' नेहरूंचं कौतूक केलं म्हणून भारत आणि सिंगापूर यांच्या संबंधामध्ये बिघाड? वाचा… – InMarathi

नेहरूंचं कौतूक केलं म्हणून भारत आणि सिंगापूर यांच्या संबंधामध्ये बिघाड? वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकतंच गोवा आणि उत्तर प्रदेशात मतदान झालं, गेल्या अनेक काही महिन्यांपासून निवडणुकांचे बिगुल वाजत होते, ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे ती घालवण्यासाठी इतर विरोधी पक्षांनी चांगलीच कंबर कसली होती. आता पंजाबमध्ये दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपल आहे.

आधीच पंजाबमधील राजकारणामध्ये अस्थिरता गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे, त्यातच काल प्रचार सभेच्या दरम्यान अमित शाह यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केली. मोदी सत्तेत आल्यापासून कायमच काँग्रेसच्या घराणेशाहीवर, नेहरू गांधी परिवारावर टीका करत आले आहेत.

 

narendra modi featured inmarathi

 

नेहरू गांधी परिवार आणि राजकारण हे गेली अनेकवर्ष समीकरण बनून गेलं होत मात्र मोदी लाटेनंतर हे समीकरण जरा अवघड बनत चाललं आहे. एकीकडे मोदी या घराण्यांवर सातत्याने टीका करताना दिसून आले मात्र थेट सिंगापूरच्या पंतप्रधानांनी मात्र नेहरू घराण्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत, नेमकं काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात…

 

 

नेमकं काय म्हणाले ते?

सिंगापूरचे पंतप्रधान ली सून लुंग त्यांच्या विधानसभेत बोलत असताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली जेव्हा मुद्दा लोकशाहीवर आला तेव्हा त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा संदर्भ दिला, ते पुढे म्हणाले की व्यवस्थेसाठी लढणारे आणि जिंकणारे नेते यांच्या अंगी बहुदा प्रचंड धैर्य, महान संस्कृती आणि उत्कृष्ट क्षमता असे गुण असलेल्या व्यक्ती अपवादात्मक असतात.

अनेक अडचणींवर मात करून, लोकांसाठी आणि राष्ट्रासाठी जे लोक पुढे आले आहे त्यापैकी डेव्हिड बेन गुरियन आणि जवाहरलाल नेहरू आहेत.

 

WhatsApp Image 2022-02-18 at 15.12.12

 

नेहरूंबद्दल बोलताना ते पुढे असेही म्हणाले की मीडिया रिपोर्टनुसार नेहरूंच्या सध्याच्या भारतात संसदेतील अधिकहून लोकप्रतिनिधींवर खुनाचे आणि बलात्कारांचे आरोप आहेत.

 

jawaharlal-nehru-inmarathi

भारत सरकारने या प्रकरणाचा निषेध तर नोंदवला त्याचबरोबरीने तातडीने सिंगापूरच्या उच्चआयुक्तांना समन्स देखील बजावला आहे. मात्र अद्याप सिंगापूरकडून कोणते उत्तर आले नाही.

यामागे काही राजकीय हेतू असू शकतो का?

एकीकडे मोदी सरकार काँग्रेससकाळातील अनेक गोष्टी बदलत आहेत, निवडणुकांमध्ये नेहरूंना लक्ष करत आहेत म्हणूनच कदाचित आंतरराष्ट्रीय पटलावर पुन्हा एकदा नेहरूंची प्रतिमा उभी करण्याचे प्रयत्न करत आहेत असा काही जणांचा दावा आहे.

सिंगापूरच्या पंतप्रधानांनी नेहरूंच्या बाबतीत केलेलं मत आणि दोन्ही देशातील आंतराष्ट्रीय संबंध यावर काही परिणाम होईल का? यासाठी आमच्या टीमने आंतरराष्ट्रीय अभ्यासक संदेश सामंत यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा ते असं म्हणाले की अशा घटना सातत्याने होत असतात..

 

singapore im

 

आपल्याकडे मागे  अरविंद केजरीवाल यांनी कोव्हीडच्या तिसऱ्या लाटेला सिंगापूर देशाला जबाबदार ठरवले होते, तेव्हा सिंगापूर सरकारने देखील भारतीय दूतावासाला समन्स बजावला होता. तसेच ते पुढे म्हणाले की या घटनेचे पडसाद आंतरराष्ट्रीय संबंधावर पडणार नाहीत..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?