' स्टीफन हॉकिंग बोलू शकण्यामागे आहे दोन भारतीयांचा महत्त्वपूर्ण शोध – InMarathi

स्टीफन हॉकिंग बोलू शकण्यामागे आहे दोन भारतीयांचा महत्त्वपूर्ण शोध

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात झालेल्या माहिती व तंत्रज्ञान क्रांतीचे आपण सर्व साक्षीदार आहोत. अणुसंशोधन, दूरसंचार या सर्वच क्षेत्रात आज भारताचं नाव जगभरात सन्मानाने घेतलं जातं. ‘स्टीफन हॉकिंग’ सारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाला बोलता यावं यासाठी भारतीय संशोधकांनी महत्वपूर्ण योगदान दिलं होतं हे फार कमी जणांना माहीत असावं.

अवघं २० वर्ष वय असतांना स्टीफन हॉकिंग यांना ‘मोटर न्यूरॉन डिसीज’ या आजाराने ग्रासलं होतं, ज्यामुळे त्यांचं शरीर हे अधु झालं होतं. चालणं, फिरणं हे बंद झालं होतं आणि कालांतराने त्यांची बोलण्याची शक्ती सुद्धा गेली होती.

 

stephen-hawking-release-inmarathi

 

भारतीय संशोधकांचं मोलाचं योगदान असलेल्या ‘स्पीच जनरेटिंग डिव्हाईस’च्या सहाय्याने ते लोकांशी संवाद साधायचे. भारतीय संशोधकांनी आजवर केलेल्या संशोधनांची यादी केली तर त्यामध्ये हे संशोधन त्यामध्ये एक मैलाचा दगड ठरेल.

स्टीफन हॉकिंग यांच्यासाठी केलेल्या या कार्याला विज्ञान जगतात इतकं महत्व का आहे? हे योगदान देणाऱ्या भारतीय व्यक्तींची नावं काय आहेत? जाणून घेऊया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी ऑक्सफोर्ड येथे झाला होता. लहानपणीपासूनच विज्ञान आणि अभ्यासाची प्रचंड आवड असलेल्या स्टीफन यांनी सेंट अल्बान्स आणि वेस्टमींस्टर या दोन शाळांमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं.

शालेय शिक्षणात विज्ञान आणि गणित हे त्यांचे आवडीचे विषय होते. महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांना गणित आणि विज्ञान यांच्यापैकी एक विषय निवडायचा होता. तेव्हा स्टीफन यांनी वडिलांच्या डॉक्टर होण्याच्या इच्छेनुसार विज्ञान क्षेत्राची निवड केली होती.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे विषय शिकतांना पहिलं वर्ष त्यांना हे शिक्षण घेणं आवडत नव्हतं, पण दुसऱ्या वर्षानंतर त्यांच्यात शिक्षकांना आमूलाग्र बदल दिसून आला आणि ते भौतिकशास्त्र पदवीधर होऊन त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी कॅम्ब्रिज विद्यापीठाची निवड केली.

 

stephen-hawking-InMarathi

 

स्टीफन हॉकिंग यांनी भौतिकशास्त्र विषयात डॉक्टर होण्याचा अभ्यास सुरू केला तेव्हा विज्ञान जगतात ‘ब्रम्हांड निर्मिती’ या विषयावर संशोधन सुरू होतं.

१९६५ मध्ये स्टीफन यांनी रॉजर पेंरोज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हॉकिंग’स् थेअरी’चं लिखाण केलं ज्याला विज्ञान जगात मान्यता मिळाली होती. त्यानंतर ‘थेअरी ऑफ रिलॅटिव्हीटी’, ‘ब्लॅक होल डायनॅमिक्स’, ‘कॉस्मोलॉजी’, ‘थर्मोडायनॅमिक्स’ या विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहिली.

स्टीफन हॉकिंग यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘हॉकिंग रेडिएशन’ला सुरुवातीला विरोध पत्करावा लागला होता. पण, कालांतराने त्याला मान्यता मिळाली आणि १९७५ मध्ये त्यांची ‘भूगर्भ भौतिकशास्त्र’ या विषयावर ‘अभ्यासक’ म्हणून कॅम्ब्रिज विद्यापीठावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती.

