' ”माझ्या जीवाला धोका”: गायिका वैशाली माडेच्या जीवावर नेमकं कोण उठलयं? – InMarathi

”माझ्या जीवाला धोका”: गायिका वैशाली माडेच्या जीवावर नेमकं कोण उठलयं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची गायिका वैशाली माडे हिने सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टने चांगलीच खळबळ माजवली आहे.

 

vaishali m im

 

काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे.” हे सांगणारी तिची पोस्ट व्हायरल झाली असून नेमकी कोणती लोकं वैशाली माडे यांच्या जीवावर उठली आहेत? हा प्रश्न चघळला जात आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

काय आहे पोस्ट?

वैशालीने फेसबुक पोस्ट करत आज या बाबत खुलासा केला आहे.

 

vaishali im

 

काही लोकांकडून आपल्या जीवाला धोका असून आपल्याविरुद्ध हत्येचा कट होत असल्याचे वैशाली यांचे म्हणणे आहे. मात्र या नेमक्या व्यक्ती कोण? याचा खुलासा वैशाली यांनी अद्याप केलेला नाही.

पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन आपण ही नावे जाहीर करणार असल्याचेही तिने म्हटले आहे. मात्र जर जिवाला धोका असेल आणि गुन्हेगारांची नावे ठाऊक असतील तर त्याकरिता २ दिवसांचा अवधी कशाला? दोन दिवस हा धोका पत्करण्यापेक्षा आताच नावे जाहीर करावी अशीही विनंती काही प्रेक्षकांनी केली आहे.

त्याचप्रमाणे जर हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली असेल तर सोशल मिडीयावर याविषयीची माहिती देत गुन्हेगारांना सावध करणे कितपत योग्य आहे? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

 

murder inmarathi

 

वैशाली यांनी आपल्या पोस्टमध्ये ”सर्वांचा पाठिंबा मिळावा” अशी विनंतीही केली आहे. मात्र हत्येसारख्या गंभीर विषयात सोशल मिडीयातील नेटकऱ्यांची मदत मागण्यापेक्षा पोलिसांकडे तक्रार करण्याचा पर्याय वैशाली यांनी का स्विकारला नाही? हा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

गायिका वैशाली माडे या आपल्या मुलीसह राहतात. फारसा कुणाचा पाठिंबा नसल्याचेही त्यांनी यापुर्वी उघड केले आहे. अशा परिस्थितीत वैशाली याचे कुणाशी वैर असावे? कोणत्या सूडबुद्धीतून कोण त्यांच्या जीवावर उठले आहे? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

त्यांच्या पोस्टनंतर सोशल मिडीयावर एकच खळबळ माजली असून प्रत्येकजण त्यांना सावध राहण्याचा सल्ला देत आहे. तसेच अनेक सुज्ञ नेटकऱ्यांनी त्यांना तातडीने पोलिसांची मदत घेण्याबाबतही सुचवले आहे.

 

net im

 

येत्या २ दिवसात पत्रकार परिषदेत त्या या नावांची घोषणा करणार आहेत. त्यामुळे यानंतर बॉलिवूड किंवा एकंदरित कलाविश्वात उलथापालथ होईल का? बड्या सेलिब्रिटींची नावे यात घेतली जातील का? अशा चर्चांनाही उधाण आले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?