षणाक्षणाचे अपडेट्स मिळतात आणि दररोज चर्चेला नवा मुद्दा समोर येतो.

हे युद्ध म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची नांदी  तर नव्हे?… अशी भितीही व्यक्त केली जात आहे. या युद्धात कोण जिंकणार? कोणाचे सैन्य नमते घेणार? मनुष्यहानी किती होणार? आणि अखेरिस या युद्धाचे जगावर नेमके किती आणि कसे पडसाद उमटणार? या प्रश्नांची उत्तरं आपल्यापैकी कुणाकडेही नाहीत. मात्र जगातल्या एका व्यक्तीने या प्रश्नांची उत्तर आधीच देऊन ठेवली आहेत.

 

russia ukraine featured IM

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोण आहे ही व्यक्ती? या व्यक्तीनेे रशिया युद्धासंदर्भात अशी कोणती भविष्यवाणी केली आहे? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण या व्यक्तीची भविष्यवाणी खरी ठरली तर ही बाब संपुर्ण जगासाठी धोक्याची घंटा असू शकेल.

बापरे, बाबा वंगांची भविष्यवाणी

आपल्या भाकीतांसाठी प्रसिद्ध असणारे बाबा वंगा यांनी रशियाबाबत भविष्यवाणी वर्तवली आहे.

‘बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस’ या टोपणनावाने ओळखल्या जाणार्‍या बाबा वंगा या दृष्टिहीन ज्योतिषींनी त्यांच्या भविष्यवाण्यांद्वारे इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्यांनी यापूर्वी ९/११ आणि ब्रेक्झिट संकटाचे अचूक भाकीत केले होते.

व्हेंजेलिया गुश्तेरोवा उर्फ बाबा वंगा यांनी वयाच्या १२ व्या वर्षी त्यांची दृष्टी गमावली आणि त्याच वेळी असा दावा केला, की देवाकडून त्यांना भविष्य बघण्याची देणगी मिळाली.

 

 

सोव्हिएत युनियनचे विघटन, २००१ साली झालेला ११ सप्टेंबरचा हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि चेरनोबिल आपत्ती याबद्दल त्यांची भाकिते खरी ठरली आहेत.

१९९६ साली वयाच्या ८५ व्या वर्षी मृत्यूपूर्वी त्यांनी २०२२ बद्दल धक्कादायक भविष्यवाणी केली होती. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी ५०७९ पर्यंतच्या भविष्यवाण्या करून ठेवल्या आहेत. त्यांच्या भाकिताप्रमाणे ५०७९ मध्ये जगाचा अंत होईल.

आजपर्यंत बाबा वंगा यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा इतिहास आहे, त्यामुळे जर रशियाबाबत त्यांनी केलेले भाकीत खरे ठरले तर?.. हा प्रश्न झोप उडवणारा आहे.

काय म्हणालेत बाबा वंगा?

बाबा वंगांच्या मते पुढील काही वर्षात रशिया जगावर राज्य करेल. रशियाकडे इतके सामर्थ्य असेल की त्यामुळे अमेरिकेसारखी महासत्ताही फिकी पडेल. रशियाच्या या विजयामागे अर्थातच व्लादिमीर पुतीन यांचा हात असल्याने ते देखील जगावर राज्य करतील.

व्लादिमीर यांच्या आत्मविश्वासाच्या बळावर रशिया स्पर्धेत आपल्या मार्गातील इतर सर्वांना शह देईल असेही बाबा वंगा यांची भविष्यवाणी सुचवते.

 

putin featured inmarathi
daily express

 

एकंदरित सध्या रशियाचा आक्रमक पवित्रा, इतर देशांकडून विरोध होत असतानाही छेडलेले युद्ध, रशियाकडे असलेली साम्रगी यांचा विचार करता बाबा वंगा यांची भविष्यवाणी पुन्हा एकदा खरी ठरेल का? अशी भिती व्यक्त केली जात आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून बाबा वंगा यांची भविष्यवाणी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

आता बाबा वंगा यांच्या इतर भाकीतांप्रमाणे ही भविष्यवाणीही खरी ठरून रशियाचे नशिब फळफळणार का? ही बाब येणाऱ्या काही काळात सिद्ध होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?