' मूल ‘जन्माला’ घालण्यासाठी स्त्रीची गरज लागणार नाही…विज्ञानाचा चमत्कार? – InMarathi

मूल ‘जन्माला’ घालण्यासाठी स्त्रीची गरज लागणार नाही…विज्ञानाचा चमत्कार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मिटलेले डोळे, मागे दुमडलेले कान, केस नसलेली लाल चमकदार त्वचा आणि पोटात पाय घेऊन निवांत झोपले आहे. त्याच्या तिरकस समाधानी हसण्याने जणू ते भविष्याची स्वप्ने पाहत आहे असं वाटावं. हे कोकरू खूप लहान आहे बाहेर पडण्यासाठी. त्याचे डोळे बंद आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

तो अजून जन्माला आलेला नाही. पण इथे तो १११ दिवसांच्या गर्भावस्थेत, त्याच्या आईपासून पूर्णपणे वेगळा आहे, जिवंत आहे आणि फिलाडेल्फियामधील संशोधन प्रयोगशाळेत लाथ मारतो आहे. त्याचं शरीर एका द्रवपदार्थात आहे, पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीत तरंगत आहे, त्याची नाळ चमकदार रक्ताने भरलेल्या नळ्यांनी जोडलेली आहे.

 

biobag IM

 

हा कृत्रिम गर्भाशयात (बायोबॅग) वाढणारा गर्भ आहे. आणखी चार आठवड्यांत, पिशवी अनझिप केली जाईल आणि कोकरू जन्माला येईल. खरंच कृत्रिम गर्भाशयात बाळ जन्माला येऊ शकतं?? भविष्यात महिलांना मुल जन्माला घालावे लागणार नाही का??

सध्याच्या जोडप्यांमध्ये मूल होत नाही या कारणामुळे बरेच वाद होताना दिसतात, एकंदरच सध्याची लाईफ स्टाईल आणि कामाचा तणाव असल्याने प्रत्येक जोडप्यामध्ये तुम्हाला यापैकी काहीतरी प्रॉब्लेम आढळतातच.

काही जोडपी या प्रॉब्लेमवर तोडगा काढतात तर काही जोडप्यांमधले वाद विकोपाला जाऊन ते वेगळे होतात. खरंतर हा खूप गंभीर मुद्दा आहे आणि याविषयावरच आता मेडिकल सायन्सने बरेच उपाय काढले आहेत त्यापैकीच एका महत्वाच्या आविष्कार म्हणजे बायोबॅग, आणि त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत!

बायोबॅगचा जन्म एप्रिल २०१७ मध्ये झाला. संशोधकांनी प्रथम मेंढराच्या गर्भावर हा प्रयोग केला. यामध्ये एक गर्भ बायोबॅग मध्ये वाढविण्यात आला पुढे जाऊन त्याचं रूपांतर एका कोकरू मध्ये झालं. मेंढ्यांच्या गर्भात वाढलेले कोकरू आणि बायोबॅगमध्ये वाढलेले कोकरू ह्यामध्ये काहीच फरक नव्हता.

 

sheep IM

 

यासाठी मेंढ्याच का?

मेंढ्या हे प्रसूती संशोधनात जाणारे प्राणी आहेत कारण त्यांचा गर्भावस्थेचा कालावधी मोठा असतो आणि त्यांचा गर्भ आपल्या सारख्याच आकाराचा असतो. त्यामुळे मानवी शरीरातील गर्भाची रचना एकसारखी असल्याने मेंढ्यावर हा प्रयोग करण्यात आला.

बायोबॅग म्हणजे नेमकं काय?

बायोबॅगला कृत्रिम गर्भाशय म्हटले जाते कारण ह्याची संरचना गर्भपिशवी सारखीच असते. यामध्ये प्लेसेंटा म्हणजेच नाळ म्हणून एक ऑक्सिजनेटर कोकराच्या नाभीला जोडला जातो, जो गर्भाला ऑक्सिजन देतो तसेच कार्बन डाय ऑक्साईड देखील काढून टाकतो आणि पोषक तत्वे वितरीत करतो.

 

sheep 2 IM

 

गर्भाशयाप्रमाणेच गर्भाच्या हृदयाच्या ठोक्याने येथे रक्त पंप केले जाते. ह्या पिशवी तापमान हे मानवी गर्भाप्रमाणेच उबदार असते तसेच निर्जंतुकीकरण केलेले असण्याने गर्भाला काहीही धोका होत नाही.

या पिशवीमध्ये प्रयोगशाळेत तयार केलेला एक द्रवपदार्थ टाकला जातो जो गर्भातील द्रवाप्रमाणेच काम करतो. त्यामुळे कोकरू श्वास घेऊ शकते.

हा शोध वरदान सिद्ध होईल का?

प्रजनन क्षमता गमावलेल्या महिलांसाठी हा शोध भविष्यात एक वरदान ठरेल. कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये उपचारांदरम्यान केमोथेरपीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.

 

pregnant women IM

 

तसेच काही महिलांना शारीरिक व्याधींमुळे गर्भधारणा होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा महिला भविष्यात कृत्रिम गर्भाशयाचा आधार घेऊन आई होऊ शकतात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?