' ब्रह्मचैतन्य रुग्णालय – हे रुग्णालय की राम मंदिर – तुम्हीच ठरवा! – InMarathi

ब्रह्मचैतन्य रुग्णालय – हे रुग्णालय की राम मंदिर – तुम्हीच ठरवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दवाखाना म्हणजे सवर्त्र औषधांचा गंध, चहूकडे गंभीर वातावरण असं चित्र डोळ्यासमोर येतं.

आणि मंदिर ? – उदबत्तीचा सुगंध, कुठेकुठे सुविचार, श्लोक लिहिलेले…असं काहीसं.

जर एका दवाखान्यात असंच मंगल वातावरण आहे – हे सांगितलं तर खरं वाटेल का?

पण हे खरंय…अहमदनगरचं “ब्रह्मचैतन्य रुग्णालय” अगदी एखाद्या मंदिरासारखं आहे.

 

brahmachaitanya hospital inmarathi

 

डॉ कुलकर्णी दाम्पत्याचं मूळ “चिंतामणी हॉस्पिटल”, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भक्तीरसाने भारावून जाऊन “ब्रह्मचैतन्य रुग्णालय” झालंय.

ह्या हॉस्पिटलच्या मागेच एक प्रशस्त ३ मजली मंदिर देखील आहे.

 

brahmachaitanya hospital marathipizza 03

 

नाममात्र शुल्क (रू ३० फक्त !) आकारून ह्या रुग्णालयात रुग्णांची तपासणी होत.

सध्याच्या महागड्या उपचारांची आपल्याला इतकी सवय झाली आहे, की इतक्या कमी रकमेत उपाचर ही बाब अनेकांच्या पचनी पडत नसेल.

OPD मधे रुग्णांचं स्वागतच मोठ्या प्रेमाने होतं.

 

brahmachaitanya hospital marathipizza 18

प्रवेश केल्याकेल्या मनाचे श्लोक दृष्टीस पडतात !

प्रत्येक रुग्णाला शारिरीक उपाचारांसह मानसिक शांती मिळावी हा त्यामागील उद्देश असावा.

प्रत्येक रुग्णालयातला वाढता ताण असह्य होत असल्याचं आपण पाहतो, पण हा ताण निर्माण होवु नये यासाठी डॉक्टरच प्रयत्नशील असल्याच हे उदाहरण नक्कीच अनोख आहे.

 

brahmachaitanya hospital marathipizza 19

 

बहुतांश रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक, कुटुंबिय यांच्यात ताण असलेला जाणवतो.

काळजीने फेऱ्या मारणारे नातेवाईक यांची दयनीय अवस्था पाहिल्यावर कुणालाही

पण या रुग्डॉणालयात मात्र नातेवाईकच काय पण डॉक्टरांना भेटण्यासाठी आपल्या नंबरची वाट बघणारे रुग्ण “रिकामे” बसत नाहीत…!

तिथे ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचनं व इतर आध्यात्मिक पुस्तकं वाचनासाठी उपलब्ध आहेत.

 

brahmachaitanya hospital marathipizza 23

 

डॉक्टर कुलकर्णींचं केबिन तर एखाद्या देवघरासारखं भक्तीरसाने परिपूर्ण आहे…

अनेक भक्तीपुर्ण संदेश वाचतानाच मनालाही शांती मिळते.

या केबिनमध्ये येणारा माणूस थक्क होवून या भिंतीकडे बघतच राहतो.

 

brahmachaitanya hospital marathipizza 25

 

वरच्या मजल्यावर admit झालेल्या रुग्णांसाठी जप-माळ आणि प्रवचनांचं पुस्तक ठेवलेलंय…! रुग्णावस्थेत ह्याने खूप मनःशांती मिळते.

बहुतांश हॉस्पिटल्समध्ये सलाईल्स, ऑक्सिजन या यंत्रणा सर्वात आधी दिसतात, मात्र खोलीत दिसणारी जपमाळ, पुस्तके पाहिल्यानंतर हे रुग्णालय आहे का असा खरच प्रश्न पडतो.

 

brahmachaitanya hospital marathipizza 12

 

फोटो पाहिल्यानंतर हे रुग्णालय आहे, यावर तुमचा विश्वास न बसण अगदीच स्वाभाविक आहे.

 

brahmachaitanya hospital marathipizza 11

 

साध्या सोप्या भाषेतली प्रवचनं वाचल्यावर रुग्णांच्या मनाला जास्तीजास्त शांतता मिळेल ही त्यामागची भावना होती.

एवढंच नाही, प्रत्येक ward ला, खोलीला संतांचीच नावं दिल्या गेली आहेत…

 

brahmachaitanya hospital marathipizza 05

 

प्रत्येक खोलीला वेगवेगळ्या महाराजांची नावं देण्यात आली आहेत.

रुग्णालयातील खोल्या अशाच नावांनी ओळखल्या जातात.

 

brahmachaitanya hospital marathipizza 06

 

ब्रह्मचैतन्य “गोंदवलेकर” महाराजांचे निस्सीम भक्त असलेल्या डॉ कुलकर्णी दाम्पत्याच्या भक्ती रसाने त्यांचं हॉस्पिटल न्हाऊन निघालं आहे.

चहूकडे देवळांचा धंदा चालू असताना आपल्या व्यवसायालाच देऊळ बनवणाऱ्या ह्या “वैद्य” दाम्पत्याची भक्ती अतुलनीयच !

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?