पुढे त्यांना ‘आईन्स्टाईन अवॉर्ड’, ‘अल्बर्ट मेडल’, ‘मॅक्सवेल मेडल’ सारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. 

१९८५ पर्यंत बोलू शकणारे स्टीफन हॉकिंग यांचा अचानक आवाज गेला. संपूर्ण विज्ञान जगत तेव्हा अस्वस्थ झालं होतं. ‘अरुण मेहता’ आणि ‘विक्रम कृष्णा’ या दोन अभियंत्यांनी ‘ई-लॉक्युटर’ नावाचं एकच बटन असलेलं बोलणारं सॉफ्टवेअर तयार केलं.

 

arun mehta im

 

स्टीफन हॉकिंग हे २००१ मध्ये भारतात आले होते तेव्हा त्यांनी ‘विक्रम कृष्णा’ यांची मुंबईत भेट घेतली होती तेव्हा त्यांनी आपल्या ‘व्हील चेअर’ साठी एक प्रोग्राम तयार करून घेतला होता.

अरुण मेहता यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं होतं की, “स्टीफन हॉकिंग यांच्यासोबत काम करता येणं हे आमचं भाग्य होतं. त्यांना भेटल्यावर, त्यांचा विनोदी स्वभाव बघून आम्हाला हे वाटलंच नाही की त्यांना इतका मोठा आजार झाला आहे. स्टीफन हॉकिंग यांना बोलता येणं हे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अत्यंत आवश्यक वाटायचं. जगातील सर्वश्रेष्ठ भौतिकशास्त्र आणि गणित तज्ञ असलेल्या स्टीफन हॉकिंग यांची भावनिक बाजू ही तितकीच मजबूत होती हे आम्हाला आमच्या भेटीदरम्यान पदोपदी जाणवत होतं.”

स्टीफन हॉकिंग यांनी ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम’ हे पुस्तक लिहिलं, जे की सृष्टीच्या निर्मितीची वैज्ञानिक माहिती देणारं सर्वोत्तम पुस्तक मानलं जातं.

स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या भारत भेटीत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे ‘भविष्याचा वेध’ या विषयावर व्याख्यान दिलं होतं. जानेवारी २००१ मध्ये त्यांनी आपला ५९ वा वाढदिवस ओबेरॉय हॉटेल इथे साजरा केला होता. मुंबईतील कित्येक ऑटोमोबाईल कंपन्यांना भेटून त्यांनी अशा कारचं डिझाईन तयार करून घेतलं होतं ज्यामध्ये त्यांची ‘व्हील चेअर’ सुद्धा ठेवता येईल.

‘ई-लॉक्युटर’ हे सॉफ्टवेअर तयार करतांना मेहता आणि विक्रम यांनी त्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एक व्यक्ती पुढे काय बोलू शकते याचा अंदाज घेण्याचं तंत्रज्ञान वापरलं होतं.

 

arun mehta im 1

 

२००९ मध्ये अरुण मेहता आणि विक्रम कृष्णा यांनी एका एनजीओ ची स्थापना केली जी कमी खर्चात अपंग, गरीब व्यक्तींसाठी बोलायचं यंत्र तयार करेल.

अरुण मेहता आणि विक्रम कृष्णा यांच्या जोडीने नवी दिल्ली येथे नेत्रहीन व्यक्तींसाठी ‘कम्प्युटर प्रोग्राम’ तयार केला आणि त्यांना ‘ऑडिओ-व्हिज्युअल’ कंटेंट समजण्यास मदत केली.

आपल्या संशोधनाचा उद्देश विचारल्यावर हे शास्त्रज्ञ सांगतात, की “कित्येक लोक हे शारीरिक व्याधींमुळे आपल्यातील हुशारी जगासमोर आणू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत. या सर्व लोकांना एक संधी देणं हाच आमचा उद्देश आहे.”

स्टीफन हॉकिंग या महान शास्त्रज्ञाला अखेरच्या दिवसात दोन भारतीय व्यक्तींनी व्यक्त होण्यास मदत केली ही खरंच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असली पाहिजे. ‘जय विज्ञान’ हा नारा हे लोक सार्थ ठरवतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?