' हे १० प्रश्न ठरवतील तुमची मराठी भाषा पक्की आहे की कच्ची? उत्तरं कमेंट करा – InMarathi

हे १० प्रश्न ठरवतील तुमची मराठी भाषा पक्की आहे की कच्ची? उत्तरं कमेंट करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज मराठी भाषेचा गौरव केला जात आहे. मराठी राजभाषा दिन साजरा होत असताना प्रत्येकजण मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त केले जात आहे. मात्र खरंच तुम्हाला मराठी भाषा आवडते का? तुम्हाला या भाषेबाबात माहिती आहे का? असा प्रश्न विचारला तर?…

थांबा, या प्रश्नाचे कोणतेही उत्तर देण्यापुर्वी खाली दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तर देता येत आहेत का? ते तपासून घ्या.

 

marathi bhasha im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१) दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिवस , महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी …………. यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.

◆ कुसुमाग्रज
◆ बालकवी
◆ केशवसुत
◆ ग.दि. माडगूळकर‎

२) मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म ………… रोजी पुणे येथे झाला.

◆ २७ फेब्रुवारी १९२०
◆ २७ फेब्रुवारी १९१४
◆ २७ फेब्रुवारी १९१२
◆ २७ फेब्रुवारी १९११

३) विष्णू वामन शिरवाडकर यांनी ………… या टोपणनावाने कवितालेखन केले.

◆ बालकवी
◆ केशवसुत
◆ केशवकुमार
◆ कुसुमाग्रज

४) शके १११० मधील …………. यांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे

◆ संत ज्ञानेश्वर
◆ समर्थ रामदास
◆ मुकुंदराज
◆ संत तुकाराम

५) …………… यांनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय.

◆ संत ज्ञानेश्वर
◆ पंडित म्हाइंभट
◆ समर्थ रामदास
◆ संत एकनाथ

 

marathi im

 

६) मराठी भाषेतील पहिले वाक्य …………… येथील शिलालेखावर सापडले.

◆ श्रवणबेळगोळ
◆ नाशिक
◆ आळंदी
◆ विजयपूर

७) दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी …………….. रोजी सुरू केले.

◆ ६ मार्च १८३२
◆ २७ फेब्रुवारी १८२५
◆ ६ जानेवारी १८३२
◆ १५ जानेवारी १८३५

८) भारतातील साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. १९७४ मध्ये पहिल्यांदाच …………… यांच्या मराठी कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता.

◆ भालचंद्र नेमाडे
◆ शिवाजी सावंत
◆ पु. ल. देशपांडे
◆ वि. स.खांडेकर

९) मराठीतील सर्वोत्तम चित्रपटाचे पहिले राष्ट्रपती सुवर्णकमळ …………….. यांच्या ”श्यामची आई’’ चित्रपटास मिळाले होते. *

◆ गो. नी. दांडेकर
◆ आचार्य अत्रे
◆ दादासाहेब फाळके
◆ बालगंधर्व

१०) ……………. या महान नाट्यकृतीसाठी कुसुमाग्रजांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. *

◆ संशयकल्लोळ
◆ ययाती आणि देवयानी
◆ नटसम्राट
◆ विदूषक

या प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. शिवाय किती प्रश्नांची योग्य उत्तरं देता आली ते देखील प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?