' कंगनाच्या निशाण्यावर आता आलिया; गंगुबाई ते भगवद्गीता असा रंगला कलगीतुरा…. – InMarathi

कंगनाच्या निशाण्यावर आता आलिया; गंगुबाई ते भगवद्गीता असा रंगला कलगीतुरा….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर एकंदरच लोकांचा बॉलिवूडवर जो राग आहे तो काही कमी होताना दिसत नाहीये, उलट गेले काही महिने बॉलिवूडचे सिनेमे बघता ती लोकं स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत.

सध्या सगळेच नेपोटीजमुळे बॉलिवूडवर नाराज आहेत तरी बॉलिवूड सुधरायचं नाव घेत नाहीयेत. काही नेपोकिड्सही अभिनय चांगला करतात पण तरी केवळ स्टारकीड असल्यामुळे त्यांना या टीकांना सामोरं जावं लागतंय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सध्या असंच काहीसं घमासान आलिया भट आणि कंगनामध्ये आपल्याला बघायला मिळतंय, आलिया सध्या तिच्या गंगूबाई काठियावडी या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

 

kangna alia IM

 

काही दिवसांपूर्वी जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा कित्येकांनी आलियाची तारीफ केली, पण कंगना राणावतने मात्र यावेळेस आलियावर चांगलीच आगपाखड केली आहे.

गंगूबाईच्या ट्रेलरवर कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करत आलियाला “पापा की परी” म्हणत टार्गेट केलं आहे, शिवाय या सिनेमातलं कास्टिंग कसं गंडलंय याविषयीसुद्धा तिने टिप्पणी करत बॉलिवूडच्या नेपोटीजमवर टीका केली आहे.

खरंतर गेल्या काही महिन्यांपासून कंगना ही तिच्या बेधडक वक्तव्यासाठी बऱ्याचदा चर्चेत असते. राजकारण असो नाहीतर बॉलिवूड माफिया दोन्हीविषयी कंगना बिनधास्तपणे तिची मतं मांडते.

 

kangana saree inmarathi

 

मध्यंतरी तिच्या या वागण्यामुळे तिचं ट्विटर अकाऊंटसुद्धा बंद केलं होतं, आता पुन्हा खरंतर काहीच कारण नसताना कंगनाने आलियावर निशाणा साधला आहे, आणि चक्क आलियानेसुद्धा यावेळीस एका वेगळ्याच पद्धतीत कंगनाच्या या स्टेटमेंटला उत्तरदेखील दिलं आहे.

गंगूबाई सिनेमाच्या एका गाण्याच्या लॉंचच्या दरम्यान आलियाला कंगनाने केलेल्या पोस्टविषयी एकाने सवाल केला तेव्हा आलियाने भगवद्गीतेमधल्या एका श्लोकाचा संदर्भ दिला आहे ते म्हणजे असं की “कर्म करत रहा, फळाची चिंता करू नका, एवढंच मी बोलेन!”

alia bhatt IM

 

आलियाच्या या स्टेटमेंट ऐकता तिने कंगनाच्या वक्तव्याला किती किंमत दिली आहे ते कळतं. अर्थात कंगनाच्या स्टेटमेंटमध्येदेखील चुकीचं काहीच नाहीये, कारण सध्या बॉलिवूडला नेपो किड्सची फॅक्टरी असंच म्हंटलं जातंय!

सध्या महाराष्ट्रातदेखील बॉलीवुडपेक्षा इंग्रजी, मराठी आणि साऊथच्या सिनेमांना जास्त स्क्रीन्स मिळतायत असा कंगनाने दावा केला असून, गंगूबाई सिनेमाचीसुद्धा अवस्था वाईटच होणार आहे असं भाकीत तिने केलं आहे.

मध्यंतरी सोशल मीडियावर एका लहान मुलीने गंगूबाईची नक्कल केल्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, त्यावरूनसुद्धा कंगनाने आलियाला आणि देशातील पालकांना खडेबोल सुनावले होते!

 

gangubai copy IM

 

लहान मुलांकडून अशा पद्धतीने नकला करून घेणाऱ्या पालकांवर सरकारने त्वरित कारवाई करावी असं आव्हानदेखील तिने केलं होतं, हा सिनेमा एका वैश्यालय चालवणाऱ्या बाईवर बेतलेला असल्याने लहान मुलांनी तिचं अनुकरण करणं योग्य नाही असंही कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं!

अर्थात सिनेमा नेमका हीट होणार का हे तो प्रदर्शित झाल्यावरच कळेल, पण कंगना आणि आलियामधल्या या संभाषणाचा सिनेमाला नक्कीच फायदा होईल हे मात्र नक्की.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?