' युक्रेन सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे तिकडची आबालवृद्ध मंडळी!! – InMarathi

युक्रेन सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे तिकडची आबालवृद्ध मंडळी!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची अवस्था सध्या फारच बिकट झाली आहे. अमेरिकेसारखं राष्ट्रसुद्धा आता रशियावर अनेक निर्बंध लावून युक्रेनच्या मदतीसाठी पुढे सरसावलं आहे. रशियाकडून हल्ला होण्याचा जो संभावित धोका आहे त्याचं पूर्ण गांभीर्य ओळखून युक्रेन आता स्वतःला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आजच्या घडीला जगभरात सगळ्याच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने आघाडीवर आहेत. महिला पुरुषांपेक्षा दुय्यम आहेत या लोकांच्या संकुचित मानसिकतेत आता सर्वत्र सकारात्मक बदल होताना दिसतोय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात युक्रेनचं सैन्य आता पूर्वीपेक्षा वेगळं असल्याचं म्हटलंय. पण यातली लक्षणीय बाब ही की युक्रेनच्या या नव्या सैन्यात महिलांना मोठ्या प्रमाणावर भरती केलं जातंय.

 

russia im

 

‘बाईचा जीव तिच्या संसारात, मुलाबाळांच्यात, नवऱ्यात गुरफटलेला असतो.’ हे जरी आजही काही अंशी खरं असलं तरी याला फाटा देत ‘आधी राष्ट्र, नंतर बाकी सगळं’ असा उद्दात्त विचार करत युक्रेनच्या महिलांनी आपलं घरदार मागे सोडून देशाच्या रक्षणासाठी हाती शस्त्रं उचलली आहेत. महिलांना युद्धात उतरवण्याची तयारी करताना युक्रेन लष्कराने महिलांना बंदूक हाताळणं तसंच स्वसंरक्षण करता येणं यासारखं युद्धासाठीचं प्राथमिक शिक्षण दिलं आहे.

 

ukraine im 4

 

युक्रेनच्या लष्करात पूर्वीपासूनच महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. १९९३ पासून युक्रेनने महिलांना आपल्या लष्करात संधी दिली. त्याआधी महिला कायम परिचारिकेचं, सचिवाचं काम, शिवणकाम करताना आणि रांधतानाच दिसत. अनुभवी महिलांनी महिलांकरता समर्थन मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच महिलांना लष्करात भरती व्हायला परवानगी मिळण्याचा हा धोरणात्मक बदल होऊ शकला. गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत युक्रेन लष्करातील एक महिला नादिया बाबीच या जुनिअर सार्जंटच्या स्थानापर्यंत पोहोचल्या आहेत.

 

ukraine im

दरम्यान त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलीला जन्मही दिलाय. देशाच्या रक्षणासाठी कार्य करण्याची आपली प्रेरणा पुरुष सैनिकांपेक्षा काहीच वेगळी नसल्याचं त्या सांगतात. त्या म्हणतात, “पुरुषांची सैन्यात भरती होण्याची जी कारणं आहेत तीच महिलांचीही आहेत. आम्हाला युक्रेन स्वतंत्र ठेवायचाय.” सध्यस्थितीत २० ते ६० वयोगटातील ३० हजारांहून अधिक गृहिणी आणि नोकरदार महिला सैन्यात भरती झाल्या आहेत. पुरुषांच्या तुकडीलाही मागे टाकतील असं वाटण्याइतपत महिलांची तुकडी आता सक्षम झाली आहे.

युक्रेन देशाच्या लष्कारात सुमारे १५ % महिला आहेत. २०१८ साली आलेल्या कायद्यानुसार लष्करातील महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सामान हक्क देण्यात आले. युक्रेनच्या महिला लष्करात एकूण ११०० महिला ‘अधिकारी’ पदावर कार्यरत आहेत. तर प्रत्यक्ष युद्धभूमीवर १३ हजारांहून अधिक महिला आहेत. सध्या युक्रेनच्या महिला सैनिक देशाच्या अशांत पूर्व भागात रशियन समर्थित बंडखोरांशी लढा देत आहेत.

 

ukraine im 1

 

या सगळ्यात अधिकच लक्ष वेधून घेणारी गोष्ट ही की वय झाल्याची सगळी कारणं बाजूला सारून अनेक तरुण स्त्रियांच्याबरोबरीने वृद्ध स्त्रियाही युद्धासाठी सज्ज झाल्या आहेत. एखादी गोष्ट करण्याची आपली जिद्द असेल तर मार्गात येणारे सगळे अडथळे पार करून आपण ती गोष्ट करतोच हे या वृद्ध महिलांकडे पाहून कळतं. बऱ्याच फोटोंमध्ये स्त्रिया ‘एके ४७’ चा सराव करताना दिसल्या.

या महिला रशियाला खुलं आव्हान देत आहेत. ‘बाबुष्खा बटालियन’ नावाची वृद्ध महिलांची स्वतंत्र बटालियन लष्करात आहे. युद्धाच्या वेळी ही बटालियन लष्करी पुरवठा करण्याचं, वैद्यकीय मदत करण्याचं काम आणि गुप्तचर सूचनांची देवाणघेवाण करते. २०१४ साली रशियाने क्रिमियावर आक्रमण केलं होतं त्यावेळी त्यांनी सैनिकांसाठी खंदक खोदण्याचं काम केलं होतं. महिला सैनिकांनी तेव्हा वाखाणण्याजोगा पराक्रम गाजवला होता. रशियाच्या हल्यात युक्रेनचे नागरिक आणि सैनिक मोठ्या प्रमाणावर मारले गेले होते.

 

ukraine im 3

 

काही दिवसांपूर्वी एक महिला सैनिक वादात अडकली होती. महिलांची परेड सुरू असताना या महिलेने हिल्स घातल्याचं आढळून आलं. यानंतर स्त्रीवाद्यांनी सैन्यावर आणि सरकारवर सवाल उठवले होते. त्यांचं म्हणणं होतं की असं करून युक्रेनचं सैन्य स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव निर्माण करतंय. युक्रेन सरकारलाही यामुळे तीव्र टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

लष्करासारख्या अत्यंत जोखमीच्या क्षेत्रात युक्रेनच्या महिलांचा वाढता सहभाग जगभरातल्या अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. भीड चेपून अशा अधिकाधिक महिला लष्करात येण्याचं धैर्य दाखवू लागल्या तर याहून अधिक अभिमानाची बाब आणखीन कुठली! युक्रेनच्या लष्करातील तमाम महिलांना मानाचा मुजरा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?