' मुंबईमधली अशी एक शाळा जेथे शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाया पडतात !

मुंबईमधली अशी एक शाळा जेथे शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाया पडतात !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्या संस्कृतीमध्ये गुरुला मानाचे स्थान आहे. पूर्वीच्या काळी विद्यार्थी गुरुला आपले सर्वस्व मानीत असतं. त्यांच्या चरणी आपले आयुष्य अर्पण करून, त्यांनी शिकवलेले ज्ञान प्राप्त करून मगच खऱ्या आयुष्यात उडी घेत असतं. गुरूच्या पाया पडणे त्याला मान देणे हे प्रत्येक शिष्याचे कर्तव्यच, त्यामुळे त्याच्या मस्तकावर नेहमी गुरुचा आशीर्वाद राहतो.

guru-shishya-marathipizza
blog.nimblefoundation.org

आपल्याला घडवणाऱ्या त्या देवतुल्य व्यक्तीला कधीही विसरू नये अशी शिकवण आपल्याला मिळत आली आहे. परंतु जस जसा काळ बदलला, तसतशी प्रथाही बदलली. आजच्या या आधुनिक युगात गुरूच्या पाया पडणे, त्याला मान देणे वगैर गोष्टी क्वचितच पाहायला मिळतात. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ज्या युगात विद्यार्थी आपल्या शिक्षकाचा आदर करत नाही त्या युगात अगदी उलट घडत आहे, म्हणजेच मुंबईमधील एका शाळेत चक्क शिक्षक विद्यार्थ्याच्या पाया पडतात आणि त्याचा आदर करतात. काय? ऐकून चक्रावलात ना?

या शाळेचं नाव आहे – ऋषीकुल गुरुकुल विद्यालय!

या शाळेची अशी भावना आहे की प्रत्येक मनुष्यामध्ये देवाचा वास असतो. त्यांच्या मते मुले ही देवाघरची फुले आहेत, मुले म्हणजे साक्षात परमेश्वराचा अंश आहेत. त्यामुळे त्यांच्या पाया पडणे म्हणजे देवाच्या पाया पडण्यासमान आहे.

gurukul-marathipizza
topyaps.com

या शाळेमध्ये हा विचार करून ही प्रथा सुरु करण्यात आली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात केवळ आपल्या पाया पडणाऱ्या शिक्षकांविषयीच आदरयुक्त भाव निर्माण होणार नाही तर आपल्या भोवतीच्या सर्वच वडिलधाऱ्या माणसांकडे ते आदराने पाहतील.

घाटकोपर मध्ये असणाऱ्या या शाळेला महाराष्ट्र स्टेट सेकेंडरी स्कूल बोर्डची मान्यताप्राप्त आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नव नवीन टेक्निक सह शिकवले जाते. पाहायला गेलं तर ही एक सामान्य शाळाच आहे, पण येथे विद्यार्थ्यांवर केले जाणारे संस्कार या शाळेला खास बनवतात.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?