' फडणवीस किती पुरणपोळ्या खातात ते जाऊद्या, पुरणपोळीचे हे फायदे ठाऊक आहेत का? – InMarathi

फडणवीस किती पुरणपोळ्या खातात ते जाऊद्या, पुरणपोळीचे हे फायदे ठाऊक आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“देवेंद्रजी एकेकाळी ३५ पुरणपोळ्या पातेलीभर तुपासोबत खायचे!” विरोधिपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेलं हे स्टेटमेंट सध्या चांगलंच गाजतंय.

अमृता फडणवीस तशाही कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतातच, पण त्यांच्या या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांना चांगलंच खाद्य मिळालं आहे, या स्टेटमेंटवरून व्हायरल होणारे बरेच मीम्स तुम्ही पाहिले असतील शेयरही केले असतील, पण सध्या तो मुद्दा बाजूला ठेवूया, आणि याच पुरणपोळीविषयी जरा जाणून घेऊया.

 

devendra fadanvis amruta IM

 

सण हा आपल्या दैनंदिन जीवनात उत्साहाने साजरा केला जाणारा अमूल्य क्षण आहे. असाच एक निखळ आनंद देणारा सण म्हणजे रंगांचा सण – होळी! वसंत ऋतूतील हा रंगांचा सण आपल्यासोबत खूप आनंद घेऊन येतो जो प्रत्येकामध्ये उत्साहाची भावना निर्माण करतो!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या होळीच्या रंगांसोबतच आणखी एक गोष्ट आवर्जून हजेरी लावते. ती म्हणजे पुरणपोळी! कोणत्याही महाराष्ट्रियन माणसाला पुरणपोळी आणि तिचा आस्वाद माहिती नाही असे होवूच शकत नाही. इतकी ती मराठी संस्कृतीत रूजली आहे.

गरमागरम तव्यावरून डायरेक्ट ताटात आलेली, स्वादिष्ट पुरणाने टम्म फुगलेली आणि साजूक तुपात थबथबलेली पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते. कोण किती पुरणपोळ्या खातो यावर घराघरांत पैजाही लागतात.

 

puran poli IM

 

पुरण पोळीला तमिळमध्ये परुप्पू पोली, कन्नडमध्ये होलिगे किंवा ओब्बट्टू, कोकणीमध्ये उब्बती अशी विविध प्रादेशिक नावे आहेत. प्रदेशानुसार तिची चव देखील बदलते. पूर्णान्न समजल्या जाणार्‍या या पुरणपोळीचा देवाला दाखवायच्या मुख्य नैवेद्यात समावेश असतो.

पुरणपोळीवर ताव मारून दुपारची वामकुक्षी हा सणाच्या दिवशीचा ठरलेला बेत…पण आजकालच्या डाएट कॉन्शस पिढीतील लोक या पुरणपोळीपासून जरा दूरच राहतात. पुरणपोळी हे हेवी डाएट आहे, तिच्यामुळे वजन वाढते असे अनेकांचे मत आहे.

तुम्हाला पुरणपोळीचा आस्वाद घेताना वजन वाढण्याची शंका वाटत असेल तर थांबा, पुन्हा विचार करा प्रत्येक पदार्थाचे फायदे आणि तोटे असतात. पुरणपोळी हे उच्च कॅलरी असलेले अन्न आहे.

puran poli 2 IM

 

काही बदल करून आपण ते आरोग्यदायी बनवू शकतो जसे की मैद्याऐवजी संपूर्ण गव्हाचे पीठ वापरा, तूप कमी वापरा. पण त्याआधी या पुरणपोळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती व्हायलाच हवेत. चला तर मग या लेखातून आपण ते फायदे जाणून घेवू.

पुरण पोळीचे आरोग्यदायी फायदे:

१. संपूर्ण गव्हाच्या पीठाने बनवलेल्या पुरण पोळीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, फायबर, बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, विशिष्ट खनिजे असतात.

२. डाळ, जसे की आपण सर्व जाणतो, प्रथिने चांगल्या प्रमाणात देतात , तुम्हा सर्वांना हे जाणून आश्चर्य वाटेल की हे धान्य म्हणजे गव्हाचे पीठ आणि डाळीतील प्रथिने यांचे मिश्रण तुम्हाला चांगल्या दर्जाचे प्रथिने प्रदान करेल, ज्याची तुलना अंड्याशी केली जाऊ शकते. जे जवळजवळ १००% जैवउपलब्धता म्हणजेच उत्कृष्ट गुणवत्तेसह उच्च जैविक मूल्य मानले जाते. हे संयोजन सर्व आवश्यक अमीनो ऍसिड प्रदान करते जे प्रथिनांचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत.

 

puran poli dal IM

 

३. पुरणपोळीच्या पुराणात भरपूर गूळ असतो ज्यामध्ये लोह , कॅल्शियम, पोटॅशियम , फॉस्फरस असते, ते साखरेपेक्षा हळू पचत असल्याने ते हळूहळू ऊर्जा सोडते . तसेच गूळ पचनास देखील मदत करतो, कारण गूळ तुटतो आणि पचनसंस्थेत अल्कधर्मी बनतो.

४. हिरवी वेलची पावडर, केशर , जायफळ पावडर, गदा (जवंतरी) पावडर हे सर्व पदार्थ आपली पचनशक्ती सुधारण्यात मदत करतात!

पुरणपोळी हा प्रकार अनेकांनी बघितलाही नसेल; परंतु त्यांना ती माहीत आहे, त्याविषयी अतिशय कुतूहल आहे. साजूक तुपावर खमंग भाजलेली, सोनसळी पिवळ्या रंगाचा गूळ आणि चण्याच्या डाळीचे पुरण भरलेली, उत्तम प्रतीचा गहू वापरून केलेल्या पुरणपोळी आपली रसनातृप्ती करते.

नवीन काही पदार्थ करून पाहण्याची इच्छा असल्यास पुरणाचे सामोसे, मोमो हे प्रकारही करता येतील. ते होतात छान आणि लागतातही छान. पुरणामधेही नाना प्रयोग केले जातात.

 

puranpoli 3 IM

 

त्यातील चॉकलेट पुरणपोळी हा प्रकार सगळ्यांत लोकप्रिय झाला आहे. तेव्हा मित्रांनो आपले डाएट सांभाळूनही तुम्ही, अत्यंत आरोग्यदायी असलेल्या पुरणपोळीचा आस्वाद घेऊ शकता आणि सोबत सणाचा आनंदही घेवू शकता. पुरणपोळीचे फायदे सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?