' ‘भगवान जब देता है तब छप्पर फाडके देता है’; तुमचाही विश्वास बसेल जेव्हा या मजुराला बघाल… – InMarathi

‘भगवान जब देता है तब छप्पर फाडके देता है’; तुमचाही विश्वास बसेल जेव्हा या मजुराला बघाल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येकाला त्याच्या नशिबात जे असतं ते मिळतंच असं म्हणतात. आता यामध्ये अंधश्रद्धेचा भाग किती आणि श्रद्धेचा भाग किती हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे. पण असं असतं ना की एखाद्याला कोणीही ओळखत नसतं पण एखादा सिनेमा मिळाला की तो एका रात्रीत प्रसिद्धच होतो.

लेखनाची आवड आणि जाण नसलेला माणूसही कधीतरी काही ओळी अशा लिहितो की त्यानंतर त्याला व्यावसायिक लेखनाच्या ऑफर यायला लागतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

धनुष हा साऊथचा स्टार. पण तो संपूर्ण भारतात फेमस झाला ते कोलावेरी डी मुळेच. सैराटमधली आर्ची कोणाला माहिती नव्हती. या सिनेमामुळं ही शाळकरी मुलगी एका रात्रीत स्टार झाली. पण ही झाली जरा जुनी उदाहरणं.

 

dhanush and rinku IM

 

सध्या सोशल मीडियामुळे कोणीही काहीही केलं तरी फेमस होतोय, व्हायरल होतोय. त्यातून पैसे कमावण्याचं स्वप्न बघतोय. अशीच रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी राणू मंडल प्रचंड व्हायरल झाली. सोशल मीडियावर लोकांनी तिला अक्षरशः डोक्यावर घेतलं. पण तिचं नशीब तितकं चांगलं नव्हतं. कारण ज्या सोशल मीडियाने जितक्या लवकर राणू मंडलला डोक्यावर घेतलं, त्याच सोशल मीडियाने तिला तितक्याच लवकर खालीही उतरवलं.

राणू मंडल भिक्षा मागायची पण तिचा आवाज चांगला असल्याने एकाने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. तिच्या आवाजाची तुलना लता दीदींच्या आवाजाबरोबर केली गेली.

 

ranu inmarathi 3

 

राणू मंडल एका रियॅलिटी शोवर आली. तिने एक गाणं रेकॉर्ड केलं, तिला घर देण्याचंही स्वप्न दाखवलं. पण तिला काही ते टिकवता आलं नाही. तिच्यासारखाच एक रोजंदारीवर जगणारा मजूर झालाय मॉडेल. कोण आहे हा मॉडेल? आणि कसा काय तो झाला फेमस?

रोजंदारीवरचा मजूर झाला मॉडेल…

६० वर्षांचा फाटके कपडे घालणारा, रोजंदारीवर जगणारा केरळमधला एक मनुष्य चक्क मॉडेल झाला. मॉडेल झाला तो झालाच शिवाय सोशल मीडियाच्या कृपेने झटपट व्हायरलही झाला. काही दिवसांपूर्वी हाच माणूस रस्त्याने काम शोधात फिरत होता असं सांगितलं तर कोणाला पाटणारही नाही.

अंगावर महागडा सूट, कोरलेली दाढी, फॅन्सी हेअरस्टाईल, डोळ्यावर गॉगल, हातात आयपॅड आणि पायात महागडे बूट असा कोणत्याही सिनेमातल्या हिरोसारखा अवतार बघून कोण म्हणेल या माणसाला रोजंदारीवरचा मजूर?

या ६० वर्षांच्या मॉडेलचं नाव आहे मम्मीका. हा मम्मीका केरळमधल्या कोडुवल्ली गावचा राहणारा आहे. हे गाव कोझिकोड जिल्ह्यातल्या वेन्नक्कड एरियात आहे.

 

mammika IM

हा मम्मीका गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारीचे काम करून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. पण दोन दिवसांपूर्वी त्याला एका फोटोग्राफरनं पाहिलं आणि त्याचं आयुष्यच बदलून टाकलं.

शारिक वायलील या फोटोग्राफरला मम्मीकामध्ये साऊथ ऍक्टर विनायकनची छबी दिसली. त्यामुळे त्यानं मम्मीकाचं फोटोशूट केलं आणि त्याचा कायापालट केला. त्यानंतर शारिकने मम्मीकाचा बिफोर आणि आफ्टर असा एक व्हिडिओ त्याच्या इन्टाग्राम अकाउंटवर टाकला तर तो चटाचट व्हायरल झाला.

या व्हिडिओमध्ये एक म्हातारा माणूस हातात भाजीची पिशवी घेऊन रस्त्याने चालताना दिसतोय. त्यानंतर तो सलूनमध्ये बसला आहे आणि तिथे त्याची हेअरस्टाईल आणि दाढी होत आहे. शेवटी मम्मीका फोटो शूटसाठी सूटबूटमध्ये एकदम तयार झालेला दिसतोय.

 

mammika before after IM

शारिक वायलील या फोटोग्राफरचं म्हणणं ऐका!

मम्मीकाला याच फोटोग्राफरनं रातोरात व्हायरल केलं. त्याच्याबद्दल शारिक म्हणतो की, “मला एक असाइनमेंट दिली होती. त्यामध्ये मला स्ट्रीट फोटोग्राफी करायची होती. तेव्हाच मला मम्मीका दिसला. त्याला बघताक्षणीच मला साऊथ ऍक्टर विनायकन आठवला. त्यामुळे माझ्या असाइन्मेंटमध्ये मी मम्मीकाला घ्यायचं ठरवलं. तसं माझं ठरल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो. त्यानंतर माझ्या असाइन्मेंटसाठी फोटोशूट करायचं होतं. त्यामध्ये येण्यासाठी त्यांचं मन वळवलं.”

आता रोजंदारी मजुरावरून मॉडेल बनलेले मम्मीका इंस्टाग्रामवर आले आहेत. त्यांच्या या पेजवर त्यांचे फोटोशूट वाले फोटोज आहेतच. शिवाय त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनचे व्हिडिओही आहेत.

 

mammika model IM

 

लोकांना हे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ खूप आवडत आहेत. त्यांच्या या लूकमुळे आणि लोकप्रियतेमुळे त्यांना मॉडेलिंगच्या ऑफर आल्या तर नवल वाटायला नको. पण एकच प्रार्थना राहील ती म्हणजे मम्मीकाची राणू मंडल व्हायला नको.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?