' येत्या ४ मार्चला मराठी प्रेक्षकांना लागणार एक जबरदस्त “झटका” – InMarathi

येत्या ४ मार्चला मराठी प्रेक्षकांना लागणार एक जबरदस्त “झटका”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लॉकडाऊनंतर मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत. झिम्मा, पावनखिंड, कॉफी, पॉंडेचेरी यांसारख्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांना थिएटरमध्ये येण्यास भाग पाडलं. मात्र एकीकडे बड्या स्टारकास्टचे चित्रपट झळकत असताना दुसरीकडे दोन मराठमोळे तरुण मराठीत पहिल्यांदाच भन्नाट प्रयोग घेऊन येत आहेत.

अंदाधुंद, जाने भी दो यारो यांसारख्या हिंदी चित्रपटांतून ब्लॅक कॉमेडी हा प्रकार आपण अनुभवला आहे, मात्र या आजतागायात मराठी भाषेत फारसा पाहण्यात आला नव्हता. हसता हसता घाबरवणारा, स्तब्ध करणारा, मर्डर मिस्ट्री सोडवताना आपल्याही मेंदुवर ताण द्यायला भाग पाडणारा आणि शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचवणारा मराठीतील पहिला ब्लॅक कॉमेडी चित्रपट ४ मार्च रोजी तुमच्या भेटीला येतोय.

 

zataka poster

 

दिग्दर्शख अजिंक्य उपासनी आणि लेखक अभिनेता गौरव उपासनी हे दोघेही महाराष्ट्राला एक ‘झटका’ द्यायला सज्ज झाले आहेत. हा झटका नेमका कोणता? हे जाणून घ्यायचं असेल तर चक्रावून टाकणारा हा भन्नाट ट्रेलर तुम्ही पहायलाच हवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

ही कथा आहे प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुण जोडप्याची. भविष्याची स्वप्न रंगवताना हे जोडपं नव्या घरात रहायला येतं. मग प्रेम बहरेल, संसार फुलेल असंं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा, इथेच खरी गंमत आहे. नेहमीच्या चाकोरीबद्ध कथांची चौकट मोडून प्रेक्षकांच्या डोक्याला नवा खुराक देणारी कथा लिहीली आहे लेखक गौरव उपासनी यांनी!

हे तरुण जोडपं नव्या घरात रहायला येतं, आणि त्याच दिवशी त्यांच्या कपाटात एक मृतदेह सापडतो. हा मृतदेह नेमका कोणाचा? मारेकरी कोण? या निरपराध जोडप्यावर आळ येणार का? पोलिसांचा ससेमिरा मागे लागणार का? यांतून त्यांची सुटका नेमकी कशी होणार? यांसारखे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मात्र या प्रश्नांची उत्तरं ही तुमच्या कल्पनेपलिकडील असतील असे आश्वासन लेखक गौरव उपासनी देतात.

नेहमीच्या किंवा यापुर्वी पाहिलेल्या कथांना बगल देत एक नवीकोरी कहाणी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

 

zatka im

 

अभिनेत्री पुर्णिमा डे आणि अभिनेता गौरव उपासनी यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या या चित्रपटात इतरही अनेक कलाकार दिसतात. यापैकी पुर्णिमा डे वगळल्यास इतर सर्व कलाकार नवोदित असले तरी चित्रपटाची कास्टिंग ही त्याची सर्वात मोठी जमेची बाजू असल्याचे दिग्दर्शक अजिंक्य उपासनी सांगतात. प्रत्येक भुमिकेतील कलाकार हा त्या भुमिकेत चपखल बसणारा असल्याने प्रेक्षकांना पावणेदोन तास एका मर्डर मिस्ट्रीत सहभागी झाल्याचा थरार अनुभवता येईल.

‘झटका- आता सुरुवात गोंधळाची’ या नावातच चित्रपटाच्या वेगनान कथेचा अंदाज येतो. चित्रपटाच्या पहिल्या काही मिनिटांपासूनच पडद्यावर जो गोंधळ रंगतो, तो पावणेदोन तास प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल असा विश्वास लेखक गौरव उपासनी आणि दिग्दर्शक अजिंक्य उपासनी व्यक्त करतात.

पुर्णिमा डे, गौरव उपासनी, अपुर्व रांजणकर, ओमकार गोखले यांसह इतरही काही कलाकारांच्या अभिनयाने सजलेली ही कलाकृती प्रेक्षकांना जबरदस्त झटका देणार हे नक्की! यापुर्वी प्रायोगिक नाटक, शॉर्ट फिल्म्स अशा इतर माध्यमात आपली कला सादर करणाऱ्या गौरव आणि अजिंक्य या भावंडांनी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे.

 

jhatka 1 im

 

ब्लॅक कॉमेडीसारखा नवा प्रकार, सशक्त कथा, दर्जेदार अभिनय यांसह जॅझ आणि रॉक यासारख्या संगीताची साथ यांसह तांत्रिक बाबींमध्येही निरनिराळे प्रयोग केले गेल्याचे प्रेक्षकांना एक परिपुर्ण कलाकृती पाहण्याचा आनंद मिळेल असे चित्रपटाच्या टिमकडून सांगण्यात येते.

मराठमोळ्या तरुण कलाकारांच्या या प्रयत्नांना महाराष्ट्रातील सुजाण प्रेक्षक नक्कीच साथ देतील, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतील असा विश्वासही ते व्यक्त करतात.

 

jhataka movie im

 

या चित्रपटाच्या ट्रेलर आणि टिझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून या झटकाच्या टिमचं भरभरून कौतुकही होत आहे.

आता प्रेक्षकांना हा झटका बसतो का? विनोदाची फोडणी असलेला हा सस्पेन्स थ्रीलर आवडतो का? मराठीतील पहिलावहिला ब्लॅककॉमेडीचा हा प्रयोग मराठी रसिकांना भावतो का? या प्रश्नांची उत्तर शोधायची असतील तर चित्रपटगृहात जाऊन झटकाचा एक तरी ‘शो’ बघायलाच हवा.

४ मार्च पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात कॉमेडी आणि थ्रिलर झटका अनुभवायला सज्ज व्हा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?